MB NEWS:विद्यावर्धिनी विद्यालयाचे स्पर्धेत यश

 विद्यावर्धिनी विद्यालयाचे स्पर्धेत यश


परळी वैजनाथ दि.१६ (प्रतिनिधी)

     क्रांतीसुर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेत विद्यावर्धिनी  माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी यश मिळवले.याबद्दल संस्था व शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

          क्रांतीसुर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता.११) आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेत शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये विद्यावर्धिनी माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.यात प्रथम क्रमांक श्रीनिवास पांडुरंग काळे (९ वी) याने रोख ५ हजार रुपये, प्रमाणपत्र व ट्रॉफी पटकावली तर आदित्य जगन्नाथ वडुळकर (९ वी) याने द्वितीय क्रमांकांसह ३ हजार रुपये नगदी रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी मिळवली. या विद्यार्थ्यांचे श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. कोळगे, उपाध्यक्ष श्री भिंगोरे, सचिव श्री इटके, संचालक श्री. मुंडे, श्री.पैंजणे, डॉ. चेवले यांच्यासह विद्यावर्धिनी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .मातेकर, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .सुमठाने, मुख्याध्यापक श्री .नांदुरकर, स्पर्धेचे मार्गदर्शक श्री सूर्यवंशी व शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?