MB NEWS: मोठी बातमी! अजित पवार यांनी सोशल मीडियावरील राष्ट्रवादीचा उल्लेख असलेले वॉलपेपर हटविले

 मोठी बातमी! अजित पवार यांनी सोशल मीडियावरील राष्ट्रवादीचा उल्लेख असलेले वॉलपेपर हटविले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे 40 आमदारांसमवेत भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर डिलीट केले आहे. अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. ते फोटो कायमस्वरूपी त्यांनी डिलिट केले आहे. त्यामध्ये वॉलपेपर अपलोड केल्यानंतर होणाऱ्या पोस्टसुद्धा डिलिट केल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Click:*राज्यात खळबळजनक घडामोडी: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा*


      राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू होत्या. भाजप सह शिवसेनेतील अनेक नेत्यांनी अजित पवार अस्वस्थ असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

Click:● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न*


उद्धव ठाकरे यांच्यानंतर शरद पवार यांना भाजप धक्का देण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवार हे नाराज आहेत का? अजित पवार हे अस्वस्थ आहे का? असे विविध सवाल यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे.असे असतांना अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मिडियावरील फेसबूक आणि ट्विटरवर वॉलपेपर काढून टाकला आहे. अजित पवार यांनी यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाव आणि चिन्ह त्यासोबत शरद पवार यांच्यासोबतचा फोटो लावला होता. तो पोस्ट सहित डिलिट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात आहे.

अजित पवार यांनी यापूर्वी भाजप सोबत काही तासांचे सरकार स्थापन केले होते. मात्र, शरद पवार यांनी त्यावेळी अजित पवार यांचे बंड क्षमवलं होतं. त्यानंतर आता अजित पवार हे भाजप सोबत 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार अशी चर्चा सुरू असतांना अजित पवार यांच्या सोशल मिडियावरील वॉलपेपर हटविणे यावरून कुणाला इशारा आहे का? असेही बोलले जाऊ लागले आहे.

Video 




Advertise 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार