प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:राज्यात खळबळजनक घडामोडी: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा

 राज्यात खळबळजनक घडामोडी: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा


परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
     राज्यातील खळबळजनक राजकीय घडामोडी सुरु आहेत. राज्यातील राजकारणात मोठ्या घटना व त्यावरील क्रिया प्रतिक्रियांनी वातावरण ढवळून टाकले आहे.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे एक ट्विट चर्चेत आले आहे.या ट्विट मध्ये 'अशक्यही शक्य करतील स्वामी' असे कॅप्शन देत ट्विट करण्यात आले आहे.

शरद पवार काय म्हणाले?

       या सर्व घटनाक्रमावर शरद पवार यांनी सुचक विधाने केली आहेत.जे तुमच्या मनात आहे ते आमच्या मनात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सहकारी एकाच विचाराचे आहेत.पक्षाची कोणतीही बैठक कोणीही बोलावली नाही, मी स्वतः थोड्याच वेळात दिल्लीला जाणार आहे. कोण काय म्हणत यापेक्षा राष्ट्रवादी बाबत मी काय म्हणतो ते महत्त्वाचे आहे असे शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान धनंजय मुंडे अजित पवारांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. परंतु धनंजय मुंडेंनी माध्यमांशी बोलणे टाळले. माध्यम प्रतिनिधींना धन्यवाद, थँक यू म्हणत मुंडे मार्गस्थ झाले.

अजित पवारांची राष्ट्रवादीकडूनच कोंडी?

        राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या अस्वस्थतेला पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार हेच एकटे जबाबदार असल्याचे चित्र जाणीवपूर्वक तयार केले जात असून  त्यांच्या संदर्भातील छोट्या छोट्या गोष्टींनाही अवास्तव प्रसिद्धी दिली जात असल्याची भावना अजित पवार समर्थकांमध्ये तयार झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणताही मोठा नेता यामध्ये तोंड उघडण्यास तयार नसून हे वातावरण निवळण्यासाठी कुणीही प्रयत्न करीत नसल्याने अजित पवार यांना टोकाचा निर्णय घेण्यास भाग पाडण्याचीच ही खेळी असल्याचीही चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.

पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा

      राज्यातील खळबळजनक राजकीय घडामोडी सुरु आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे एक ट्विट चर्चेत आले आहे.या ट्विट मध्ये 'अशक्यही शक्य करतील स्वामी' असे कॅप्शन देत ट्विट करण्यात आले आहे.वास्तविक स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त पंकजा मुंडे यांचे हे ट्विट आहे.स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना 'अशक्यही शक्य करतील स्वामी' हे स्वामी समर्थांबाबतचे वाक्य वापरले असले तरी या वाक्यावर सध्याचा राजकीय परिस्थितीचा संदर्भ जोडत राजकीय अर्थाने या ट्विट ची चर्चा होताना दिसत आहे.

Video 




Advertise 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या