MB NEWS:मोठा अनर्थ टळला: बुट्टेनाथ घाटात बस पलटी;25 प्रवाशी जखमी

 मोठा अनर्थ टळला: बुट्टेनाथ घाटात बस पलटी;25 प्रवाशी जखमी


अंबाजोगाई येथून जवळच असलेल्या - बुट्टेनाथ घाटात राज्य परिवहन मंडळाची बस पलटी झाली. हा अपघात आज मंगळवारी (दि. १८) दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास झाला.

Click:*राज्यात खळबळजनक घडामोडी: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा*

सदरील बस अंबाजोगाईकडून येलडा कडे निघाली होती. मुकुंदराजच्या बुट्टेनाथ घाटात एका अवघड वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. या अपघातात २५ प्रवाशी जखमी झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी तातडीने रुग्णवाहिका आणि पोलिसांना घटनास्थळी पाठवून दिले. तर, स्वाराती रुग्णालयातील यंत्रणाही सुसज्ज ठेवली. सर्व ना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार