MB NEWS: खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न



माजलगाव दि.१८-उत्तर प्रदेश मध्ये दोन दिवसांपूर्वी हत्या झालेल्या गुंड खासदार अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ यांच्या समर्थनार्थ माजलगाव शहरात भर चौकात बॅनर झळकवण्यात आले असून त्यात दोघांचा शहीद असा उल्लेख करून हिंदु धर्मियांत तेढ निर्माण करन्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली असून दोषीवर कारवाईची मागणी होत आहे.

         उत्तर प्रदेशात शंभराहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या खासदार अतिक अहमद व त्याच्या भावाची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. या घटनेला जातीय रंग देण्याचे मनसुबे काही विघातक शक्तींनी रचले असल्याचे दिसून येत आहे.मंगळवारी सकाळी येथील आंबेडकर चौकात अतिक व त्याच्या भावाचे पोस्टर लावण्यात आले, त्यात पोलीस कष्टडीत झालेल्या हत्याचा निषेध करून दोघांचा शहीद असा उल्लेख केला, त्याना स्वर्गात जागा मिळावी असे लिहून एका जिल्हा दैनिकाच्या बातमीचा हिंदू विषयी लिखाणाचे कात्रण डकवण्यात आले आहे.बॅनरवर मोहसीन भय्या पटेल मित्र परिवार असा उल्लेख असून बॅनर कोणत्या ठिकाणी छापले त्या दुकानाचा उल्लेख नाही.


Click:*राज्यात खळबळजनक घडामोडी: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा*


   दरम्यान या बॅनरची शहरात चर्चा सुरू झाल्याने त्याचे विपरित परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास सदरील बॅनर काढून घेतले.याप्रकरणी गेवराई उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड हे चौकशीसाठी दाखल झाले आहेत.


Video 




Advertise 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?