MB NEWS:महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा अंक: अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार?

 महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा अंक: अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार?


महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा अंक पाहण्यास मिळणार का? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण अजित पवार हे भाजपात जाऊ शकतात किंवा भाजपाला पाठिंबा देऊ शकतात अशा चर्चांना उधाण आलं आहे. आमदार अण्णा बनसोडेंसह तीन आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. राज्यात ही चर्चा रंगली आहे ती न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीने. कारण अजित पवारांकडे ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार असल्याची बातमी न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. असं घडलं तर राज्यात पुन्हा एकदा राजकीय नाट्य पाहण्यास मिळेल यात शंकाच नाही.

काय म्हटलं आहे या वृत्तात?

अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आहे. या ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र अजित पवार यांच्याकडे आहे. जर वेळ आली तर राज्यपालांना हे पत्र अजित पवार देतील. त्यामुळे सरकारला धोका निर्माण होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवलं तर हे पाऊल अजित पवार उचलतील. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाईल.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार