पोस्ट्स

MB NEWS:रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी - म.न.से. व संभाजी ब्रिगेडची मागणी

इमेज
  परळी तालुक्यातील चौपदरीकरणाच्या कामात शेकडो वर्षपूर्वीच्या मोठमोठ्या वृक्षांची तोड  रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी - म.न.से. व संभाजी ब्रिगेडची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... परळी तालुक्यातील अनेक रस्त्यांचे चौपदरीकरण होत आहे. या रस्त्याच्या कामासाठी शेकडो वर्ष वय असलेल्या मोठमोठ्या वृक्षांची तोड होत आहे. त्या बदल्यात रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. परळी - बीड, परळी - अंबाजोगाई, धर्मापुरी - परळी, परळी - गंगाखेड, परळी - सोनपेठ  या रोडचे रुंदीकरनाचे काम सध्या सुरु असून या रोडवर शेकडो वर्षाचे खूप मोठे मोठे वृक्ष होते ती वृक्ष रस्त्याच्या कामासाठी तोडण्यात येत आहेत. विकास कामे करताना अशा काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु या कारणाने नैसर्गिक गोष्टींची हानी होते आहे. हि होत असलेली हानी भरून काढण्यासाठी पण पाऊल उचलणे गरजेचे आहे. अगोदरच थर्मल पावर स्टेशन, सिमेंट फॅक्टरी, शेकडो विटभट्या यामुळे परळीकरांना उष्णतेच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत आहेत. त्यातच शेकडो वर्षाची महाकाय  वृक्ष तोडल्यामुळे या झळ

MB NEWS:परळीच्या प्रभू वैद्यनाथ मंदिरासह देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जिर्णोद्धाराचं काम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केल-शिवाजी शिंदे, वैजनाथ माने

इमेज
  परळीच्या प्रभू वैद्यनाथ मंदिरासह देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जिर्णोद्धाराचं काम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केल-शिवाजी शिंदे, वैजनाथ माने परळी, (प्रतिनिधी):-बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या मंदिराच्या जीर्णोद्धार व देशभरातील प्रमुख मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केले.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तुत्वाला जगात तोड नाही खुद्द टिपू सुलताननेही त्यांना तत्त्वज्ञ महाराणी अशी उपमा दिली होती.असे प्रतिपादन  शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे परळी तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे परळी शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी केले.              परळी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन

MB NEWS:माजी सैनिक विश्वनाथप्पा हरंगळे यांचे निधन

इमेज
  माजी सैनिक विश्वनाथप्पा हरंगळे यांचे  निधन परळी वैजनाथ, येथील  माजी सैनिक,वीरशैव समाजातील श्री वक्रेश्वर मंदिर संस्थान चे विश्वस्त विश्वनाथप्पा हरंगुळे यांचे दिनांक 30 मे रोजी दुखद निधन झाले, मृत्युसमयी ते 76 वर्षे वयाचे होते. महात्मा बसवेश्वर गृहनिर्माण संस्था सेक्रेटरी या पदावर कार्यरत होते,ते परळी शहरातील वीरशैव समाजातील सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असत.  त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले व मुलगी ,सुना ,नातू असा परिवार आहे. त्यांच्यावर  दिनांक 31 बुधवार रोजी शोककुल वातावरणात वीरशैव समाजातील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास ठक्कर, बाजीराव धर्माधिकारी,प्रा.दुबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात साजरी

इमेज
  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास  ठक्कर, बाजीराव धर्माधिकारी, प्रा.दुबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती  उत्साहात साजरी परळी वैजनाथ/प्रतिनिधी  परळी वैजनाथ येथील श्री वैजनाथ मंदिर येथे आज बुधवार दिनांक31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती ढोल ताशाच्या गजरात भंडारा उधळत उत्साहात साजरी करण्यात आली.  शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )बीड उप जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा. अतुल दुबे सर यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी बोलताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता,पराक्रमी योद्धा,आणि सर्वश्रुत धनुर्धर ह्या सर्व गोष्टीमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपाटावर स्त्री व्यक्तिमत्वचा ठसा उमटवणाऱ्या, होळकर घराण्याचा 'तत्वज्ञानी राणी ' म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या अश्या ह्या महाराणी राजमाता होत्या

MB NEWS:शिवसेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी.

इमेज
  अहिल्यादेवीनी महिलांच्या उत्कर्षासाठी मोठं योगदान तर दिलेच व मंदिराच्या माध्यमातून समाजाचा उद्धार केला -बाजीराव धर्माधिकारी       शिवसेनेच्या  वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी परळी वै:-              राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी तत्कालीन विपरीत परिस्थितीत महिलांन साठी मोठं योगदान दिले,विशेषतःअनाथ निराधार महिलांच्या उत्कर्षासाठी उल्लेखनीय योगदान दिले व त्याबरोबरच देशातील अनेक मंदिराचें जीर्णोद्धार,निर्मिती व मंदिर परिसराचा विकास केला अहिल्यादेवीच्या या कार्यातून समाजाचा उद्धार झाला असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार ही अहिल्याबाईंनी  केला असल्याने त्यांचा पदस्पर्शाने आपली नगरी पावन झाली, असे मत माजी नगराध्यक्ष  बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.     शिवसेनेच्या  वतीने  पुण्यश्लोक   होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे गणेशपार येथे आयोजित करण्यात आले होते.     या कार्यक्रमा मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून, माजी पत्रकार संघ अध्यक्ष धनंजय आढाव,मराठा महासंघाचे शहराध्यक्ष शिवाजी देशमुख,बीड जिल्हा नियोजन स

MB NEWS:नागनाथअप्पा अवधूत यांचे दुखःद निधन

इमेज
  नागनाथअप्पा अवधूत यांचे दुखःद निधन परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)          तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील विवेकानंद विद्यालयातील निवृत्त शिपाई नागनाथ गणपतअप्पा अवधूत (वय ७४) यांचे सोमवारी (दि.२९) दुपारी ४ च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.             नागनाथ अवधूत यांच्यावर सोमवारी सायंकाळी गाढे पिंपळगाव येथील विरशैव स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. नागनाथ अवधूत अत्यंत मनमिळाऊ, शाळेत विद्यार्थी प्रिय व धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी , सुना, नातवंडे असा परिवार आहे.

MB NEWS:लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महिला महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महिला महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)              येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महाविद्यालयाने 12 वी बोर्ड परीक्षेत नेत्रदिपक यश प्राप्त करीत आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.        महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या 12वी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेतुन प्रथम नंदिनी वाल्मिक जाधव (८३), द्वितीय धनश्री केशव गुट्टे (८१.५०), तृतीय भाग्यश्री भालचंद्र पांचाळ (७९) टक्के तर विज्ञान शाखेतून प्रथम धनश्री अमित तांदळे (८२.६७),द्वितीय कल्याणी कोंडीबा वडूळकर (७९.६७),तृतीय स्नेहल शिवाजी शिंदे (७८.८३)  येण्याचा मान पटकावला. या महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल (८९.३३) असून ६ विद्यार्थिनी या विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाल्या आहेत. विज्ञान शाखेचा निकाल (९८.२४) तर विशेष प्राविण्यासह २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयाचा एकुण निकाल (९४.७०) टक्के लागला आहे.          विद्यार्थिनीच

MB NEWS:सोशल मिडीयावर केले लग्नाच्या मागणीचे पत्र व्हायरल

इमेज
  गौतमी पाटील होणार का चिंचोली माळीची सून ? रोहन गलांडे या युवकाने केली गौतमी पाटील सोबत लग्न करण्याची ईच्छा सोशल मिडीयावर केले लग्नाच्या मागणीचे पत्र व्हायरल केज :- सध्या चर्चेत असलेली आणि अनेकांना तिच्या मोहक अदाकारीने घायाळ करणारी गौतमी पाटील हिच्या सोबत लग्न करण्याची ईच्छा केज तालुक्यातील एका २६ वर्षीय लग्नाळू तरुणाने व्यक्त केली आहे. त्याने लग्नाच्या मागणीचे पत्र थेट फेसबुकवर व्हायरल केले असून त्याने तो स्वतः शेतकरी पुत्र असल्याचे म्हटले आहे. प्रसिद्ध कलाकार गौतमी पाटील हिने एका मुलाखतीत म्हटले होते की, आता तिला लग्न करून संसार थाटण्याची इच्छा आहे. तिच्या या इच्छेवर केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील एक २६ वर्षीय युवक चांगलाच भाळला आहे. भल्या-भल्याना तिच्या मोहक अदाकारीने घायाळ करणारी गौतमी पाटील हिला त्या त्याने फेसबुक वरून लग्नाची मागणी घातली आहे. रोहन गलांडे याने त्याच्या पत्रात म्हटले आहे की, तो शेतकरी पुत्र असून तुझ्या वरील तुझ्या सर्व ईच्छा अटी मला मान्य आहेत. रोहन दादा गलांडे पाटील हा तिच्या सोबत लग्न करायला तयार आहे. ती जशी आहे तशीच त्याला आवडली आहे. जर तिच्या सोबत कुणी

MB NEWS:आसुबाई उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला शाखेचा 98.24% तर विज्ञान शाखेचा 98.73 %निकाल

इमेज
  आसुबाई उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला शाखेचा 98.24% तर विज्ञान शाखेचा 98.73 %निकाल परळी / प्रतिनिधी परळी तालुक्यातील महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित  मांडेखेल येथील आसुबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवले असून यामध्ये बारावी विज्ञान शाखेचा 98.73% टक्के तर कला शाखेचा 98.24%निकाल लागला आहे. उच्च माध्यमिक विभागाच्या विज्ञान शाखेतील कु. ढाकणे मनीषा फुलचंद 81.17 % गुण घेऊन प्रथम, कु.ढाकणे प्रियंका वैजनाथ 80.33% ,कु.नेमाने अनिषा महारुद्र 79.5% गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतीय आल्या आहेत. तर कला शाखेतील कु.कोळेकर किष्किंधा माणिक 79.33 % गुण घेऊन प्रथम, कु.रुपणर प्रणिता सुंदर 76% कु.रुपणर शुभांगी आश्रुबा 76% ,चि.मुसळे गणेश गोविंद 74 अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत. विशेष प्राविण्यासह 15,प्रथम श्रेणीमध्ये 97, द्वितीय श्रेणीमध्ये 23 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव , संचालक मंडळ,प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

MB NEWS:५५३ दिव्यांग व्यक्तींची झाली तपासणी

इमेज
  दिव्यांग पूर्व तपासणी शिबीरास अंबाजोगाईत उत्स्फूर्त प्रतिसाद ५५३ दिव्यांग व्यक्तींची झाली तपासणी अंबाजोगाई - बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या पुढाकारातून जिल्हाभरात सुरु असलेल्या मोफत दिव्यांग पूर्व तपासणी शिबीरास अंबाजोगाईत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आ. नमिता मुंदडा यांच्या नियोजनाखाली राबविण्यात आलेल्या शिबिरात ५५३ दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यापैकी गरजू दिव्यांग व्यक्तींना लवकरच मोफत उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे.  केंद्र सरकारचे सामाजिक न्याय मंत्रालय, दिव्यांग सशक्तीकरण विभाग, बीड जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि खा. प्रीतमताई मुंडे यांच्या पुढाकारातून बीड जिल्ह्यात सर्वत्र दिव्यांग पूर्व तपासणी शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत. केज मतदार संघातील शिबिरांच्या नियोजनाची जबाबदारी आ. नमिता मुंदडा यांच्यावर सोपविण्यात आली होती. केज मधील शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर सोमवारी (दि.२९) अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात तब्बल ५५३ दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डॉक्टरांक

MB NEWS:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महादेव जानकर यांची उपस्थिती ; रासपने केलं कार्यक्रमाचं आयोजन

इमेज
  पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत ३१ मे रोजी नवी दिल्लीत राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती समारोह केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी, महादेव जानकर यांची उपस्थिती ; रासपने केलं कार्यक्रमाचं आयोजन बीड ।दिनांक २९। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे उद्या (ता. ३१) नवी दिल्लीत राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त होत असलेल्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर येत आहेत. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी हया कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.    पुण्यश्लोक महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती ३१ मे रोजी देशभर साजरी होत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी जयंतीनिमित्त ३१ तारखेला सायंकाळी ४ वा. नवी दिल्लीत लोधी मार्गावरील सत्यसाई ऑडिटोरियम येथे एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. कार्यक्रमाचं उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खा. पी. विल्सन,  कर्नाटकचे आमदार एच विश्वनाथ, तेलंगणाचे आ. येगे मल

MB NEWS:रा.प. महामंडळाच्या वर्धापन दिन: ०१ जून रोजी उल्लेखनीय कामगिरी करण्या-या ४८ चालक वाहकांचा होणार गौरव

इमेज
रा.प. महामंडळाचा वर्धापन दिन: ०१ जून रोजी उल्लेखनीय कामगिरी करण्या-या ४८ चालक  वाहकांचा होणार गौरव बीड...... बीड विभागास मे २०२३ मध्ये दि.०१.०५.२०२३ ते २८.०५.२०२३ कालावधीत ३० कोटी ९३ लाख विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे. बीड विभागातील ०८ आगारातील चालक / वाहकांनी माहे एप्रील २३ व मे २०२३ या महिन्यात उल्लेखनीय कामगिरी करून रा.प. महामंडळाच्या उत्पन्नात भरीव वाढ केल्याबद्दल रा.प. बीड विभागाचे वतीने वर्धापन दिनाचे औचीत्य साधुन सोबत दिल्या प्रमाणे २४ चालक व २४ वाहकांचा प्रशिस्तीपत्रक देवुन गौरव करण्यात येणार आहे. दि. १७ एप्रील २०२३ ते १५ जुन २०२३ कालावधीत शालेय सुटया असल्याने प्रवाशी गर्दीत होणारी वाढ पाहता उन्हाळी जादा वाहतुक कालावधी मध्ये बीड विभागातुन ६६ केन्या विविध मार्गावर नवीन सुरु करण्यात आलेल्या 'आहेत. सदर बसेस आरक्षणा करिता उपलब्ध करण्यात आलेल्या असून प्रवाशांनी सदर बसचा लाभ घ्यावा. तसेच रा.प. महामंडळामार्फत महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना प्रवास भाडयात ५० टक्के सवलत योजना व ७५ वर्षा वरील नागरिकांना अमृत जेष्ठ नागरिक योजने अंतर्गत रा.प. बसुन मधुन मोफत प्रवास योजना सुरु के

MB NEWS:महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हाकार्यवाह पदी अनंत जोशी यांची निवड

इमेज
  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हाकार्यवाह पदी अनंत जोशी यांची निवड अंबाजोगाई (प्रतिनिधी)  अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संलग्न  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची बीड जिल्हा कार्यकारिणी समिती बैठक राजेंद्र खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा कार्यवाह म्हणून योगेश्वरी नूतन विद्यालयातील सहशिक्षक श्री.अनंत जोशी यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान चाटे कोषाध्यक्ष विष्णु मिसाळ , उपाध्यक्ष तात्यासाहेब जेवे,  दिनेश घोळवे  सदस्य ,डी एन बांगर, काकासाहेब चौधरी   महिला विभाग प्रमुख रूपाली देशमुख ताई यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी शिक्षकांचे प्रश्न सोडवणे हिच प्राथमिकता असेल असे मत सर्वांनी मांडले. यावेळी बोलताना मा. प्रा किरण पाटील यांनी निवडणूकिमधिल हार जीत हा भाग महत्वाचा नसून शिक्षकांच्या जिव्हाळ्याचे अनुदान , जुनी पेन्शन योजना आश्वासित प्रगती योजना यांसारखे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटना संपूर्ण ताकदिनीशी आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.तसेच राज्य सरकार्यवाह राजकुमार बोनकीले सरांनी राज्याचे पदाधिकारी कायम आपल्यासोबत असतील याची गवाही दिली. य

MB NEWS:कापूस पडला घरी, कांदा सडला बांधावरी अन् सरकार म्हणतयं 'शासन आपल्या दारी'

इमेज
  कापूस पडला घरी, कांदा सडला बांधावरी अन् सरकार म्हणतयं 'शासन आपल्या दारी' कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आज लाखो टन कापूस शेतकऱ्यांच्या घरात भावाच्या प्रतिक्षेत पडून आहे. ऐन कांदा काढणीच्या वेळेस पाऊस सुरू झाल्यामुळे हजारो हेक्टर कांदा बांधावर सडत पडलेला आहे. जो कांदा हाती लागलेला आहे तो वाहतूक खर्चालाही महाग पडत आहे. 'कापूस पडला घरी, कांदा सडला बांधावरील आणि तरीही हे सरकार म्हणतंय शासन आपल्या दारी', अशा शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे. कोरोनाच्या संकटातून कसाबसा सावरून शेतकरी परिस्थितीशी झगडत उभा राहिला. त्यानंतर निसर्गाची साथ न भेटल्यामुळे तो पूर्णतः कोसळण्याच्या स्थितीत आहे. ज्या सरकारकडे मायबाप या अपेक्षेने पाहत होता त्या सरकारने सुद्धा घात केला. नको त्या प्रश्नांना हवा देत महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण अशा बळीराजाच्या पिळवणुकीच्या प्रश्नांकडे मात्र कुठल्याही नेत्याचे अथवा मीडियाचे लक्ष जाताना दिसून येत नाही, ही मोठी खेदाची गोष्ट आहे. सरकार तुटपुंजी मदत देऊन बळीराजाला लाचार करून टाकण्याचे काम करीत आहे. शेतकऱ्याच्या पिकाला जर उत्पन्न आणि खर्च या तोडीत योग्

MB NEWS:महेशनवमी विशेष: माहेश्वरींचा गौरवशाली इतिहास व राष्ट्रउभारणीत मोठे योगदान

इमेज
  महेशनवमी विशेष: माहेश्वरींचा गौरवशाली इतिहास व राष्ट्रउभारणीत मोठे योगदान हिंदू धर्मग्रंथानुसार महेश्वरी समाजाची उत्पत्ती भगवान शिवचा वरदानामुळे झाली होती. म्हणून महेश नवमी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी साजरी केली जाते.       माहेश्वरी समाजातील लोकांसाठी महेश नवमीचा दिवस खूप महत्वाचा आहे. या दिवशी महेश्वरी समाजातील लोक शिवालयात आणि मंदिरात जातात आणि महादेवाची विशेष पूजा करतात. या दिवशी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्ये आयोजित केली जातात. ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला 'महेश नवमी'  साजरी केली जाते.  माहेश्वरी समाजाचा महेश नवमी  प्रमुख सण आहे.  ‘माहेश्वरी समाज’ अर्थात भगवान महेशाच्या आशीर्वादाने जन्मलेला समाज. मूळ राजस्थानी समाज, परंतु वर्तमानात भारतातील विविध राज्यात व जगभरातील अनेक देशात स्थायिक असलेला समाज. स्थानिक संस्कृतीशी एकरूप होऊन एकनिष्ठ राहणारा समाज म्हणजे माहेश्वरी समाज. मूळभाषा जरी मारवाडी असली, तरी स्थानिक भाषा आत्मसात करून अस्खलित बोलणारा समाज म्हणजे माहेश्वरी समाज. संपूर्ण भारतात या समाजाची जनसंख्या 10 लाखांपेक्षाही कमी असावी, असा प

MB NEWS:स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

इमेज
  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात  अभिवादन बीड (जि.मा.का.) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . यावेळी अप्पर जिल्हाधिकारी  श्री.उत्तम पाटील  (बीड), अप्पर जिल्हाधिकारी श्री. सुनिल यादव, (अंबाजोगाई), निवासी उपजिल्हाधिकारी, श्री संतोष राऊत, उपजिल्हाधिकारी (सामान्य)  श्री. दयानंद जगताप,  तहसीलदार (महसूल) श्री. नरेंद्र कुलकर्णी, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील  श्रीमती आचार्य राजश्री, संध्या मोराळे, श्री .गायकवाड, श्री .सतिष ठाकरे, श्री. कुलकर्णी, गोटीराम गोरेल यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

MB NEWS:जय महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने वीर सावरकर जयंती साजरी

इमेज
  वीर सावरकरांचे विचार आत्मसात करण्याची गरज -प्रा. अतुल दुबे जय महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने वीर सावरकर जयंती साजरी *परळी वैजनाथ/प्रतिनिधी* स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारत राष्ट्र, भारतातील जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार जातीव्यवस्थेचे उच्चाटन होणे ही राष्ट्र निर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब आहे. आज देशाला स्वा. सावरकरांच्या विचारांची आवश्यकता असून, नव्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक तथा जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अतुल दुबे यांनी व्यक्त केले. जय महाराष्ट्र प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित वीर सावरकर जयंती  रविवार दिनांक 28 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रा.अतुल दुबे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी वीर सावरकर यांच्या प्रतिमेचे श्री दुबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्रा.अतुल दुबे  म्हणाले, गावांमध्ये अस्पृश्यता पाळली जाते. भारतातून ही जातीयता जेव्ह

MB NEWS:राष्ट्रवादी काँगेसच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादी भवन बीड येथे नियोजनपूर्व बैठक

इमेज
9 जून रोजी शरद पवारांच्या अहमदनगरला होणाऱ्या सभेत बीडचा ठसा उमटवू - धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँगेसच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादी भवन बीड येथे नियोजनपूर्व बैठक  बीड (दि. 28) - आगामी 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 25व्या वर्षात पदार्पण करत आहे. खा.शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली येत्या 9 तारखेला पक्षाची अहमदनगर येथे जाहीर सभा संपन्न होणार आहे. या सभेला बीड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातून पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, पक्षाच्या विचाराला मानणारे नागरिक अशी सर्वांची रेकॉर्डब्रेक गर्दी अहमदनगरला उपस्थित राहावी, असे नियोजन करून अहमदनगर येथील पवार साहेबांच्या सभेत बीड जिल्ह्याचा ठसा उमटवू, असे आवाहन माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.  दि. 09 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या नेतृत्वात पक्षाची जाहीर सभा संपन्न होणार आहे. आगामी काळातल्या निवडणुकांच्या व राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या दृष्टीने ही सभा अत्यंत महत्वाची असून, या सभेला अहमदनगर जिल्ह्याला लागून असलेल्या बीड जिल्ह्यातून देखील हजा

MB NEWS: 💥धक्कादायक…! शिक्षकांनी मोबाईल जप्त केल्याचा राग; मुलीने शाळेलाच लावली आग, २० जणांचा होरपळून मृत्यू

इमेज
 💥धक्कादायक…! शिक्षकांनी मोबाईल जप्त केल्याचा राग; मुलीने शाळेलाच लावली आग, २० जणांचा होरपळून मृत्यू मुंबई –  मोबाईल व्यसन आणि तरुणाई आज हा विषय एक गंभीर समस्या म्हणून पुढे येत आहे. एकदा का व्यसन लागले की व्यक्ती मोबाइलशिवाय राहूच शकत नाहीत. त्यांना फोन हरवण्याची, बॅटरी संपण्याची, नेटवर्क नसण्याची सततची भीती असते. अशा व्यक्ती सतत मोबाईलमध्येच व्यस्त असतात. यामध्ये सर्वात जास्त तरुणाईची संख्या आहे. अशात तरुण मुला मुलींना मोबाईल थोडा कमी वापरण्याचा सल्ला पालकांनी किंवा शिक्षकांनी दिला तर ते आत्महत्याही करतात अशा अनेक घटनाही घडल्या आहे. अशात अशीच एक घटना  दक्षिण आफ्रिकन देश गयानामध्ये घडली आहे. रात्री उशिरा एका शाळेच्या मुलींच्या वसतिगृहाला आग लागली. या अपघातात २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या संदर्भात तपास अधिकाऱ्यांना मोठा पुरावा सापडला आहे. वसतिगृहात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीने ही आग लावल्याचे त्यांनी सांगितले. यामागचे कारणही मनाला चटका लावणारे आहे. शाळेच्या प्रशासनाने तिचा मोबाईल जप्त केल्यामुळेच आरोपी विद्यार्थिनीने आग लावली. विद्यार्थिनीचे एका मोठ्या व्यक्तीवर प्रेम असल्याच

MB NEWS:रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये ‘बाजीगर’चे उत्तर

इमेज
रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये ‘बाजीगर’चे उत्तर बारावी परीक्षेचा निकाल 25 मे रोजी लागला. बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासणे ही एक मोठी डोकेदुखी असते. याचं कारण म्हणजे उत्तरं येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांकडून होणारी फेकाफेकी. अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की लांबलचक उत्तरं लिहिली तर जास्त मार्क मिळतील. मात्र खरी बाब अशी आहे की उत्तर छोटे असो अथवा मोठे. त्यात विषय समजला असल्याचे प्रदर्शन झाले तरच मार्क मिळतात. फेकाफेकी असल्यास भोपळा मिळतो. अनेकदा अशी फेकाफेकी केलेली उत्तरं वाचून उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांचेही मनोरंजन होते. उत्तरं येत नसली की विद्यार्थी पेपरमध्ये चित्रपटाच्या कहाण्या लिहितात, कधी गाणी लिहितात तर कधी शेरो-शायरीपण लिहितात. रत्नागिरी बोर्डात तपासणीचे काम करणाऱ्या सुरेश जोशी यांच्याकडे छत्रपतीसंभाजीनगर मधल्या बारावीच्या विद्यार्थ्याचा पेपर तपासणीसाठी आला होता. रसायनशास्त्राची उत्तरे फार मोठी नसतात. मात्र या विद्यार्थ्याने एक उत्तर लांबलचक लिहिलं होतं. उत्सुकता म्हणून जोशी यांनी ते वाचलं असता त्यांना ती एक कथा असल्याचं कळालं. पेपर तपासल्यानंतर ही कथा एका चित्

MB NEWS:गेवराईच्या पूर्व तपासणी शिबिरास दिव्यांगांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
  गेवराईच्या पूर्व तपासणी शिबिरास दिव्यांगांचा उत्स्फूर्त प्रतिसाद खा.प्रितमताई मुंडे यांनी भेट देऊन दिव्यांगांशी साधला संवाद गेवराई । दि. २६ । सामाजिक न्याय विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या दिव्यांग पूर्व तपासणी शिबिराला काल दिव्यांगांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केंद्र सरकारच्या एडीप योजनेअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमातून जिल्ह्यातील गरजू आणि पात्र दिव्यांगांना मोफत सहाय्यक साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या अनुषंगाने काल गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पूर्व तपासणी शिबीर संपन्न झाले. जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि केंद्र सरकार व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिबिराचे काल गेवराईत खा. मुंडे यांनी उदघाटन केले, विधानसभेचे सदस्य आ. लक्ष्मण पवार यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते आणि प्रतिष्ठानचे स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना खा. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की ‘ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सातत्याने लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबवित असतो. कोरोनाच्या कठीण काळात आम्ही रुग्णा

MB NEWS:यंत्रसामुग्रीच्या वापराचा सल्ला देत उत्पन्नवृद्धीसाठी शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

इमेज
  यंत्रसामुग्रीच्या वापराचा सल्ला देत उत्पन्नवृद्धीसाठी शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा औरंगाबाद दि.२६ (जिमाका) :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यातील शेती आणि शेतकरी हा जिव्हाळ्याचा विषय आहे, याचा प्रत्यय आज कन्नड येथील कार्यक्रमात उपस्थितांना आला. लाभार्थ्यांसाठी ट्रॅक्टर आणि कम्बाईंड हार्वेस्टर वाटपाच्या वेळी शेतकऱ्यांना चाव्या सुपुर्द करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ट्रॅक्टर आणि कम्बाईड हार्वेस्टर स्वतः चालवून पाहिले… शेती आणि संबंधित उद्योगांमध्ये या यंत्रसामुग्रीचा वापर करून उत्पन्नवृद्धीसाठी  संबंधित शेतकऱ्यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.             आज कन्नड येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात पीक काढणीसाठी वापरण्यात आलेल्या हार्वेस्टरची  माहिती घेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जवळपास 500 मीटरपर्यंत ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर चालवले. हा क्षण लाभार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने सुखद ठरला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्या सुर्पुद केल्या. यावेळी ट्रॅक्टर 250, हार्वेस्टर  10, शेती अवजारे, नांगर, रोटावेटर, पेरणी यंत्र 35 तसेच यावेळी मालवाहतुकीसाठी 10 वाहने

MB NEWS: व्ही.आय.पी. शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

इमेज
 व्ही.आय.पी. शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन           अहमदनगर, दि.26: (जिमाका वृत्तसेवा) -  व्ही.आय.पी. शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे  भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.             यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, आदी उपस्थित होते.

MB NEWS:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज ११२ तक्रारींचे निराकरण

इमेज
  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात  आज ११२ तक्रारींचे निराकरण         मुंबई,दि. २६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात खार (पश्चिम) एच पश्चिम वॉर्ड  येथे आज ६३५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ११२ तक्रारींचे निराकरण  करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारी देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला  उपस्थित होते.          यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे  स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती  महिलांना देण्यात आली.               हा उपक्रम  ३१ मे २०२३ पर्यंत   दुपारी ३ ते 5.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCS

MB NEWS:अंध, दिव्यांग तसेच बचतगटाच्या महिलांना योजनांचा आधार

इमेज
  अंध, दिव्यांग तसेच  बचतगटाच्या महिलांना योजनांचा आधार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद                       औरंगाबाद, दि. 26 (जिमाका) : अंध, दिव्यांग यांना मदतीच्या साधनांच्या वाटपासाठी स्वतः व्यासपिठावरून खाली येत दिव्यांग बांधवांची मोठया आस्थेने मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केलेली विचारपूस, दिव्यांगांना विविध उपयोगी साहित्याचे केलेले वाटप, बचतगटाच्या महिलांच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेला विविध योजनांच्या लाभामुळे हातभार मिळाला आहे.  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिलेला मदतीचा हात आम्हाला दिलासा देणारा असल्याच्या भावना लाभार्थी बोलताना व्यक्त करत होते.             ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आज औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे   मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या अभियानामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला. महसूल,  कृषी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वन विभाग त्याचबरोबर इतर विभागांच्या विविध योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. एकूण दीड लाख लाभार्थ्यांना मुख्यमंत्री श्री. श