MB NEWS:यंत्रसामुग्रीच्या वापराचा सल्ला देत उत्पन्नवृद्धीसाठी शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

 यंत्रसामुग्रीच्या वापराचा सल्ला देत उत्पन्नवृद्धीसाठी शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा




औरंगाबाद दि.२६ (जिमाका) :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यातील शेती आणि शेतकरी हा जिव्हाळ्याचा विषय आहे, याचा प्रत्यय आज कन्नड येथील कार्यक्रमात उपस्थितांना आला. लाभार्थ्यांसाठी ट्रॅक्टर आणि कम्बाईंड हार्वेस्टर वाटपाच्या वेळी शेतकऱ्यांना चाव्या सुपुर्द करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ट्रॅक्टर आणि कम्बाईड हार्वेस्टर स्वतः चालवून पाहिले… शेती आणि संबंधित उद्योगांमध्ये या यंत्रसामुग्रीचा वापर करून उत्पन्नवृद्धीसाठी  संबंधित शेतकऱ्यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.


            आज कन्नड येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात पीक काढणीसाठी वापरण्यात आलेल्या हार्वेस्टरची  माहिती घेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जवळपास 500 मीटरपर्यंत ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर चालवले. हा क्षण लाभार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने सुखद ठरला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्या सुर्पुद केल्या. यावेळी ट्रॅक्टर 250, हार्वेस्टर  10, शेती अवजारे, नांगर, रोटावेटर, पेरणी यंत्र 35 तसेच यावेळी मालवाहतुकीसाठी 10 वाहने वाटप करण्यात आली. 


            राज्यात विविध शेतकरी हिताचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत. कधी शेतीच्या बांधावर जात पिकाची पाहणी किंवा गारपीट व अवकाळीमुळे हतबल झालेल्या शेतकरी बांधवांना दिलेला मदतीचा हात आणि आधार असो यातून नेहमीच शेतकरी बांधवांप्रती कर्तव्य दक्षतेने व तळमळीने काम करतात.


            आपुलकीची भावना, शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रती असलेला जिव्हाळा आणि त्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री म्हणून जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्याच्या निर्णयातून दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !