MB NEWS:परळीच्या प्रभू वैद्यनाथ मंदिरासह देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जिर्णोद्धाराचं काम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केल-शिवाजी शिंदे, वैजनाथ माने

 परळीच्या प्रभू वैद्यनाथ मंदिरासह देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जिर्णोद्धाराचं काम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केल-शिवाजी शिंदे, वैजनाथ माने


परळी, (प्रतिनिधी):-बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या मंदिराच्या जीर्णोद्धार व देशभरातील प्रमुख मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केले.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तुत्वाला जगात तोड नाही खुद्द टिपू सुलताननेही त्यांना तत्त्वज्ञ महाराणी अशी उपमा दिली होती.असे प्रतिपादन  शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे परळी तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे परळी शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी केले.

      


      परळी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे,परळी शहर प्रमुख वैजनाथ माने, विश्वनाथ राठोड, शिवसेना तालुका सचिव महिला आघाडी तालुकाप्रमुख यशोदा राठोड, डाॅ. जे. एन. शेख, जेष्ठ नेते  सुग्रीव गडदे, शिवसेना शहर सचिव सय्यद निसार अली, शहर संघटक सचिन सोनवणे, शिवसेना उपशहर प्रमुख अॅङ संजय डिगोळे, बाळासाहेब खोसे, परमेश्वर बनसोडे, विभाग प्रमुख विठल गायकवाड, अतिष दहातोंडे, सिरसाळा शिवसेना शहर प्रमुख कैलास कावरे, युवा सेना प्रमुख आशुतोष शिंदे आदि उपस्थित होते.


पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी अहिल्याबाईंचा जन्म झाला. भारत या हिंदू देशांवर अनेक परकीय आक्रमणं झाली आणि अनेक राजांनी इथल्या मंदिरांची नासधूस केली.  मात्र हा इतिहास माहिती असतानाही अहिल्याबाईंनी मंदिरांच्या जिर्णोद्धाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. कोणाच्याही भावना न दुखावता अहिल्याबाईंनी मंदिराच्या जिर्णोद्धाराची जबाबदारी घेतली. देशभरातील बारा ज्योतिर्लिंग तसंच इतर मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम त्यांनी हाती घेतलं. अहिल्यादेवींनी तीर्थक्षेत्रांना फक्त उजाळाच दिला नाही तर शेकडो राज्यांमध्ये वाटल्या गेलेल्या देशाला त्यांनी मंदिरं, घाट, रस्ते, धर्मशाळा आणि बारवांच्या माध्यमातून जोडण्याचे अचाट आणि अफाट कार्य केले. भारत सरकारनेही त्यांच्या याच कार्याचा गौरव केला. त्यांच्या नावाने टपाल तिकीटही काढण्यात आले आणि आज अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पुरस्कारही भारत सरकारतर्फे दिला जातो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन सोनवणे यांनी तर उपस्थित त्यांचे आभार विठ्ठल गायकवाड यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !