इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी - म.न.से. व संभाजी ब्रिगेडची मागणी

 परळी तालुक्यातील चौपदरीकरणाच्या कामात शेकडो वर्षपूर्वीच्या मोठमोठ्या वृक्षांची तोड



 रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी - म.न.से. व संभाजी ब्रिगेडची मागणी


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

परळी तालुक्यातील अनेक रस्त्यांचे चौपदरीकरण होत आहे. या रस्त्याच्या कामासाठी शेकडो वर्ष वय असलेल्या मोठमोठ्या वृक्षांची तोड होत आहे. त्या बदल्यात रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

परळी - बीड, परळी - अंबाजोगाई, धर्मापुरी - परळी, परळी - गंगाखेड, परळी - सोनपेठ  या रोडचे रुंदीकरनाचे काम सध्या सुरु असून या रोडवर शेकडो वर्षाचे खूप मोठे मोठे वृक्ष होते ती वृक्ष रस्त्याच्या कामासाठी तोडण्यात येत आहेत. विकास कामे करताना अशा काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु या कारणाने नैसर्गिक गोष्टींची हानी होते आहे. हि होत असलेली हानी भरून काढण्यासाठी पण पाऊल उचलणे गरजेचे आहे. अगोदरच थर्मल पावर स्टेशन, सिमेंट फॅक्टरी, शेकडो विटभट्या यामुळे परळीकरांना उष्णतेच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत आहेत. त्यातच शेकडो वर्षाची महाकाय  वृक्ष तोडल्यामुळे या झळा आणखीन वाढणार आहेत. हे सर्व चक्र आटोक्यात अनन्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा तोडणी झाली त्याच्या चौपट वृक्ष लागवड करावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती 

संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, मनसेचे शहराध्यक्ष वैजनाथराव कळसकर, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज, मनसेचे शहर उपाध्यक्ष ऋषिकेश बारगजे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!