इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:शिवसेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी.

 अहिल्यादेवीनी महिलांच्या उत्कर्षासाठी मोठं योगदान तर दिलेच व मंदिराच्या माध्यमातून समाजाचा उद्धार केला -बाजीराव धर्माधिकारी

      शिवसेनेच्या  वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी

परळी वै:-

             राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी तत्कालीन विपरीत परिस्थितीत महिलांन साठी मोठं योगदान दिले,विशेषतःअनाथ निराधार महिलांच्या उत्कर्षासाठी उल्लेखनीय योगदान दिले व त्याबरोबरच देशातील अनेक मंदिराचें जीर्णोद्धार,निर्मिती व मंदिर परिसराचा विकास केला अहिल्यादेवीच्या या कार्यातून समाजाचा उद्धार झाला असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार ही अहिल्याबाईंनी  केला असल्याने त्यांचा पदस्पर्शाने आपली नगरी पावन झाली, असे मत माजी नगराध्यक्ष  बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

    शिवसेनेच्या  वतीने  पुण्यश्लोक 

 होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे गणेशपार येथे आयोजित करण्यात आले होते. 

   या कार्यक्रमा मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून, माजी पत्रकार संघ अध्यक्ष धनंजय आढाव,मराठा महासंघाचे शहराध्यक्ष शिवाजी देशमुख,बीड जिल्हा नियोजन समिती सदस्य वैजनाथ सोळंके,माजी नगरसेवक गोविंद कुकर,अनिल अष्टेकर,दीपक शिरसाठ, ईश्वर होंळबे,व्यापारी भगवानअप्पा हालगे,विनोद कौलवर, उदोजक विजय भुतडा,नगरसेवक गोविंद कुकर, युवक नेते मुजाभाऊ फुके, उपस्थित होते.   कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक शिवसेना नेते सचिन स्वामी यांनी करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ श्रीकांत शिंदे सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध प्रकारचे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव समिति अध्यक्ष शिवसेनेचे जेष्ठ  नेते संजय गावडे कदम यांनी तर सूत्रसंचालन गोविंद चिवडे यांनी केले. 

       याप्रसंगी पत्रकार धनंजय आढाव  यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गुणगौरव करतांना, आज देखील त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या जयंतीनिमित्त गाव भागातील माता भगिनी,बंधू  मोठया प्रमाणात उपस्थित होते

     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे संयोजक रमेश लोखंडे, जगन्नाथ गावडे कदम ,अजय दाणे,पांडुरंग पाणखडे,रमेश लोखंडे, राम कुकर बाळासाहेब कुकर,राजाभाऊ धुमाळ,बाळू धुमने या सह गणेशपार विभागातील असंख्य शिवसैनिक, नागरिक समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!