इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास ठक्कर, बाजीराव धर्माधिकारी,प्रा.दुबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात साजरी

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास  ठक्कर, बाजीराव धर्माधिकारी, प्रा.दुबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती  उत्साहात साजरी



परळी वैजनाथ/प्रतिनिधी 

परळी वैजनाथ येथील श्री वैजनाथ मंदिर येथे आज बुधवार दिनांक31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती ढोल ताशाच्या गजरात भंडारा उधळत उत्साहात साजरी करण्यात आली. 

शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )बीड उप जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा. अतुल दुबे सर यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी बोलताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की,

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता,पराक्रमी योद्धा,आणि सर्वश्रुत धनुर्धर ह्या सर्व गोष्टीमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपाटावर स्त्री व्यक्तिमत्वचा ठसा उमटवणाऱ्या, होळकर घराण्याचा 'तत्वज्ञानी राणी ' म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या अश्या ह्या महाराणी राजमाता होत्या असे सांगितले.

बाजीराव भैया धर्माधिकारी म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या पहिली स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला, एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता,पराक्रमी योद्धा,आणि सर्वश्रुत धनुर्धर ह्या सर्व गोष्टीमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपाटावर स्त्री व्यक्तिमत्वचा ठसा उमटवणाऱ्या, होळकर घराण्याचा 'तत्वज्ञानी राणी ' म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या होत्या असे सांगितले.

प्रा.अतुल दुबे म्हणाले की,ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर होत्या.सर्वधर्मसमभाव ,अस्पृश्यता उच्चाटन ,सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांना विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क ,प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील माणकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला होता असे सांगितले.

यावेळी माजी शहर संघटक संजय कुकडे,माजी नगरसेवक अनिल अष्टेकर,वैजनाथ सोळंके,जालिंदर नाईकवाडे, उपशहर प्रमुख किशन बुंदेले, तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, शिवाजीनगर  विभाग प्रमुख सुरेश परदेशी, प्रा. उद्धव मुळे,अमित कचरे, योगेश जाधव,जगदीश पवार, योगेश घेवारे, व्यंकटेश चव्हाण, सचिन लोढा, रवि देवकर, लक्ष्मण बोले, रघुनाथ बोले, शंकर गवते, राजाभाऊ गवते,अनिल बोले, आकाश गाडे, रवि बोले, अनंत बोले, सोमनाथ गवते, गणेश जावडे, गणेश होळकर, भगवान बोले, सुरेश होळकर, प्रकाश देवकर, लक्ष्मण मुंडे हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या