MB NEWS:लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महिला महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

 लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महिला महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)

             येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महाविद्यालयाने 12 वी बोर्ड परीक्षेत नेत्रदिपक यश प्राप्त करीत आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

       महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या 12वी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महाविद्यालयाच्या

कला शाखेतुन प्रथम नंदिनी वाल्मिक जाधव (८३), द्वितीय धनश्री केशव गुट्टे (८१.५०), तृतीय भाग्यश्री भालचंद्र पांचाळ (७९) टक्के तर विज्ञान शाखेतून प्रथम धनश्री अमित तांदळे (८२.६७),द्वितीय कल्याणी कोंडीबा वडूळकर (७९.६७),तृतीय स्नेहल शिवाजी शिंदे (७८.८३)  येण्याचा मान पटकावला. या महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल (८९.३३) असून ६ विद्यार्थिनी या विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाल्या आहेत. विज्ञान शाखेचा निकाल (९८.२४) तर विशेष प्राविण्यासह २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयाचा एकुण निकाल (९४.७०) टक्के लागला आहे. 

        विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक अनिलराव देशमुख, अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्राचार्य प्रा.डॉ. एल.एस.मुंडे, प्रा.प्रवीण नव्हाडे, प्रा.प्रवीण फुटके, प्रा.अशोक पवार, प्रा.विशाल पौळ, प्रा.आशिलता शिंदे, प्रा. विणा पारेकर, प्रा.आचार्य यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?