पोस्ट्स

पखवाज वादक सनतकुमार बडे यांचे सादरीकरण

इमेज
  ११ वीच्या विद्यार्थिनींचे वेलकम आणि 'अनाहत' मासिक संगीत सभा : महिला महाविद्यालयात उपक्रम  आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करा, मन लावून तळमळीने अभ्यास करा,नाव लौकिक आपोआप मिळते... पखवाज वादक सनतकुमार बडे ११ वीला प्रवेश घेताना आपले ध्येय निश्चित करा..त्यानुसार प्रवेश घ्या.व ध्येय पुर्ण करा..प्राचार्या डॉ विद्या देशपांडे परळी वैजनाथ दि.२६ (प्रतिनिधी)            येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात कनिष्ठ विभाग व संगीत विभागाच्या वतीने ११ वीच्या विद्यार्थ्यांना वेलकम व 'अनाहत' मासिक संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.                     लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ११ वीच्या विद्यार्थ्यांना वेलकम व 'अनाहत' मासिक संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, प्रमुख पाहुणे सनतकुमार बडे, प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद

इमेज
  पीएम किसान योजनेतील लाभार्थींना एका क्लिकवर 14 व्या हप्त्याचे गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते वितरण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन वेबलिंकद्वारे या 'किसान संमेलना'स सहभागी होण्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद मुंबई (दि. 26) - देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 27) सकाळी 11 वा. राजस्थान मधील सीकर येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने आयोजित 'पीएम किसान संमेलन' कार्यक्रमाच्या निमित्ताने पीएम किसान सन्मान योजनेतील 8.5 कोटी लाभार्थींच्या खात्यावर पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याची रक्कम एका क्लिक द्वारे वितरित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी वेबलिंकच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 2019 साली शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने पीएम किसान योजना सुरू करण्यात आली. याद्वारे देशातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खा

तहसील कार्यालयासमोर केली तीव्र निदर्शने

इमेज
  मणिपूर व बेडग घटनेच्या निषेधार्थ अंनिस व समविचारी संघटनांचे राष्ट्रपतींना निवेदन   तहसील कार्यालयासमोर केली तीव्र निदर्शने परळी प्रतिनिधी.   मनिपुर येथे महिलांची नग्न धिंड काढून बलात्कार करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करावे तसेच सांगली जिल्ह्यातील बेडग येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कमान पाडणाऱ्या जातीवादी आरोपीवर कठोर कारवाई करावी  या मागणीसाठी परळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने देशाच्या राष्ट्रपतींना परळी तहसीलदार यांच्या  मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.        माणुसकीला काळीमा फासणारी घटना 4  मे रोजी मणिपूर येथे घडली. या घटनेत वीस वर्षीय तरुणीसह तीन महिलांची नग्न धिंड काढून  सामूहिक बलात्कार करण्यात आला.  महिलेच्या  वडिलांची व भावाची हिंसक जमावाने हत्या केली. या प्रकरणास राज्य व केंद्र सरकार जबाबदार आहे. तर सांगली जिल्ह्यातील बेडग येथे जातीवाद्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेली कमान उध्वस्त केली. या घटनेतील आरोपींनाही अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती शा
इमेज
काशी जगद्गुरु डॉ.श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचे उद्या परळीत सामूहिक ईष्टलिंग महापूजा व आशिर्वचन *परळी वैजनाथ/ प्रतिनिधी* श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट परळी यांच्या वतीने उद्या गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी श्री श्री श्री 1008 डॉ.श्री क्षेत्र काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सामूहिक ईष्टलिंग महापूजा व आध्यात्मिक आशीर्वाचनाचे आयोजन परळी वैजनाथ येथे करण्यात आले आहे अशी माहिती श्री ष.ब्र. 108  नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज मठ संस्थान सोनपेठ यांनी दिली. उद्या गुरुवारी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने लोककल्याणार्थ श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी श्रीक्षेत्र काशी यांचे सामूहिक ईष्टलिंग महापूजा व अध्यात्मिक आशीर्वाचन होणार आहे. सकाळी नऊ ते अकरा वाजता ईष्टलिंग महापूजा, बिल्वार्चन व तीर्थप्रसाद तर दुपारी बारा वाजता आध्यात्मिक आशीर्वचन श्री वैजनाथ मंदिर प्रवचन सभा मंडप येथे होणार आहे.  या धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य मार्गदर्शक श्री क्षेत्र 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज मठ संस्थान सोन

पंकजाताई मुंडेंच्या वाढदिवशी परळीत भाजपचा सामाजिक सेवा उपक्रम

इमेज
  पंकजाताई मुंडेंच्या वाढदिवशी परळीत भाजपचा सामाजिक सेवा उपक्रम मोफत आधारकार्ड अपडेट कॅम्पमुळे नागरिकांची झाली सोय ; संपर्क कार्यालयात लाभार्थ्यांची एकच गर्दी सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक वितरण, वृत्तपत्र वितरकांना रेनकोट,  वृक्षारोपण, बेल-फुल विक्रेत्यांना छत्री वाटप परळी वैजनाथ ।दिनांक २६। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस भाजपच्या वतीनं आज विविध सामाजिक सेवा उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. मोफत आधारकार्ड अपडेट कॅम्पला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यासाठी नागरिकांनी संपर्क कार्यालयात एकच गर्दी केली होती.  सुकन्या समृद्धी योजनेचे मोफत पासबुक, वृत्तपत्र वितरकांना रेनकोट, बेल-फुल विक्रेत्यांना छत्री, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,   वृक्षारोपण आदी भरगच्च  कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलं होतं. ● *पंकजाताई मुंडे अभिष्टचिंतन लेख: स्वाभिमानी अन् कणखर* >>>> >>>> >>> ✍️ *प्रदीप कुलकर्णी*   राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेलं संकट लक्षात घेऊन वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय पंकजाताईंनी घेतला होता. तथापि भाजपच्या वतीनं

पंचम ज्योतिर्लिंग:परळी वैजनाथ

इमेज
भारत पुरातत्व विभाग व महाराष्ट्र-सरकारने गॅझेटद्वारे  बारा ज्योतीर्लिंगातील पाचवे ज्योतीर्लिंगाची नोंद अधिकृत करावी -चेतन सौंदळे परळी वैजनाथ/ प्रतिनिधी    संत मोरारी बापूंच्या द्वादश ज्योतीर्लिंगाच्या यात्रेतून श्री.वैजनाथ ज्योतीर्लिंग परळीचे नांव वगळून वक्तव्याद्वारे झारखंड मधील वैद्यनाथ धामला ज्योतीर्लिंगाचे स्थान देऊन ज्योतीर्लिंग व धाम मध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे त्यामुळे भाविक-भक्तांमध्ये तीव्र संताप व निषेध व्यक्त केला जात आहे.    महाराष्ट्र राज्यामधील स्वंयभू श्री.वैजनाथ ज्योतीर्लिंग परळी-वैजनाथ पुराण काळापासून धार्मिक,पुरातत्व, सामाजिक,एैतिहासिक,व भौगोलिकदृष्टया भारतातील बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असल्यामुळेच काशी विश्वनाथ,उज्जैन महाकाल ज्योतीर्लिंगाप्रमाणे वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळीचा कॉरिडॉर व प्रसाद योजने अंतर्गतमध्ये समावेशाची मंजुरी मिळवण्याकरिताचा प्रस्ताव राज्य सरकारद्वारे भारत सरकारकडे पाठविण्याकरिता विद्यमान कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी लक्षवेधीद्वारे विधीमंडळात मांडली होती तसेच वैद्यनाथ कॉरिडॉर समिती,परळी वैजनाथच्या माध्यमातून याबाबतचा पाठपुर

खता-बियांच्या बोगसगिरीवर आळा घालण्यासाठी कायद्याची व्यापक संरचना सुरू

इमेज
  खतांचे लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवरही आता गुन्हे दाखल होणार - धनंजय मुंडे नव्या कायद्याच्या माध्यमातून खता-बियांच्या बोगसगिरीवर आळा घालण्यासाठी कायद्याची व्यापक संरचना सुरू - धनंजय मुंडेंची विधानसभेत माहिती राज्यासाठी कायदा करण्याचा विधिमंडळाला पूर्ण अधिकार - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनला अधिवेशन संपताच होणार सुरुवात - धनंजय मुंडेंची घोषणा थकीत देयके व अर्धवट कामेही पूर्ण करणार राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण अभियानातील अनुदानाचे लवकरच वितरण केले जाईल सबंध प्रश्नोत्तराचा तास कृषी विभागावर चर्चा! मुंबई (दि. 26) - मोठ्या व प्रसिद्ध असलेल्या कंपन्या जास्त मागणी असलेल्या खताच्या सोबत आपल्याकडे उत्पादित करण्यात आलेले परंतु विक्री होत नसलेली खते शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी डीलर व कृषी सेवा केंद्रांना सक्ती करायला लावतात. गरज नसताना पैसे खर्चून शेतकऱ्यांना ती खते विकत घ्यावी लागतात, यावर चाप बसवण्याच्या दृष्टीने आता थेट संबंधित कंपनीच्या मालकावरच गुन्हा दाखल करण्याचे प्रावधान अस्तित्वात आणले जाईल; अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय
इमेज
  पत्रकारांकरिता कल्याणकारी योजना राबविण्यासाठी उच्चस्तरीय अभ्यासगट- मंत्री शंभूराज देसाई             मुंबई, दि. २५ : राज्यातील पत्रकारांकरिता कल्याणकारी योजना राबविण्यासाठी उच्चस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले.             सदस्य धीरज लिंगाडे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबतची मागणी केली होती.             उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अभ्यासगटाचा अहवाल डिसेंबरच्या अधिवेशनापूर्वी घ्यावा, बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील पत्रकारांची संख्या वाढवावी, 60 वर्षे वयापूर्वी असाध्य आजार झाल्यास त्यांचा या योजनेत समावेश करावा, अधिस्वीकृतीसाठी संपादकांच्या शिफारशींची आवश्यकता शिथिल करावी आदी सूचना केल्या.             शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती देताना मंत्री श्री.देसाई म्हणाले की, पत्रकार संरक्षण कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. अधिस्वीकृती पत्रिकाधारक पत्रकारांसाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. पत्रकारांना दुर्धर आजार

अभिष्टचिंतन लेख ✍️ अश्विन मोगरकर, परळी वैजनाथ >>>>महाराष्ट्राचा आशादायक व अश्वासक चेहरा

इमेज
  महाराष्ट्राचा आशादायक व अश्वासक चेहरा ---------------------------------------------------       26 जुलै, आज लोकनेत्या मा. पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस. ताईंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.            ✍️ अभिष्टचिंतन: अश्विन मोगरकर  --------------------------------------------------- स ध्याच्या राजकारणात लोकांना न रुचणार्या अनेक गोष्टी घडत असताना लोकनेत्या मा. पंकजाताई मुंडे यांच्या सारखे काही स्वच्छ व रोखठोक राजकारणी बोटावर मोजण्या इतकेच बघायला मिळतात. महाराष्ट्राच्या राजकारणाला अनपेक्षित घटना रोजच्याच झाल्या आहेत. अशा काळात आपल्या पक्षाशी, जनतेला दिलेल्या शब्दाशी प्रामाणिक राहून काम करत राहणाऱ्या पंकजताईंचे वेगळेपण दिसून येते. पंकजाताई मुंडे या महाराष्ट्रातील जनतेला राजकारणातील आशेचा किरण दिसतात. पंकजाताई दोन वेळेला आमदार झाल्या, विविध खात्यांचे मंत्रिपद त्यांनी समर्थपणे सांभाळले. त्यांच्या मंत्रिपदाचा काळात बीड जिल्ह्यात ग्रामीण रस्त्यांचे जाळे, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, जलयुक्त शिवार, आरोग्य केंद्र, प्रशासकीय इमारती, यासह अनेक योजना यशस्वीरित्या राबवल्या. महा आरोग्य शिबीराचे आ

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 11 लाख शेतकऱ्यांनी भरला एक रुपयात पीकविमा!

इमेज
  पोकरा योजनेची व्याप्ती वाढविणार - धनंजय मुंडे राज्यात आतापर्यंत 1 कोटी 11 लाख शेतकऱ्यांनी भरला एक रुपयात पीकविमा! *मराठवाडा वॉटर ग्रीड साठी सरकार प्रयत्नशील - धनंजय मुंडेंची विधानपरिषदेत माहिती* मुंबई (दि. 25) - ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात लागू व्हावी, असे उद्दिष्ट आहे, भविष्यात यादृष्टीने आवश्यक निर्णय घेतले जातील. जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यापर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी, असा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत बोलताना दिली.  सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नियम 260 अन्वये उपस्थित चर्चेच्या उत्तरात धनंजय मुंडे बोलत होते.  आज सकाळीच माहिती घेतली असता, राज्यात या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत आजपर्यंत तब्बल 1 कोटी 11 लाख शेतकऱ्यांनी एक रुपयात पिकविमा भरला असून, ही संख्या दररोज 6 ते 7 लाखांनी वाढत आहे. याचाच अर्थ शेतकऱ्यांना पीकविमा योजना अधिक सोयीची झाल्याचे स्पष्ट होते, असे मत धनं

● पंकजाताई मुंडे अभिष्टचिंतन:स्वाभिमानी अन् कणखर >>>> ✍️ प्रदीप कुलकर्णी

इमेज
  स्वाभिमानी अन् कणखर ---------------------------------------                 ✍️ प्रदीप कुलकर्णी -------------------------------------- पंकजाताई मुंडे... महाराष्ट्राच्या राजकारणातला एक वलयांकित चेहरा..दमदार, कणखर आणि आश्वासक युवा नेतृत्व म्हणूनही आज त्यांचेकडं पाहिलं जातं. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा सक्षम राजकीय वारसा समर्थपणे पुढे घेऊन जात असताना राजकारणा सोबतच समाजकारणातही कायम आघाडीवर असलेलं हे व्यक्तीमत्व.. समाजातील वंचित, पिडित घटकांच्या सेवेसाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, त्या मुंडे साहेबांचे अधुरे स्वप्न पुर्ण करण्याचा ध्यास घेत, येणा-या प्रत्येक संकटावर मात करत अविरतपणे वाटचाल करणारे   हे धुरंधर नेतृत्व आज सर्व सामान्य कार्यकर्त्यांचं प्रेरणास्थान बनलं आहे. पंकजाताई मुंडे यांची राजकीय कारकीर्द सुरवातीपासून तशी संघर्षाचीच.. तरीही त्यावर स्वकर्तृत्वाने मात करत मिळालेल्या प्रत्येक संधीचा उपयोग त्यांनी लोकांच्या भल्यासाठीच केला.  एक सरळमार्गी राजकारणी, जनतेच्या अडी- अडचणीला धावून जात त्यांच्या वेदना समजून घेण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.  महाराष्ट्रातील लाखो- करोडो कार्यक

बहुसोमयाजी यज्ञमार्तंड प. पु. श्री दीक्षित यज्ञेश्वरजी रंगनाथ सेलूकर महाराज यांची उपस्थिती

इमेज
  परळीत पुरुषोत्तम मासा निमित्त रविवारी धोंडे दान कार्यक्रम बहुसोमयाजी यज्ञमार्तंड प. पु. श्री दीक्षित यज्ञेश्वरजी रंगनाथ सेलूकर महाराज यांची उपस्थिती परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      बहुसोमयाजी यज्ञमार्तंड प. पु. श्री दीक्षित यज्ञेश्वरजी रंगनाथ सेलूकर महाराज यांना पुरुषोत्तम मासानिमित्त रविवारी धोंडे दान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.           रविवार, दि. ३० जुलै २०२३ रोजी श्रध्दा मंगल कार्यालय, पंचवटी नगर, परळी वैजनाथ. येथे समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 'अधिकस्य अधिकं फलम्' या उक्तीनुसार प.पु. गुरुवर्यांना अर्पण करण्यासाठी धोंडे दान कार्यक्रम होणार आहे.त्यासोबत सामुहिक श्रीसुक्त हवन, पाद्यपुजा आयोजित केली आहे.सकाळी ७.०० वा. - अग्निमंथन सकाळी ८.३० वा. सामुहिक श्रीसुक्त हवन - सकाळी ९ ते १० - पाद्यपूजा सकाळी १० ते १२ - धोंडेदान होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री. सेवा प्रतिष्ठान, यज्ञ सेवा समिती, परळी वैजनाथ यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी  वाल्मिकराव गित्ते ९६३७८०१७७७, प्रविण तोताडे ९८६०८४०८२० अजय सावजी ९८६०८०६२७९, दिपक कुलकर्णी ९७६५३९४३३१ भूषण अंबेक

पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस परळीत सामाजिक सेवा उपक्रमांनी होणार साजरा

इमेज
  पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस परळीत सामाजिक सेवा उपक्रमांनी होणार साजरा मोफत आधारकार्ड अपडेट कॅम्प, सुकन्या समृद्ध योजनेचे पासबुक वितरण, रेनकोट वाटप, वृक्षारोपण आदी उपक्रमांचे आयोजन परळी वैजनाथ ।दिनांक २४। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस भाजपच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. मोफत आधारकार्ड अपडेट कॅम्प, सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक वितरण, रेनकोट वाटप, वृक्षारोपण आदी  कार्यक्रमांचं आयोजन यादिवशी करण्यात आलं आहे.      पंकजाताई मुंडे यांचा येत्या २६ जुलै रोजी वाढदिवस आहे.  राज्यातील अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांवर आलेलं संकट लक्षात घेऊन वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय पंकजाताईंनी घेतला आहे. तथापि भाजपच्या वतीनं त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने २६ जुलै रोजी सकाळी ७ वा. - प्रभू वैद्यनाथास अभिषेक, ८ वा. मेरू गिरी डोंगरावर वृक्षारोपण,  सकाळी ८.३० वा.  मलिकपुरा येथे दाऊद अली शहाबाबा  दर्गा येथे चादर अर्पण, ९ वा. भीमनगर सुगंध कुटी, बुध्द विहार, जगतकर गल्ली येथे बुध्दवंदना, ९.३० वा. उप जिल्हा रूग

विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरु

इमेज
  जुलै महिन्याच्या उर्वरीत कालावधीमध्ये मराठवड्यामध्ये पेरण्यांना वेग येईल : कृषिमंत्री धनजंय मुंडे विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरु  मुंबई, दि.24: भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार माहे, जुलै महिन्याच्या उर्वरीत कालावधीमध्ये पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज प्राप्त आहे. त्यामुळे मराठवाड्यात पुढील काळात पेरण्यांना वेग येईल तसेच शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये म्हणून एक रुपयात पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. दि. 24 जुलै रोजी प्राप्त माहितीनुसार 1 कोटी 4 लाख 68 हजार 349 शेतकरी पिक विमा योजनेत सहभागी झाले असून  विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढविण्याबाबत कृषि विभागाकडून प्रयत्न सुरु आहे, असे उत्तर कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी विधानपरिषदेत दिले.   मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने २० लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकरी हवालदील झालेला आहे याची चौकशी करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची सूचना विधान परिषद सदस्य अंबादास दानवे  यांनी विधानपरिषद नियम ९३ अन्वये मांडण्यात आली.या निवेदनाचे उ
इमेज
  हिवरा (गोवर्धन) येथे भरली शेतीशाळा परळी तालुक्यातील हिवरा (गोवर्धन) येथे सोयाबीन पीक संबंधी शेतीशाळा आयोजित करण्यात आली.  राज्याच्या कृषि विभागा मार्फत एम.एस. टोम्पे (शिंदे) मॅडम यांनी शेतीशाळेला मार्गदर्शन केले.    पहिली फवारणी ही कीटकनाशक व बुरशीनाशकाची करावी ज्यानेकरून कीड नियंत्रण होईल. गोगलगायच्या नियंत्रणासाठी गुळाचे पाणी हा चांगला उपाय म्हणून पुढं येत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, प्रश्न व त्यावर उपाययोजना यासंदर्भात चर्चा झाली.    यावेळी राजेसाहेब निर्मळ, बाबासाहेब गिलबिले, स्वप्नील निर्मळ, भागवत निर्मळ, भीमराव कदम, नवनाथ निर्मळ, भीमराव निर्मळ, प्रदीप रासवे, सचिन निर्मळ, भारत तपसे, अंगद निर्मळ, आत्माराम निर्मळ, सुखदेव चिंचाने, व्यंकटेश निर्मळ, नवले, टी.के. निर्मळ, रघु रासवे इत्यादी शेतकरी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
इमेज
  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा परळीत मेळावा युवक आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व तरुणांनी उपस्थित राहण्याचे युवक आघाडीच्या वतीने आवाहन परळी वैद्यनाथ (दि. 23) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते, राज्याचे कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत परळी वैद्यनाथ शहरात युवक आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  हा मेळावा परळी शहरातील आर्य वैश्य मंगल कार्यालय (नेहरू चौक तळ) याठिकाणी सायंकाळी 5 वा. आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, डॉ.संतोष मुंडे,  राष्ट्रवाद

सपोनि प्रवीण जाधव यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

इमेज
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो यूनियन रेल्वे स्टेशन परळीच्या अध्यक्षपदी बाबा शेख, उपाध्यक्ष गायकवाड, सचिवपदी व्हावळे यांची निवड सपोनि प्रवीण जाधव यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार    परळी प्रतिनिधी  डॉ बाबासाहेब आंबेडकर ऑटो यूनियन, रेलवे स्टेशन परळीच्या अध्यक्षपदी बाबा शेख, उपाध्यक्ष वि. एस. गायकवाड, सचिवपदी सुनील व्हावळे तर कोषाध्यक्ष तिरुपती व्हावळे यांची निवड करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत संभाजी नगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान साकसमुद्रे हे होते. सदरील  निवडीची बैठक दि २३ जुलै रोजी रेल्वे स्टेशन डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क परळी येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. यावेळी प्रा दासू वाघमारे, पोलीस अंमलदार एम एम घुगे हे हि होते. परळी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात ऑटो यूनियन नसल्याने अनेक समस्या उद्भवत होत्या.परंतु आता रेल्वे ऑटो यूनियन चे पदाधिकारी, संभाजी नगर पोलीस स्टेशन परळी आणि रेल्वे प्रशासन यांच्य

दुख:द वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  प्रताप देशमुख यांचे निधन परळी / प्रतिनिधी           गणेशपार भागातील प्रतिष्ठित नागरिक प्रताप आनंदराव देशमुख (वय ५1) यांचे रविवारी (दि. 23 जुलै) पहाटे 1.30  वाजता लातूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैद्यनाथ मंदिरामागील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.            त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नात व दोन भाऊ, असा परिवार आहे. वैद्यनाथ विद्यालयातील क्रीडाशिक्षक संजय उर्फ पापा देशमुख व शिवाजी देशमुख शहर अध्यक्ष मराठा महा संघ व परळी शहर कॉग्रेस सरचिटणीस यांचे ते वडील बंधू होत.
इमेज
 ◆मणिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ परळीत तीव्र आंदोलन ●मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा-  अजय बुरांडे  परळी / प्रतिनिधी     देशाच्या मणिपुर राज्यात मागील तीन महिन्यापासुन हिंसाचार सुरू आहे. खुलेआम महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढून बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी तसेच या घटनेत जबाबदार असणाऱ्या केंद्र राज्य सरकारच्या निषेधार्थ परळीत माकपने आयोजित केलेल्या निषेध आंदोलनात सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला. याप्रसंगी बोलताना अजय बुरांडे म्हणाले की, मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नितांत गरज आहे.      महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामुहिक आत्याचार केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारीत झाल्याने देशातील जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ माकपणने रविवार दि 23 रोजी परळी येथील राणी लक्ष्मीबाई टावर चौकात निदर्शने आंदोलन आयोजित केले होते. याप्रसंगी या घटनेस जबाबदार असणाऱ्या मणिपूर राज्य सरकारचा तसेच केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध करण्यात आला.     य

पाणी फाउंडेशनचे महेश लाखे गंभीर जखमी

इमेज
  पुन्हा घाटामध्ये दुर्घटना:एका जागेवरच सहा वाहनांचा अपघात पाणी फाउंडेशनचे महेश लाखे गंभीर जखमी धारूर, प्रतिनिधी धारूर घाटात 23 जुलै रविवारी सकाळी साडेआठ  सुमारास विचित्र अपघात झाला. या अपघातात सहा वाहने आपसात धडकली त्यातील दुचाकीस्वार गंभीर जखमी असून जखमी महेश लाखे यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेमध्ये घेऊन अंबाजोगाई येथील एस आर टी येथे नेण्यात आले.अरुंद रस्त्यामुळे रोज अपघातात प्रवाशांचा बळी जात आहेत.     धारूर घाटातील अरुंद रस्ता व अवघड वळणामुळे सतत अपघात होत असलेल्या धारुर घाटात  23 जुलै रविवार रोजी सकाळी पुन्हा विचित्र अपघात झाला. घाटातील एका अवघड वळणावर सिमेंट घेऊन जाणारा वाहन व चार चाकी mh 22 AW3109 किया कंपनीच्या गाडीला अपघात केला. हा अपघात होतो का नाही त्याच जागेवर त्याच वेळेमध्ये अपघातग्रस्त असलेल्या जागेवर दुसरा सिमेंट घेऊन जाणारा वाहनाने दुचाकीस्वाराला मागून धडक बसल्याने दुचाकी mh 23 J 9310 समोर असलेल्या क्रुझर mh 13  DE1478 ला मागून जाऊन आदळली. तर क्रूजर च्या पुढे एका टिप्परवळ क्रुझर आदळी त्यात टिप्पर वाला तिथून फरार झाला या अपघातामध्ये दुचाकी वरील एक जण गंभीर जखमी आहे. जखमी

नमन:सत्कार

इमेज
  शिवा अ.भा. वीरशैव युवक संघटनेच्या वतीने सत्कार   श्री श्री श्री 1008 सुर्य सिंहासनाधीश्वर जगद्गुरु डॉ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल अधिकमास निमित्त ईष्टलिंग महापुजा व तीन दिवसीय अनुष्ठाण निमित्त परळी वैजनाथ येथे आले होते आज अनुष्ठान समाप्ती च्या वेळी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना परळी वैजनाथ च्या वतीने महास्वामीजी चा सत्कार करून दर्शन घेतले यावेळी उपस्थित मा.नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष शिवा संघटना अनिल अष्टेकर, शहराध्यक्ष गणेश वारकरे,रवी सोरडगे, ओमकार मुतुंगे, शैलेश कापसे, योगेश घेवारे, काशीनाथ कापसे , दर्शन सपाटे इतर उपस्थित होते

यश: हार्दिक अभिनंदन

इमेज
  इंजिनियरिंग पदवी परीक्षेत चि.अक्षय संजय क्षिरसागर चे यश परळी-  बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इनस्टुट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती चा विद्यार्थी चि.अक्षय संजय क्षिरसागर याने सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथुन इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकमुनिकेशन इंजिनियरिंग (E &T C) मध्ये 71 टक्के मार्क घेऊन प्रथम श्रेणीत नुकताच उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे.                              परळी शहरातील क्षिरसागर घराण्यातला अक्षय हा बनला पहिला अभियंता त्याने त्याच्या आजोबांचे स्वप्न पूर्ण केले आहे.चि.अक्षय क्षिरसागर याने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बिनविरोध निवड

इमेज
 एस. टी.कामगार संघटनेच्या विभागीय कार्याध्यक्षपदी रमेश गित्ते यांची बिनविरोध निवड                                   परळी (प्रतिनिधी) - परळी आगार एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा  एस टी कर्मचारी सी. सी.सी.बँकेचे मराठवाडयाचे अध्यक्ष रमेशभाऊ गित्ते यांची बीड विभागाच्या कामगार संघटनेच्या कार्याध्यक्षपदी  बिनविरोध निवड झाली.                                         सतत कामगाराच्या प्रश्नावर आवाज उठविणारे ,विविध कार्यक्रम घेऊन ते यशस्वी करणारे रमेशभाऊ गित्ते यांची एस.टी.कामगार संघटनेच्या बीड विभागाच्या  कार्याध्यक्षपदी  बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.              एस टी कामगार संघटनेची बीड विभागाची वार्षीक सर्वसाधारण सभा बीड येथे नुकतीच संपन्न झाली.या सभेत परळी आगाराचे अध्यक्ष व एस टी कर्मचारी सि सि एस बँकेचे मराठवाड्याचे अध्यक्ष रमेश गित्ते यांची बीड विभागाच्या कार्याध्यक्ष पदी सर्वानुमते बिनविरोध निवड झाली एस. टी कर्मचाऱ्यांसोबत  रमेश गित्ते हे परिवारातील सदस्यासारखे राहतात.    त्यांच्या अडी-अडचणीच्या काळात आपले सहकारी असणारे एस. टी.  कर्मचाऱ्यांच्या पाठीश

श्रीशैल जगद्गुरूंच्या हस्ते परळी-कपीलधार थेट बससेवा सुरू

इमेज
    जगद्गुरूंच्या हस्ते परळी-कपीलधार थेट बससेवा सुरू भाविकांतून मागणी आली: परळीतून ' धनुभाऊंनी' लगेच बस सुरु केली परळी (प्रतिनिधी)....      परळी ते कपीलधार  बससेवा सुरू करण्याची भाविकांतून मागणी करण्यात आली होती.याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनाही निवेदन करण्यात आले होते.या मागणीची तात्काळ दखल घेत संबंधितांना  ही बससेवा सुरु करण्याचे निर्देश दिले.विशेष म्हणजे परळी येधे अनुष्ठानाला आलेल्या श्रीशैल जगद्गुरूंच्या हस्ते परळी-कपीलधार थेट बससेवेचा प्रत्यक्ष शुभारंभही करण्यात आला आहे. प्रभू वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळी-वैजनाथ ते श्रीसंत मन्मथ स्वामी मंदीर,कपीलधार(मांजरसुंभा) नियमित थेट बससेवा सुरू करण्याचा शुभारंभ शनिवार दि.22जुलै रोजी श्रीश्रीश्री 1008 सूर्य सिंहासनाधिश्वर जगद्गुरू डॉ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ष.ब्र.नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज,सोनपेठ,अमृतेश्वर शिवाचार्य महाराज,जिंतूर,शंभूलिंग शिवाचार्य महाराज,अंबाजोगाई यांची  प्रमुख उपस्थिती होती.परळी-कपीलधार थेट बससेवेची मागणी श्री.वैजनाथ मंदीर देवस्थानचे विश्वस्त
इमेज
  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकविमा योजनेचा एक रुपयामध्ये लाभ घ्यावा - अनिल बोर्डे गेवराई,(प्रतिनिधी)-  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकविमा योजनेचा एक रुपयामध्ये लाभ घ्यावा, असे आवाहन बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी सदस्य तथा गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख अनिल बोर्डे यांनी केले आहे.   कृषी कार्यालय गेवराई व ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जुलै २०२३ रोजी दुपारी १-३० वाजता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी शासकीय सदस्य तथा गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख अनिल बोर्डे यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडले. या प्रश्नाबाबत तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते यांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांवर कधीही नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ विमा भरणे आवश्यक आहे. विम्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ असून त्यापूर्वी शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये विमा काढून घ्यावा. विमा भरताना शेतकरी वर्गाने सतर्क राहावे. शेतकऱ