पखवाज वादक सनतकुमार बडे यांचे सादरीकरण

 ११ वीच्या विद्यार्थिनींचे वेलकम आणि 'अनाहत' मासिक संगीत सभा : महिला महाविद्यालयात उपक्रम 

आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करा, मन लावून तळमळीने अभ्यास करा,नाव लौकिक आपोआप मिळते... पखवाज वादक सनतकुमार बडे


११ वीला प्रवेश घेताना आपले ध्येय निश्चित करा..त्यानुसार प्रवेश घ्या.व ध्येय पुर्ण करा..प्राचार्या डॉ विद्या देशपांडे

परळी वैजनाथ दि.२६ (प्रतिनिधी)

           येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात कनिष्ठ विभाग व संगीत विभागाच्या वतीने ११ वीच्या विद्यार्थ्यांना वेलकम व 'अनाहत' मासिक संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

                    लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ११ वीच्या विद्यार्थ्यांना वेलकम व 'अनाहत' मासिक संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, प्रमुख पाहुणे सनतकुमार बडे, प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ११ वीच्या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पखवाज वादक सनतकुमार बडे यांनी सांगितले की,संगीत क्षेत्राचा इतिहास फार प्राचीन आहे. विद्यार्थ्यांनी आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे, त्या आपापल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर केले पाहिजे. संगीत क्षेत्रात करिअर करायचे असेल तर सर्व झोकून देऊन अध्ययन केले पाहिजे. तर प्राचार्या डॉ देशपांडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेताना आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. व ते ध्येय पुर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. प्रा.प्रसाद देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मानवी जीवनात संगीताचे महत्व. पखवाज आणि संगीताचा आजवरचा विकास आणि 'अनाहत' या मासिक संगीत सभेच्या आयोजना मागची पार्श्वभूमी प्रास्ताविकात मांडली व मार्गदर्शन केले. तर संजय देशमुख यांनी अध्यक्षीय समारोप केला. यानंतर सनतकुमार बडे यांनी अनाहत संगीत मासिक सभेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने  पखवाज वादन केले. सनतकुमार बडे यांनी तब्बल एकतास पखवाज वादन कले ज्यात ताल चौतल मध्ये  विविध रेले, चक्रधार,  फर्मायीशी चक्रधार , परन व स्तुती परन सदर करुण उपस्थितांची दाद मिळविली आणि  विद्यार्थ्यांना या बद्दल संपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

•••




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !