इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

तहसील कार्यालयासमोर केली तीव्र निदर्शने

 मणिपूर व बेडग घटनेच्या निषेधार्थ अंनिस व समविचारी संघटनांचे राष्ट्रपतींना निवेदन 



 तहसील कार्यालयासमोर केली तीव्र निदर्शने

परळी प्रतिनिधी.   मनिपुर येथे महिलांची नग्न धिंड काढून बलात्कार करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करावे तसेच सांगली जिल्ह्यातील बेडग येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कमान पाडणाऱ्या जातीवादी आरोपीवर कठोर कारवाई करावी  या मागणीसाठी परळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने देशाच्या राष्ट्रपतींना परळी तहसीलदार यांच्या  मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 

      माणुसकीला काळीमा फासणारी घटना 4  मे रोजी मणिपूर येथे घडली. या घटनेत वीस वर्षीय तरुणीसह तीन महिलांची नग्न धिंड काढून  सामूहिक बलात्कार करण्यात आला.  महिलेच्या  वडिलांची व भावाची हिंसक जमावाने हत्या केली. या प्रकरणास राज्य व केंद्र सरकार जबाबदार आहे. तर सांगली जिल्ह्यातील बेडग येथे जातीवाद्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेली कमान उध्वस्त केली. या घटनेतील आरोपींनाही अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळीच्या वतीने भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन परळीचे येथे तहसीलदार यांनी स्वीकारले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी  मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सुध्दा केली. 

   आंदोलनात शहरातील पुरोगामी व समविचारी पक्ष आणि संघटनांचे सर्वश्री रिपाईचे राज्यसचिव भास्कर नाना रोडे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर, मनसेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, प्रा. दासू वाघमारे, प्रा. विलास रोडे, विजयकुमार गंडले, विठ्ठलराव झिलमेवाड, अनिल मस्के, गोपाळ आघाव, रानबा गायकवाड, नवनाथ दाने ,अशोक मुंडे, सुकेशनी नाईकवाडे, संजीव राय, गंगाधर आप्पा रोडे, शंकर काटकर, प्रशांत कामाळे, आर.ए.रोडे आदी उपस्थित होते.

•••




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट