अभिष्टचिंतन लेख ✍️ अश्विन मोगरकर, परळी वैजनाथ >>>>महाराष्ट्राचा आशादायक व अश्वासक चेहरा

  महाराष्ट्राचा आशादायक व अश्वासक चेहरा

---------------------------------------------------

      26 जुलै, आज लोकनेत्या मा. पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस. ताईंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 

          ✍️ अभिष्टचिंतन: अश्विन मोगरकर 

---------------------------------------------------

ध्याच्या राजकारणात लोकांना न रुचणार्या अनेक गोष्टी घडत असताना लोकनेत्या मा. पंकजाताई मुंडे यांच्या सारखे काही स्वच्छ व रोखठोक राजकारणी बोटावर मोजण्या इतकेच बघायला मिळतात. महाराष्ट्राच्या राजकारणाला अनपेक्षित घटना रोजच्याच झाल्या आहेत. अशा काळात आपल्या पक्षाशी, जनतेला दिलेल्या शब्दाशी प्रामाणिक राहून काम करत राहणाऱ्या पंकजताईंचे वेगळेपण दिसून येते. पंकजाताई मुंडे या महाराष्ट्रातील जनतेला राजकारणातील आशेचा किरण दिसतात.

पंकजाताई दोन वेळेला आमदार झाल्या, विविध खात्यांचे मंत्रिपद त्यांनी समर्थपणे सांभाळले. त्यांच्या मंत्रिपदाचा काळात बीड जिल्ह्यात ग्रामीण रस्त्यांचे जाळे, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, जलयुक्त शिवार, आरोग्य केंद्र, प्रशासकीय इमारती, यासह अनेक योजना यशस्वीरित्या राबवल्या. महा आरोग्य शिबीराचे आयोजन करून शेकडो गोरगरीब रूग्णांना मोफत आरोग्य उपचार उपलब्ध करून दिले. शेतक-यांना विमा तसेच वेगवेगळ्या स्वरूपात अनुदान मिळवून दिले. 

आजही जिल्ह्यातील अनेक योजना त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या आहेत. दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी कमी करून शेतीतील पाणी वाढविण्याचे स्वप्न घेऊन सुरू झालेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे अनेक शेतकरी नगदी पिकाकडे वळले व त्यांची आर्थिक उन्नती झाली. मंत्री पंकजाताई मुंडे या योजनेच्या शिल्पकार होत्या. मंत्रिपदाच्या काळात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटात त्वरित मदत मिळत असे. पीकविमा, विविध अनुदान, शेती कर्ज, शासनाच्या विविध योजना यासाठी पंकजाताई नेहमी दक्ष राहात असत.

महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, बालिका भृणहत्या रोखणे,  मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने महिला व बालविकास मंत्री म्हणून पंकजाताई मुंडे यांनी माझी कन्या भाग्यश्री ही योजना प्रभावीपणे राबविली.

बीड जिल्ह्याचे अनेक वर्षांचे स्वप्न असलेले नगर बीड रेल्वे प्रत्यक्षात आणण्यासाठी पंकजाताई यांनी केंद्र सरकारचा कायम पाठपुरावा केल्यामुळे आष्टी पर्यंत रेल्वे धावली व थोड्याच दिवसात पुढील काम पूर्ण होऊन रेल्वेचे स्वप्न साकार होणार आहे. 

बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आणण्यात पंकजताईंचा सिंहाचा वाटा आहे. राष्ट्रीय महामार्गामुळे बीड जिल्हा देशाशी जोडला गेला. भविष्यात यामुळे अनेक रोजगाराच्या संधी बीड जिल्ह्यात निर्माण होतील. पंकजताईंच्या मंत्रिपदाच्या काळात बीड जिल्ह्यात ग्रामीण रस्त्यांचे जाळे विणले गेले. पायवाट असणारे गावं चांगल्या रस्त्यामुळे शहराशी जोडली गेली. रस्त्यांची कामे दर्जदार व्हावी यासाठी नेहमी त्यांचा कटाक्ष राहिला.

बीड जिल्ह्यात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून पंकजाताई यांनी अनेक गोरगरीब, गरजू रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी व महागडे उपचार मोफत मिळवून दिले. कोरोना काळात सेवायज्ञ चालवून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी विशेष व्यवस्था केली. अनेकांच्या घरी जीवनावश्यक शिधा आपल्या कार्यकर्त्यांमार्फत पोचवला. 

मात्र मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आणि बीड जिल्ह्याचा विकास खुंटत गेला. मात्र लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचा हा पराभव त्यांचे काम थांबवू शकले नाही. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी त्या समर्थपणे पार पाडत आहेत. राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यरत असलेल्या पंकजताईंचा आज देशभर बोलबाला आहे. स्व. मुंडे साहेबांची लेक आज महाराष्ट्राच्या सीमा भेदून देशभर नाव कमावत आहे. आजच्या दलबदलू राजकारणाच्या वातावरणात आपल्या पित्याच्या समाधीवर पक्षाचे चिन्ह असलेले कमळ कायमपणे कोरणार्या पंकजाताई मुंडे या राजकीय बाजारातील इतर अनेक नेत्यापेक्षा वेगळ्या आहेत. अनेक अडचणी आल्यातरी आपल्या लोकांशी, पक्षाशी प्रामाणिक राहून सतत कार्यरत आहेत.  आपले कार्यकर्ते सुद्धा आपल्या सारखेच स्वच्छ चारित्र्याचे असावेत असा दुर्मिळ आग्रह पंकजताईंचा असतो. 

भविष्यातील महाराष्ट्रासाठी आशादायक, आश्वासक, स्वच्छ प्रतिमा जपणाऱ्या आमच्या नेत्या, लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा.

              - अश्विन मोगरकर,परळी वैजनाथ.

------------------------------------------------------



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार