इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

पंचम ज्योतिर्लिंग:परळी वैजनाथ

भारत पुरातत्व विभाग व महाराष्ट्र-सरकारने गॅझेटद्वारे  बारा ज्योतीर्लिंगातील पाचवे ज्योतीर्लिंगाची नोंद अधिकृत करावी -चेतन सौंदळे


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी 

  संत मोरारी बापूंच्या द्वादश ज्योतीर्लिंगाच्या यात्रेतून श्री.वैजनाथ ज्योतीर्लिंग परळीचे नांव वगळून वक्तव्याद्वारे झारखंड मधील वैद्यनाथ धामला ज्योतीर्लिंगाचे स्थान देऊन ज्योतीर्लिंग व धाम मध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे त्यामुळे भाविक-भक्तांमध्ये तीव्र संताप व निषेध व्यक्त केला जात आहे.

   महाराष्ट्र राज्यामधील स्वंयभू श्री.वैजनाथ ज्योतीर्लिंग परळी-वैजनाथ पुराण काळापासून धार्मिक,पुरातत्व, सामाजिक,एैतिहासिक,व भौगोलिकदृष्टया भारतातील बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असल्यामुळेच काशी विश्वनाथ,उज्जैन महाकाल ज्योतीर्लिंगाप्रमाणे वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळीचा कॉरिडॉर व प्रसाद योजने अंतर्गतमध्ये समावेशाची मंजुरी मिळवण्याकरिताचा प्रस्ताव राज्य सरकारद्वारे भारत सरकारकडे पाठविण्याकरिता विद्यमान कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी लक्षवेधीद्वारे विधीमंडळात मांडली होती तसेच वैद्यनाथ कॉरिडॉर समिती,परळी वैजनाथच्या माध्यमातून याबाबतचा पाठपुरावा सुरु आहे परंतू संत मोरारी बापूच्या बारा ज्योतीर्लिंगाच्या दर्शन यादीत परळीच्या श्री.वैद्यनाथाच्या एेवजी झारखंडच्या वैद्यनाथ धामचा उल्लेख केला आहे.याचा तीव्र संताप भाविक-भक्तांमध्ये निर्माण झाला आहे.

   प्राचीन काळापासून कांतीपुरी क्षेत्र तसेच अनोखी दक्षिण काशी यानावांने ओळखल्या जाणा-या शिवभक्तातातील लोकप्रिय असलेल्या प्रभू वैजनाथ पिंडीच्या बाजूला पार्वती माता अस्तित्वात अाहे.

 राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज,अहमदपुरकर यांनी परळी-वैजनाथ नगरीतील वैजनाथच बारा ज्योतीर्लिंगातील एक असल्यामुळे तसेच परळी याठिकाणी पार्वती माताची चिताभूमी सुध्दा असल्याचे त्यांनी परळीतील केलेल्या 82व्या श्रावणमास तपोनुष्ठानात नमुद केले आहे.काशी जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी सह अनेक जगद्गुरू व शिवाचार्यांनी श्री.वैजनाथ ज्योतीर्लिंग परळी वैजनाथ येथे तपोनुष्ठान केले आहेत.

 त्यामुळे भारत सरकार ने पुरातत्व अभिलेख व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोध्दार केलेल्या वास्तविक परळी वैजनाथ ज्योतीर्लिंगास सर्वार्थाने केंद्र सरकारच्या गॅझेटद्वारे अधिकृत मान्यता द्यावी अशी मागणी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांनी भाविक-भक्तांच्यावतीने केली आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!