श्रीशैल जगद्गुरूंच्या हस्ते परळी-कपीलधार थेट बससेवा सुरू

  जगद्गुरूंच्या हस्ते परळी-कपीलधार थेट बससेवा सुरू


भाविकांतून मागणी आली: परळीतून 'धनुभाऊंनी' लगेच बस सुरु केली

परळी (प्रतिनिधी)....
     परळी ते कपीलधार  बससेवा सुरू करण्याची भाविकांतून मागणी करण्यात आली होती.याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनाही निवेदन करण्यात आले होते.या मागणीची तात्काळ दखल घेत संबंधितांना  ही बससेवा सुरु करण्याचे निर्देश दिले.विशेष म्हणजे परळी येधे अनुष्ठानाला आलेल्या श्रीशैल जगद्गुरूंच्या हस्ते परळी-कपीलधार थेट बससेवेचा प्रत्यक्ष शुभारंभही करण्यात आला आहे.

प्रभू वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळी-वैजनाथ ते श्रीसंत मन्मथ स्वामी मंदीर,कपीलधार(मांजरसुंभा) नियमित थेट बससेवा सुरू करण्याचा शुभारंभ शनिवार दि.22जुलै रोजी श्रीश्रीश्री 1008 सूर्य सिंहासनाधिश्वर जगद्गुरू डॉ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ष.ब्र.नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज,सोनपेठ,अमृतेश्वर शिवाचार्य महाराज,जिंतूर,शंभूलिंग शिवाचार्य महाराज,अंबाजोगाई यांची  प्रमुख उपस्थिती होती.परळी-कपीलधार थेट बससेवेची मागणी श्री.वैजनाथ मंदीर देवस्थानचे विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे व राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांच्यासह भाविक-भक्तांच्यावतीने कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली होती निवेदनाची ना.मुंडे यांनी तात्काळ दखल घेत विभागीय नियंत्रक,परीवहन विभाग,बीड यांना सदरील मार्गावर तात्काळ बस सुरु करण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार बससेवा सुरू करण्यात आली.
        यावेळी श्री.दत्ताअप्पा ईटके,डॉ.सुरेश चौधरी,रा.कॉ.पक्षाचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके,माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक आयुबभाई पठाण,राजेन्द्र सोनी,अनिल अष्टेकर,वैजनाथ बागवाले,माजी नगरसेवक महादेव ईटके,रमेश चौंडे,रवीन्द्र परदेशी, अॅड.मनोज संकाये, कुमारअप्पा व्यवहारे, अझीझभाई कच्छी,संजय खाकरे, प्रवीण फुटके,ओमप्रकाश बुरांडे, आत्मलिंग शेटे,रामेश्वर महाराज कोकाटे,अॅड.मनजीत सुगरे,अशोक नावंदे,विकास हालगे,आश्विन मोगरकर,सौ.रमाताई आलदे, सौ. चेतना गौरशेट्टे सह मोठया प्रमाणात महीला व भाविक-भक्तांची उपस्थिती होती.
             बससेवा सुरू केल्याबद्दल ना.धनंजय मुंडे यांच्यासह बीड परीवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक श्री.अजय मोरे,परळी बस स्थानकचे आगार प्रमुख श्री.प्रवीण भोंडवे,श्री.सचिन राठोड तसेच सर्व कर्मचारी वृंदांचे भाविक -भक्तांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !