– नौशाद उस्मान यांनी लिहिलेला विशेष माहितीपूर्ण लेख.....

इमेज
  काय असतो मुहर्रमचा आशुरा?             – नौशाद उस्मान                सध्या इस्लामी दिनदर्शिकेतील मुहर्रम महिना सुरू आहे. मुहर्रम हा अरबी कॅलेंडरचा पहिला महिना असल्याने इस्लामी नववर्षाची सुरुवात याच महिन्यापासून होते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा इस्लाममध्ये नाही.        मुहर्रमपासून हिजरी सन १४४८ ची सुरुवात झाली आहे.               मुहर्रम महिन्याच्या दहाव्या दिवशी "आशुरा" असतो. कॅलेंडरमध्ये "आशुरा" असे लिहिलेले पाहून अनेक मुस्लिमेतर बांधवांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, हा दिवस नेमका कोणता आहे? भारतीय उपखंडात मुहर्रमच्या निमित्ताने काही रूढी, परंपरा आणि प्रथा पाळल्या जात असल्याने अनेकांना हाच संपूर्ण प्रकार म्हणजे आशुरा असावा असे वाटते. परंतु वास्तवात आशुरा हा एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला दिवस आहे. इस्लाममध्ये केवळ दोन सण साजरे करण्याचा आदेश आहे—ईद-उल-फित्र (रमजान ईद) आणि ईद-उल-अजहा (बकरी ईद). या दोन सणांव्यत...

काशी जगद्गुरु डॉ.श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचे उद्या परळीत सामूहिक ईष्टलिंग महापूजा व आशिर्वचन

*परळी वैजनाथ/ प्रतिनिधी*


श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट परळी यांच्या वतीने उद्या गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी श्री श्री श्री 1008 डॉ.श्री क्षेत्र काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सामूहिक ईष्टलिंग महापूजा व आध्यात्मिक आशीर्वाचनाचे आयोजन परळी वैजनाथ येथे करण्यात आले आहे अशी माहिती श्री ष.ब्र. 108  नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज मठ संस्थान सोनपेठ यांनी दिली.


उद्या गुरुवारी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने लोककल्याणार्थ श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी श्रीक्षेत्र काशी यांचे सामूहिक ईष्टलिंग महापूजा व अध्यात्मिक आशीर्वाचन होणार आहे. सकाळी नऊ ते अकरा वाजता ईष्टलिंग महापूजा, बिल्वार्चन व तीर्थप्रसाद तर दुपारी बारा वाजता आध्यात्मिक आशीर्वचन श्री वैजनाथ मंदिर प्रवचन सभा मंडप येथे होणार आहे. 

या धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य मार्गदर्शक श्री क्षेत्र 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज मठ संस्थान सोनपेठ व श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.


•••




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या