पोस्ट्स

सर्व बातम्या लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS:नेकनूरजवळ कार -दुचाकी अपघातात बाप लेक ठार

इमेज
  कार -दुचाकी अपघातात बाप लेक ठार     नेकनूर- मांजरसुंबा रस्त्यावर असलेल्या नेकनूर जवळील मंगल कार्यालयासमोर दुपारी मोटरसायकल इंडिका कार अपघातात गावाकडे दुचाकीवर निघालेल्या नारेवाडी ता .केज येथील बाप  लेकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातग्रस्त वाहनावर अजून एक दुचाकी धडकली यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे.                 नारेवाडी ता. केज येथील विनायक दादाहरी चौरे (६५ ) व विनोद विनायक चौरे वय (२६) हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम . एच . २३  ए. ५८१० वरून वडझरी येथील आपले काम आटोपून नारेवाडीकडे जात असताना नेकनुर येथील कालिंका मंगल कार्यालयाजवळ आले असता त्यांची मोटरसायकल व समोरून येणारी  कार क्रमांक  एम  . एच . १७   व्हि . ९६९७ यांच्यामध्ये जोरदार धडक झाली व याचवेळी पाठीमागून येणारी  मोटरसायकल  एम . एच .२० सी. एन .४०७५  ही सुद्धा या अपघातग्रस्त वाहनांना धडकली या दुचाकी वरील रामा गेणाजीगायकवाड  वय ३५ रा.  सफेपुर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भयानक होता की बीडच्या दिशेने जाणारी कार उलट्या बाजूला जाऊन खड्ड्यात गेली तर मोटरसायकलचे एक टायर फुटून मॅक व्हील सुद्धा तुटली . सदरील घटना घडल्यानंतर गावकऱ्यांनी

MB NEWS:पत्रकारांना मिळणारे सध्याचे निवृत्तीवेतन त्यांच्या निधनानंतर पत्नीला मिळावे व्हाईस ऑफ मीडियाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा

इमेज
  पत्रकारांचे  निवृत्तीवेतन :  व्हाईस ऑफ मीडियाचा  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांना मिळणारे सध्याचे निवृत्तीवेतन त्यांच्या निधनानंतर पत्नीला मिळावे, अशी मागणी व्हाईस ऑफ मीडियाने केली आहे. व्हॉईस ऑफ मीडियाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांची अवस्था आणि परिस्थितीपासून शासन अवगत आहोत. पत्रकरांना सद्य:स्थितीत केवळ ११ हजार रुपयांचे मासिक निवृत्तीवेतन देण्यात येते. हे निवृत्ती वेतन देताना अनेक अटी जाचक पद्धतीने सरकारी बाबुंकडून वापरण्यात येत आहेत. त्यामुळे हक्काचे निवृत्ती वेतन मिळविताना पत्रकार व त्यांच्या कुटुंबाची चांगलीच परवड होत असल्याकडे काळे व म्हस्के यांनी लक्ष वेधले आहे. ज्येष्ठ पत्रकार दिनु रणदिवे यांना त्यांचे निधन झाले त्या दिवशी शासनाने त्यांचे निवृत्ती वेतन मंजूर केले. विशेष म्हणजे निवृत्तीवेतन मंजूर झाल्यानंतर रण

MB NEWS:साहेब पंकजाताईंच्या रुपाने झाशीची राणी आपल्याला देउन गेले, त्यांना सांभाळा

इमेज
  मार्ग दाखविला सुपंथ: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे जीवन हे संतांनी वर्णिल्या प्रमाणे कृपावंताचे - रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      कृपावंत कोणाला म्हणावे याचे वर्णन अनेक संतांनी केले आहे. संत सेना महाराज यांचा "उदार तुम्ही संत।मायबाप कृपावंत" हा अभंग लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवनाला तंतोतंत लागू पडतो. "मार्ग दाखविला सुपंथ" या न्यायाप्रमाणे त्यांनी लक्षावधींना मार्ग दाखवला.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे जीवन हे संतांनी वर्णिल्या प्रमाणे कृपावंताचे असल्याचे प्रतिपादन रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी केले.        लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमीत्त गोपीनाथ गडावर रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांची किर्तनसेवा झाली.प्रारंभी भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी महाराजांचा सत्कार केला.या किर्तन सेवेत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत  रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी विविध दृष्टांत व उदाहरणे देत विवेचन केले.उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत ॥१॥केवढा केला उपकार ।काय व

MB NEWS;मी लोकांसाठी राजकारणात; मला कोणाकडून काहीही मिळवायचं नाही - पंकजा मुंडे

इमेज
 मी लोकांसाठी राजकारणात; मला कोणाकडून काहीही मिळवायचं नाही - पंकजा मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          सत्य, स्वाभिमान अन् वंचितांच्या सेवेचा वसा शेवटपर्यंत सोडणार नाही.माझ्या खांद्यावर अनेक बंदूका विसावण्याचा प्रयत्न करत आहेत.माझे शब्द ठाम असतात. सर्वच पक्षांमध्ये बदल असतात, माझ्या पक्षातही बदल झाले. मी मनात काही साठवून ठेवत नाही. लोकांच्या हितासाठी भूमिका घेते. भाषणातील बोलण्याचे काहीही अर्थ लावून चर्चा घडवल्या जातायत. याने कोणीही बिथरुन जाण्याची गरज नाही. सत्य सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे.मला भुमिका घ्यायची असेल तर ती छातीठोक व जगजाहीर घेऊ असे बेधडक व स्पष्ट प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केले.      भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या  पुण्यतिथीच्या निमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंकजा मुंडेंनी आक्रमक भाषण केलं      यावेळी पुढे बोलतांना पंकजा मुंडे यांनी सांगितले की,आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक दिवस आहे. हा दिवशी माझ्यासाठी राजकारण शून्य आहे. याठिकाणी जे लोक आले आहेत, त्यांना मी काही दिले नाही. मी यावेळी कोणत्याही राजकारण्यांना नि

MB NEWS:विद्यावर्धिनी विद्यालयाचे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश

इमेज
विद्यावर्धिनी विद्यालयाचे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश मार्च २०२३चा माध्यमिक शालान्त परीक्षा म्हणजे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यात विद्यावर्धिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे.विद्यालयाचा निकाल ९९.११℅ लागला आहे.     २२६ विद्यार्थ्यांपैकी १९३ विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण झाले तसेच २४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.यात ९५%  वर गुण घेणारे ४४ विद्यार्थी असून ९०% ते ९५% दरम्यान  गुण घेणारे ६५ विद्यार्थी आहेत.संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण घेणारे ५२  विद्यार्थी असून गणित विषयात १०० पैकी १०० गुण घेणारे०६ विद्यार्थी आहेत. शाळेतील गुणानुक्रमे  पाहिले तीन विद्यार्थी खालीलप्रमाण १ कु भाग्यश्री बालाजी होळंबे ९९.६० २ कु राधिका मदन कराड      ९९.२० ३चि ओंकार रामेश्वर मंत्री       ९८.८० ४कु आरती पांडुरंग कराड      ९८.८०  वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता  भदाणे , उपाध्यक्ष मा  अवचार , सचिव  पी जी ईटके,संस्थेचे सदस्य  कोळगे