गोळीबार:बँक कॉलनी परिसरातील थरार :एक ठार: एक जण जखमी

गोळीबार:बँक कॉलनी परिसरात थरार: एक ठार;एक जण जखमी परळी : परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळीबाराची घटना घडली. यामध्ये मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हे जागीच ठार झाले तर ग्यानबा गीते जखमी झाले आहेत. जखमी असलेल्या गीते यांना परळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचली असून आता हा गोळीबार कोणी केला आणि कोणत्या कारणावरून केला याचा शोध घेतला जात आहे.