MB NEWS:नेकनूरजवळ कार -दुचाकी अपघातात बाप लेक ठार

 कार -दुचाकी अपघातात बाप लेक ठार   


नेकनूर- मांजरसुंबा रस्त्यावर असलेल्या नेकनूर जवळील मंगल कार्यालयासमोर दुपारी मोटरसायकल इंडिका कार अपघातात गावाकडे दुचाकीवर निघालेल्या नारेवाडी ता .केज येथील बाप  लेकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातग्रस्त वाहनावर अजून एक दुचाकी धडकली यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे.                 नारेवाडी ता. केज येथील विनायक दादाहरी चौरे (६५ ) व विनोद विनायक चौरे वय (२६) हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम . एच . २३  ए. ५८१० वरून वडझरी येथील आपले काम आटोपून नारेवाडीकडे जात असताना नेकनुर येथील कालिंका मंगल कार्यालयाजवळ आले असता त्यांची मोटरसायकल व समोरून येणारी  कार क्रमांक  एम  . एच . १७   व्हि . ९६९७ यांच्यामध्ये जोरदार धडक झाली व याचवेळी पाठीमागून येणारी  मोटरसायकल  एम . एच .२० सी. एन .४०७५  ही सुद्धा या अपघातग्रस्त वाहनांना धडकली या दुचाकी वरील रामा गेणाजीगायकवाड  वय ३५ रा.  सफेपुर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भयानक होता की बीडच्या दिशेने जाणारी कार उलट्या बाजूला जाऊन खड्ड्यात गेली तर मोटरसायकलचे एक टायर फुटून मॅक व्हील सुद्धा तुटली . सदरील घटना घडल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन  मयत व जखमींना स्त्री व कुटीर रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर कारचालक फरार झाला. घटनास्थळी नेकनूर पोलिसांनी धाव घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार