पोस्ट्स

MB NEWS-परळीतील प्रभाग क्र. 5 व 16 मध्ये 12 ऑगस्ट रोजी नाथ प्रतिष्ठाण कडून तिरंगा वितरण व तिरंगा रॅलीचे आयोजन* *सकाळी 9 वा. गणेशपार येथून निघणार रॅली*

इमेज
 * परळीतील प्रभाग क्र. 5 व 16 मध्ये 12 ऑगस्ट रोजी नाथ प्रतिष्ठाण कडून तिरंगा वितरण व तिरंगा रॅलीचे आयोजन* *सकाळी 9 वा. गणेशपार येथून निघणार रॅली* परळी (दि. 10) - देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत 10 हजार तिरंगा ध्वजांचे वितरण करून 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत असून, यांतर्गत दि. 12 ऑगस्ट (शुक्रवार) रोजी  शहरातील प्रभाग क्रमांक 5 व 16 मध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.  शुक्रवारी सकाळी 9 वाजता गणेशपार येथुन या भव्य तिरंगा रॅलीस सुरुवात होणार असून, ही रॅली गणेशपार, धनगर गल्ली, देशमुख गल्ली, जगतकार गल्ली, प्रबुद्ध नगर, इस्लामपूरा बंगला, हनुमान नगर, नादुरवेस, अंबेबेस, भोईगल्ली आदी मार्गानी जाणार आहे. देशाभिमान व आपल्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण इतिहासास अभिवादन करण्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त सर्व देशप्रेमी नागरिकांनी तसेच दोनही प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या

MB NEWS - वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची भावनिक साद.....आपले प्रेम अबाधित असू द्या..!!

इमेज
  आपले प्रेम अबाधित असू द्या..!! ------------------------------- ११ आॅगस्ट रोजी परळीचे युवा नेतृत्व व एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व असलेल्या बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मोठ्या कौटुंबिक आघातातून जावे लागत आहे. वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सर्वांना भावनिक साद घातली आहे.....आपले प्रेम अबाधित असू द्या..!! ------------------------------- सर्वांना सप्रेम नमस्कार, आज आपल्याशी संवाद साधण्याचे औचित्य म्हणजे  उद्या 11 ऑगस्ट रोजी माझा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने दरवर्षी माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्व मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करून माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत असता. मात्र, यावेळी परिस्थिती खूप वेगळी आहे. मागच्या महिन्यात 4 जुलै रोजी माझ्या सोनामायने (मोठी बहीण) जगाचा निरोप घेतला. तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कशानेही भरून येणारी नाही.यंदा योगायोग म्हणावा की दुर्दैवविलास कोणास ठाऊक.11 ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन आले आहे. यंदा सोनामायशिवाय हे पहिलेच रक्षाबंधन असणार,ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती.  कधी वाटलं नव्हतं

MB NEWS-कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची ढोलताशांच्या गजरात तिरंगा जनजागरण रँली

इमेज
  कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची ढोलताशांच्या गजरात  तिरंगा जनजागरण रँली राजमाता जिजाऊ, भारतमातेच्या वेशभूषेतील विद्यार्थिनींनी वेधले लक्ष, मुलींचे ढोलताशा पथक परळी वैजनाथ दि.१० (प्रतिनिधी)            येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा अभियानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी भव्य रँलीचे आयोजन बुधवारी (दि.१०) करण्यात आले. या रँलीतील मुंलीचेच ढोलताशा पथक, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, भारतमातेच्या वेशभूषेतील विद्यार्थिनींनी गावभागातील रहिवाशांचे लक्ष वेधून घेतले. भारतमाता की जय, वंदे मातरम्,७५ वा अमृत महोत्सव चिरायू होवो च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. Click &watch : ■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*                  शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त हरघर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा जनजागरण रँलीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. रँलीची सु

MB NEWS-ॲड. दत्तात्रय आंधळे साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

इमेज
  ॲड. दत्तात्रय आंधळे साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित  परळी वैजनाथ, प्रतिनिधी         संत साहित्याचे अभ्यासक व लेखक तथा संत जगमित्र नागा जीवन चरित्र ग्रंथाचे लेखक परळीचे ॲड. दत्तात्रय आंधळे महाराज यांना साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Click &watch : ■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*      आज (दि.१०) रोजी माहात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे भाऊ बाबा वंजारी संघातर्फे संशोधन व साहित्य सेवेतील उल्लेखनिय कार्याबद्दलॲड. दत्तात्रय आंधळे महाराज यांना ,"साहित्य रत्न"पुरस्कार माजी आमदार तोताराम  कांयदे, राष्ट्रीय क्रांती अध्यक्ष  बाळासाहेब सानप, अभिनेत्री ,निर्माती मेघना झुझम पाटिल, ओबीसी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण लटपटे आदींच्या हस्ते देण्यात आला. Click &watch: *परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली*       ॲड. दत्तात्रय आंधळे महाराज यांची विपुल साहित्य संपदा आहे."सार्थ विवेक सिंधु" ग्रंथाचे नुकतेच प्रकाशन केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी  यांच्या शुभ हस्ते नागपूर जिल्ह्यातील आंभोरा देवस्थान येथे झाले . प

MB NEWS- *औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण सुरू*

इमेज
 *औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण सुरू*  _सरळ सेवा भरती मध्ये ५० टक्के आरक्षण व प्रतिवर्षी ५ गुण अथवा विशेष भरती करुन न्याय देण्याची प्रमुख मागणी_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         पदवी आधारे व प्रकल्पग्रस्ता अधारे थर्मल पावर स्टेशन, परळी येथील युनिट क्र.६, ७ व ८ मध्ये जलप्रक्रिया विभागामध्ये सन २०१७ पासून बी.एस.सी. (रसायनशास्त्र) शैक्षणिक अहर्तेवर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी म्हणुन नियुक्त असलेल्या प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींना सरळ सेवा भरतीमध्ये न्याय द्यावा या मागणीसाठी आज दि.१० आॅगस्ट पासुन आमरण उपोषण सुरू करण्यात  आले आहे. Click &watch : ■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*          महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी मर्या. प्रशासकीय परिपत्रक क्र. ३७४ दि. १८.०४.२०१७ काढण्यात आलेले आहे.सन २०१७ पासून बी.एस.सी. (रसायनशास्त्र) शैक्षणिक अहर्तेवर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी म्हणुन नियुक्त असलेल्या प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींना या परिपत्रकात जाणुन बुजुन डावलण्यात आले आहे. प्रक

MB NEWS- *मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर पुन्हा आमरण उपोषणाची वेळ* • _पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार_

इमेज
 मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर  पुन्हा आमरण उपोषणाची वेळ • पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार परळी : प्रतिनिधी..   परळी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी दिलेले लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर  पुन्हा आमरण उपोषणाची वेळ आली.आज (दि.१०) सकाळपासून उपोषण सुरू करण्यात आले असुन पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार आंदोलन कर्त्यांनी व्यक्त केला  आहे.      Click &watch : ■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*     परळी नगर परिषदेतील 52 सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी रजा रोखीकरण व उपदानाची रक्कम मिळावी म्हणून या अगोदर नगर परिषदेसमोर भर पावसात उपोषण केले  होते. मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी रजा रोखीकरणाच्या 30 टक्के रक्कम दोन दिवसात अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले तसेच 7 व्या वेतनाच्या फरकाचा दुसरा हप्ता दोन महिन्यात व सर्व उर्वरित रजा रोखीकरण व उपदान मार्च 2023 पर्यंत देण्याचे लेखी दिले होते.परंतु या अश्वाानांची पूर्तता केली नाही त्यामुळे नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी पुन्हा आमरण उपोषण करत

MB NEWS- *तब्बल दोन वर्षे पाच महिन्यानंतर या स्वातंत्र्यदिना पासून सुरू होणार परळी -मिरज रेल्वे*

इमेज
तब्बल दोन वर्षे पाच महिन्यानंतर या स्वातंत्र्यदिना पासून सुरू होणार परळी -मिरज रेल्वे परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा.....      मार्च 2020 पासून परळी - मिरज ही गाडी रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद केली होती. ती तब्बल दोन वर्ष पाच महिन्यानंतर सुरू होत आहे. ही रेल्वे गाडी सर्वांसाठी सोयीची आहे. गाडी पुर्ववत सुरु होणार असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे. Click &watch : ■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*      मिरज-परळी एक्स्प्रेस रेल्वे गाडी १५ ऑगस्टपासून आणि परळी-मिरज एक्स्प्रेस १६ ऑगस्टपासून पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दररोज धावणाऱ्या या रेल्वेमुळे विशेषतः परळी व पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. परळी रेल्वे स्टेशनहून सध्या 15 रेल्वे गाड्या धावत आहेत. आता परळी -मिरज गाडीची त्यात भर पडणार आहे. परळी-मिरज ही रेल्वे गाडी पुन्हा सुरू करावी अशी मागणी परळी रेल्वे संघर्ष समितीने सातत्याने केली होती. अखेर या मागणीला यश आले आहे.  Click &watch: *परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली*    

MB NEWS-प्रभाग क्र 5 गणेशपार येथे हर घर तिरंगा जनजागृती अभियान

इमेज
  प्रभाग क्र 5 गणेशपार येथे हर घर तिरंगा जनजागृती अभियान  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त तिरंगा ध्वज प्रत्येकाने घरावर लावावा - अश्विन मोगरकर परळी वैजनाथ :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. हा स्वातंत्र्याचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा व हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केले आहे.  गणेशपार भागातील अभियानाचे आयोजक राजेश कौलवार यांच्यातर्फे  तिरंगा ध्वज घरोघरी वाटप करण्याचे अभियान प्रभाग क्र 5 गणेशपार येथे राबविण्यात आले. बुधवार दि 10 ऑगस्ट, सकाळी 10 वाजता गणेशपार येथील गणेश मंदिर येथुन या अभियानाला सुरूवात झाली. भाजपा राज्य सचिव राजेश देशमुख, जेष्ठ नेते दत्ताप्पा ईटके, माजी चेअरमन विकासराव डुबे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, संचालक दत्तात्रय देशमुख यांच्या हस्ते नारळ फोडून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. 13 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घ

MB NEWS-परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली

इमेज
  परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......        भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात येत्या शनिवारी म्हणजे 13 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे.भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघणार आहे. Click &watch : ■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*    या रॅलीत  पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ प्रमुख, शक्तीप्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांनी   तसेच शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, डाॅक्टर्स, वकील, स्वयंसेवी संस्था तसेच समाजाच्या सर्व घटकांतील नागरिक रॅलीत रॅलीत सहभागी होणार आहे. सर्वांनी रॅलीत पांढऱ्या शुभ्र गणवेशात यायचे आहे. अतिशय जल्लोषात आणि भव्य अशी ही रॅली व्हावी या दृष्टिकोनातून तयारी करण्यात येत आहे.या रॅलीत मोठ्या संख्यने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाकडून करण्यात आले आहे. ------------------------------------------------------- Video News : ------------------------

MB NEWS-मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट

इमेज
  मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट        राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप राष्ट्रीय सचिव  पंकजा मुंडे यांनी ट्वीट केले आहे.             मंत्रीमंडळ विस्तार पार पडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी नव्या मंत्र्यांचे ट्विट करत अभिनंदन केले आहे. 'नवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदय यांचे अभिनंदन.... महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहत आहे आपल्याकडे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा... विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्व जण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल अशी शुभकामना' अशा आशयाचे ट्विट त्यांनी शेअर केले आहे. ------------------------------------------------------- Video News : -------------------------------------------------------- - video news- -------------------------------------------------------- Video News : --------------------------------------------

MB NEWS- *प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचा आमरण उपोषणाचा इशारा* _सरळ सेवा भरती मध्ये ५० टक्के आरक्षण व प्रतिवर्षी ५ गुण अथवा विशेष भरती करुन न्याय देण्याची प्रमुख मागणी_

इमेज
 *प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचा आमरण उपोषणाचा इशारा*  _सरळ सेवा भरती मध्ये ५० टक्के आरक्षण व प्रतिवर्षी ५ गुण अथवा विशेष भरती करुन न्याय देण्याची प्रमुख मागणी_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         पदवी आधारे व प्रकल्पग्रस्ता अधारे थर्मल पावर स्टेशन, परळी येथील युनिट क्र.६, ७ व ८ मध्ये जलप्रक्रिया विभागामध्ये सन २०१७ पासून बी.एस.सी. (रसायनशास्त्र) शैक्षणिक अहर्तेवर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी म्हणुन नियुक्त असलेल्या प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींना सरळ सेवा भरतीमध्ये न्याय द्यावा या मागणीसाठी दि.१० आॅगस्ट पासुन आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.          महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी मर्या. प्रशासकीय परिपत्रक क्र. ३७४ दि. १८.०४.२०१७ काढण्यात आलेले आहे.सन २०१७ पासून बी.एस.सी. (रसायनशास्त्र) शैक्षणिक अहर्तेवर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी म्हणुन नियुक्त असलेल्या प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींना या परिपत्रकात जाणुन बुजुन डावलण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्त व पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर प्रगतकुशल श्रेणीमध्ये समाविष्ट असतानाही सरळसेवा

MB NEWS-■ *माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त ११ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन*

इमेज
 ■ *माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त ११ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन*   • _मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन_  परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......      ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे परळी शहरातील कर्तृत्ववान उमदे युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचेलोकप्रिय शहराध्यक्ष  बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त  (दि.११) रोजी  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.        राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीरावभैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 11 ऑगस्ट रोजी स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,आंबेवेस, परळी वैजनाथ येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० वा.पासुन शिबिराचा शुभारंभ होणार आहे.                   दरवर्ष

MB NEWS- *परळीत होणाऱ्याा शिवमहापुराण कथेचे स्वागताध्यक्षपदी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे*

इमेज
 * परळीत होणाऱ्याा शिवमहापुराण कथेचे स्वागताध्यक्षपदी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे* *आंतराष्ट्रीय कथा वाचक प.पु.श्री.प्रदिपजी मिश्रा यांची शिव महापुराण कथा लाभ घ्यावा :-मथुरा प्रतिष्ठान* प्रतिनिधी परळी वै. बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावण भुमी असलेल्या परळीत येत्या सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे.या शिव पुराण कथेच्या स्वागताध्यक्ष म्हणून माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे असणार आहेत अशी माहिती या कथेचे यजमान गोपाल बन्सीलालजी सोमाणी यानी ऐका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.परळी येथील मथुरा प्रतिष्ठानच्या वतीने या कथेचे आयोजन केले आहे.  परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात येत्या १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण  प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे.सोमवार १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रध्वजाचे प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या हस्ते व प्रशासकीय अधिकारी ,

MB NEWS-नाथ प्रतिष्ठाण 10 हजार ध्वज वितरित करणार

इमेज
  *धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठाण मार्फत परळीत दि. 11 व 12 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्यासाठी ध्वजांचे मोफत वितरण* *नाथ प्रतिष्ठाण 10 हजार ध्वज वितरित करणार; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धनंजय मुंडेंचा पुढाकार* परळी (दि. 09) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीतील सर्वसामान्य नागरिकांना देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित 'हर घर तिरंगा' अभियानात सहभागी होता यावे यासाठी श्री. मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत परळी शहरात दि. 11 व 12 ऑगस्ट रोजी मोफत तिरंगा ध्वजांचे वितरण करण्यात येणार आहे.  हर घर तिरंगा अभियानांतर्गत देशवासियांना आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा ध्वज फडकवता येणार आहे. त्यामुळे नाथ प्रतिष्ठाणच्या मार्फत फडकवण्यासाठी तयार स्वरूपात काठी लावलेले तब्बल 10 हजार तिरंगा ध्वजांचे मोफत वितरण करण्याचे नियोजन नाथ प्रतिष्ठाण मार्फत करण्यात आले आहे.  परळीला सांस्कृतिक, धार्मिक त्याचबरोबर चळवळीचा वारसा आहे. इथल्या नागरिकांना देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात आयोजित अभियान

MB NEWS -देश सेवेतुन सेवानिवृत्त झालेल्या सैनिक सतीष फड यांचा सत्कार

इमेज
  देश सेवेतुन सेवानिवृत्त झालेल्या सैनिक सतीष फड यांचा सत्कार परळी वै.ता.९ प्रतिनिधी       देश सेवेत सैनिक म्हणुन सोळा वर्षे सेवा करूण सेवानिवृत्त झाल्याबद्दल सतीष फड यांची मंगळवारी (ता.९) क्रांती दिनाचे औचीत्य साधुन आयोध्य नगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.       परळी तालुक्यातील नंदागौळ येथील सतीश उध्दवराव फड हे शहरातील आयोध्यानगर भागात वास्तव्यास आहेत. मागील सोळा वर्षे सैनिक म्हणुन सतिश फड हे देश सेवेत कार्यरत होते. सोळा वर्षे चांगली सेवा करूण सेवा निवृत्त झाल्या बद्दल परळी येथील आयोध्यानगर भागातील नागरिकांनी गुणगौरव सोहळा व सत्काराचे आयोजन मंगळवारी (ता.९) केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते सतीश फड यांचा सपत्नीक शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ श्रीरामाची प्रतीमा देउन सत्कार करण्यात आले. यावेळी बाजीराव धर्माधिकारी व संभाजी मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन पत्रकार प्रकाश चव्हाण यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचलन डी बी मुंडे यांनी केले. यावेळी सोपान गीत्ते, उत्तम ग

MB NEWS-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त प्रभाग 16 मध्ये हर घर तिरंगा अभियानास उस्फुर्त प्रतिसाद

इमेज
  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त प्रभाग 16 मध्ये हर घर तिरंगा अभियानास उस्फुर्त प्रतिसाद  परळी वैजनाथ  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. हा स्वातंत्र्याचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा व हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केले आहे. त्यांच्याच प्रेरणेतून जनजागृती करण्यासाठी व तिरंगा ध्वज घरोघरी वाटप करण्याचे अभियान भाजपा उपाध्यक्ष महादेव ईटके व मुद्रा लोन समिती सदस्य सुशील हरंगुळे यांनी  प्रभाग क्र 16 नांदूरवेस, हनुमान नगर मध्ये आयोजित केले होते. ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि 09 ऑगस्ट, सकाळी 10 वाजता अंबेवेस येथील विठ्ठल मंदिरातून येथुन या अभियानाला सुरूवात झाली. ढोलताशांच्या गजरात व देशभक्तीपर गितांच्या तालावर अभियान राबविण्यात आले. प्रभाग 16 मधील घरोघरी जाऊन तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले.  ढोलताशांच्या गजरात तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात येत असत