MB NEWS- *तब्बल दोन वर्षे पाच महिन्यानंतर या स्वातंत्र्यदिना पासून सुरू होणार परळी -मिरज रेल्वे*

तब्बल दोन वर्षे पाच महिन्यानंतर या स्वातंत्र्यदिना पासून सुरू होणार परळी -मिरज रेल्वे


परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा.....

     मार्च 2020 पासून परळी - मिरज ही गाडी रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद केली होती. ती तब्बल दोन वर्ष पाच महिन्यानंतर सुरू होत आहे. ही रेल्वे गाडी सर्वांसाठी सोयीची आहे. गाडी पुर्ववत सुरु होणार असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Click &watch:■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*

     मिरज-परळी एक्स्प्रेस रेल्वे गाडी १५ ऑगस्टपासून आणि परळी-मिरज एक्स्प्रेस १६ ऑगस्टपासून पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दररोज धावणाऱ्या या रेल्वेमुळे विशेषतः परळी व पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. परळी रेल्वे स्टेशनहून सध्या 15 रेल्वे गाड्या धावत आहेत. आता परळी -मिरज गाडीची त्यात भर पडणार आहे. परळी-मिरज ही रेल्वे गाडी पुन्हा सुरू करावी अशी मागणी परळी रेल्वे संघर्ष समितीने सातत्याने केली होती. अखेर या मागणीला यश आले आहे. 

Click &watch:*परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली*

     परळी -मिरज रेल्वे परळीहून पूर्ववत सुरू करावी याकरिता  वेळोवेळी पाठपुरावा केला होता. खा. प्रीतम मुंडे, पुणेचे खा. गिरीश बापट, रेल्वेचे अधिकारी उदय भगरे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणी पाठपुरावा केला होता

● अशी धावेल रेल्वे......

रेल्वे क्रमांक 11412  ही 15 ऑगस्टपासून 21.00 वाजता मिरजहून सुटेल आणि 06.10 वाजता परळीला पोहोचेल आणि ट्रेन क्रमांक 11411 ही 16 ऑगस्टपासून परळीहून 07.25 वाजता सुटेल आणि 17.55 वाजता मिरजला पोहोचेल. तर परळीहून मिरजगाडी घाटनांदूर, पानगाव , जानवळ , वडवळ नागनाथ,   कारेपूर,  लातूर रोड, लातूर, ढोकी येडशी, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, जत रोड, कवठेमहांकाळ, धालगाव मार्गे मिरजला जाईल. दरम्यान, वडवळ नागनाथ, जानवल, कारेपूर, पानगाव आणि घाटनांदूर  स्टेशनवर गाडी थांबेल. या ट्रेनमध्ये 10 जनरल डबे असतील.


-------------------------------------------------------

Video News :



--------------------------------------------------------

- video news-

--------------------------------------------------------

Video News :


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !