इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS - वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची भावनिक साद.....आपले प्रेम अबाधित असू द्या..!!

 आपले प्रेम अबाधित असू द्या..!!

-------------------------------

११ आॅगस्ट रोजी परळीचे युवा नेतृत्व व एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व असलेल्या बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मोठ्या कौटुंबिक आघातातून जावे लागत आहे. वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सर्वांना भावनिक साद घातली आहे.....आपले प्रेम अबाधित असू द्या..!!

-------------------------------


सर्वांना सप्रेम नमस्कार,


आज आपल्याशी संवाद साधण्याचे औचित्य म्हणजे  उद्या 11 ऑगस्ट रोजी माझा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने दरवर्षी माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्व मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करून माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत असता.


मात्र, यावेळी परिस्थिती खूप वेगळी आहे. मागच्या महिन्यात 4 जुलै रोजी माझ्या सोनामायने (मोठी बहीण) जगाचा निरोप घेतला. तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कशानेही भरून येणारी नाही.यंदा योगायोग म्हणावा की दुर्दैवविलास कोणास ठाऊक.11 ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन आले आहे.


यंदा सोनामायशिवाय हे पहिलेच रक्षाबंधन असणार,ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. 


कधी वाटलं नव्हतं या वयात,इतक्या लवकर असा अनुभव मला प्रत्यक्षात घ्यावा लागेल. यावेळी रक्षाबंधन प्रत्यक्षरित्या मी बहिणीला ओवाळणी देऊ शकत नाही.बहुतेक नियतीला माझ्याकडून काहीतरी वेगळी अपेक्षा आहे.सोनामायने दीर्घकाळ आजाराशी झुंज दिली होती. त्यामुळे तिला रक्ताच्या थेंबाथेंबाचे प्रचंड महत्त्व ठाऊक होते.आज  शासकीय रक्तपेढी SRT अंबेजोगाई येथे रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे. 


या दोन्ही बाबी विचारात घेता माझ्याप्रति प्रेम आणि आपुलकी असणाऱ्या सर्वांना एक विनम्र आवाहन करत आहे की आपण 11 ऑगस्ट रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त जरूर रक्तदान करावे. कदाचित आपल्या रक्ताने कोणाच्या तरी सोनामायला जीवदान मिळेल,तिचे रक्षण होईल आणि हीच मला आपल्याकडून मिळालेली मोठी भेट असेल.

Click:बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

रक्तदान स्थळ : स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,श्री.संस्थान काळाराम मंदिर अंबेवेस 

रक्तदान वेळ : सकाळी १० वाजेपासून


आपल्य प्रेमात सदैव ऋणाईत,

बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी



--------------------------------------------------------

Video News :


Click &watch:■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*



Click &watch:*परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली*

Video News :


Click: *औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण सुरू*



Click:*मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर पुन्हा आमरण उपोषणाची वेळ* • _पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार_



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!