MB NEWS- *औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण सुरू*

 *औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण सुरू* 


_सरळ सेवा भरती मध्ये ५० टक्के आरक्षण व प्रतिवर्षी ५ गुण अथवा विशेष भरती करुन न्याय देण्याची प्रमुख मागणी_



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        पदवी आधारे व प्रकल्पग्रस्ता अधारे थर्मल पावर स्टेशन, परळी येथील युनिट क्र.६, ७ व ८ मध्ये जलप्रक्रिया विभागामध्ये सन २०१७ पासून बी.एस.सी. (रसायनशास्त्र) शैक्षणिक अहर्तेवर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी म्हणुन नियुक्त असलेल्या प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींना सरळ सेवा भरतीमध्ये न्याय द्यावा या मागणीसाठी आज दि.१० आॅगस्ट पासुन आमरण उपोषण सुरू करण्यात  आले आहे.

Click &watch:■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*

         महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी मर्या. प्रशासकीय परिपत्रक क्र. ३७४ दि. १८.०४.२०१७ काढण्यात आलेले आहे.सन २०१७ पासून बी.एस.सी. (रसायनशास्त्र) शैक्षणिक अहर्तेवर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी म्हणुन नियुक्त असलेल्या प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींना या परिपत्रकात जाणुन बुजुन डावलण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्त व पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर प्रगतकुशल श्रेणीमध्ये समाविष्ट असतानाही सरळसेवा भरती मध्ये ५०% आरक्षण व प्रतिवर्षी ५ गुण  देण्यापासून वंचित ठेवले आहे.५० टक्के आरक्षण व ५ गुणांपासून वंचित ठेवल्यामुळे  महानिर्मिती कंपनीच्या निघणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून काम करुन सुद्धा कुठलाही लाभ मिळत नाही.

Click &watch:*परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली*

       त्यामुळे प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थीना सरळ सेवा भरती मध्ये ५० टक्के आरक्षण व प्रतिवर्षी ५ गुण अथवा विशेष भरती करुन न्याय देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.या मागणीसाठी हे उमेदवार आज दि.१०.०८.२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी मर्या. परळी वै.जि.बीड येथील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत.या आंदोलनात मंदाकिनी देविदास नागरगोजे,अंजली लक्ष्मीकांत डुबे,अंजली अशोकसिंह ठाकूर, दिपक उत्तमराव गित्ते,अनिल किशनराव मुंडे,सचिन लहुदास फड़,प्रविण दिलीपराव देशमुख, शशिकांत भास्करराव चाटे,विपीन लक्ष्मणराव कांबळे आदी सहभागी झाले आहेत.

Click:■ *तब्बल दोन वर्षे पाच महिन्यानंतर या स्वातंत्र्यदिना पासून सुरू होणार परळी -मिरज रेल्वे*


-------------------------------------------------------

Video News :


Click: *औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण सुरू*



Click:*मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर पुन्हा आमरण उपोषणाची वेळ* • _पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार_





--------------------------------------------------------

- video news-

--------------------------------------------------------

Click: ■ *श्रीकृष्णाष्टमी निमित्त संत सोपान काका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

Video News :


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !