इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-परळीतील प्रभाग क्र. 5 व 16 मध्ये 12 ऑगस्ट रोजी नाथ प्रतिष्ठाण कडून तिरंगा वितरण व तिरंगा रॅलीचे आयोजन* *सकाळी 9 वा. गणेशपार येथून निघणार रॅली*

 *परळीतील प्रभाग क्र. 5 व 16 मध्ये 12 ऑगस्ट रोजी नाथ प्रतिष्ठाण कडून तिरंगा वितरण व तिरंगा रॅलीचे आयोजन*



*सकाळी 9 वा. गणेशपार येथून निघणार रॅली*


परळी (दि. 10) - देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत 10 हजार तिरंगा ध्वजांचे वितरण करून 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत असून, यांतर्गत दि. 12 ऑगस्ट (शुक्रवार) रोजी  शहरातील प्रभाग क्रमांक 5 व 16 मध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. 


शुक्रवारी सकाळी 9 वाजता गणेशपार येथुन या भव्य तिरंगा रॅलीस सुरुवात होणार असून, ही रॅली गणेशपार, धनगर गल्ली, देशमुख गल्ली, जगतकार गल्ली, प्रबुद्ध नगर, इस्लामपूरा बंगला, हनुमान नगर, नादुरवेस, अंबेबेस, भोईगल्ली आदी मार्गानी जाणार आहे.


देशाभिमान व आपल्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण इतिहासास अभिवादन करण्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त सर्व देशप्रेमी नागरिकांनी तसेच दोनही प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, जाबेर खान पठाण, अनिल अष्टेकर, गोविंद कुकर व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 


माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी शहरात 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत 10 हजार तिरंगा ध्वजांचे मोफत वितरण नाथ प्रतिष्ठाण उद्यापासून (दि. 11) करणार आहे. त्याचबरोबर तिरंगा रॅली मुळे परळी शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी देशभक्तीचे वातावरण वृद्धिंगत होणार आहे.

--------------------------------------------------------

Video News :


Click &watch:■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*



Click &watch:*परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली*

Video News :


Click: *औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण सुरू*



Click:*मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर पुन्हा आमरण उपोषणाची वेळ* • _पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार_


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या