MB NEWS-कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची ढोलताशांच्या गजरात तिरंगा जनजागरण रँली

 कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची ढोलताशांच्या गजरात  तिरंगा जनजागरण रँली

राजमाता जिजाऊ, भारतमातेच्या वेशभूषेतील विद्यार्थिनींनी वेधले लक्ष, मुलींचे ढोलताशा पथक



परळी वैजनाथ दि.१० (प्रतिनिधी)

           येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा अभियानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी भव्य रँलीचे आयोजन बुधवारी (दि.१०) करण्यात आले. या रँलीतील मुंलीचेच ढोलताशा पथक, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, भारतमातेच्या वेशभूषेतील विद्यार्थिनींनी गावभागातील रहिवाशांचे लक्ष वेधून घेतले. भारतमाता की जय, वंदे मातरम्,७५ वा अमृत महोत्सव चिरायू होवो च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता.

Click &watch:■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*

                 शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त हरघर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा जनजागरण रँलीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. रँलीची सुरुवात लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातून संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख,प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे यांच्या उपस्थित करण्यात आले.  

Click &watch:*परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली*

मुलींच्या ढोलताशांच्या गजरात निघालेली रँली जुन्या गावभागातील गणेशपार मार्गे अंबेवेस, नेहरू चौक,राजमाता जिजाऊ गार्डन,राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक ते महाविद्यालयात संपन्न झाली. रँली मार्गावर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, भारतमाता आदिंच्या वेशभूषा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मर्दानी खेळाचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी दाखवले, यामध्ये तलवारबाजी, लाठीकाठी आदि खेळ चौकाचौकात दाखवण्यात आले.भारतमाता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषांनी रँली मार्ग दणाणून गेला होता.

Click:■ *तब्बल दोन वर्षे पाच महिन्यानंतर या स्वातंत्र्यदिना पासून सुरू होणार परळी -मिरज रेल्वे*

 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रायीन मानाचे भगवे फेटे परिधान केल्याने रँली मार्गावरील रहिवाशांचे लक्ष वेधून घेत होते. विद्यार्थ्यांनी हरघर तिरंगा संदर्भात नागरीकांमध्ये जनजागरण करण्यासाठी माहिती पत्रक वाटप केले. या रँली मध्ये विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Video News :


-------------------------------------------------------

Video News :


Click: *औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण सुरू*



Click:*मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर पुन्हा आमरण उपोषणाची वेळ* • _पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार_





--------------------------------------------------------

- video news-

--------------------------------------------------------

Click: ■ *श्रीकृष्णाष्टमी निमित्त संत सोपान काका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

Video News :Video News :



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !