MB NEWS- *परळीत होणाऱ्याा शिवमहापुराण कथेचे स्वागताध्यक्षपदी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे*

 *परळीत होणाऱ्याा शिवमहापुराण कथेचे स्वागताध्यक्षपदी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे*



*आंतराष्ट्रीय कथा वाचक प.पु.श्री.प्रदिपजी मिश्रा यांची शिव महापुराण कथा लाभ घ्यावा :-मथुरा प्रतिष्ठान*


प्रतिनिधी परळी वै.


बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावण भुमी असलेल्या परळीत येत्या सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे.या शिव पुराण कथेच्या स्वागताध्यक्ष म्हणून माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे असणार आहेत अशी माहिती या कथेचे यजमान गोपाल बन्सीलालजी सोमाणी यानी ऐका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.परळी येथील मथुरा प्रतिष्ठानच्या वतीने या कथेचे आयोजन केले आहे. 


परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात येत्या १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण  प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे.सोमवार १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रध्वजाचे प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या हस्ते व प्रशासकीय अधिकारी , परळी येथील शिवभक्तांच्या उपस्थीतीत ध्वजारोहण होणार असुन यानंतर हवेत तिरंगा बलुन सोडण्यात येणार आहेत. 

---------------

६५ हजार भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था 

परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानावरील एकुण ३३ एकरातील दहा एक्करमध्ये मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कथेचे यजमान गोपाल बन्सीलालजी सोमाणी यांच्याकडून ५० हजार तर विविध सामाजीक संघटनाकडून १५ हजार अशा एकुण ६५ हजार भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असुन सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत महाप्रसाद असणार आहे.

-------------

महाराष्ट्रासह पर राज्यातुन शिवभक्त येणार 

सध्या सुरू असलेला श्रावण मास या शिवाय पाचवे ज्योर्तिर्लिंगामुळे परळीत शिव महापुराण कथेला बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रासह पर राज्यातुन शिवभक्त येणार  मोठ्या प्रमाणात गर्दी वाढणार असल्याने पोलिस बंदोबस्त वाढवला जाणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी १५० सिक्युरिटी गार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. 

----------

सात दिवस रक्तदान शिबिर, बुस्टर डोस मिळणार 

परळी येथील शिवपुराण कथा  मंडपस्थळी  १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२२ अशा सात दिवसाच्या काळात रक्तदान शिबिर, कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती तेजस सोमानी यांनी दिली. 

------------





-------------------------------------------------------

Video News :

--------------------------------------------------------

- video news-

--------------------------------------------------------

Video News :

-------------------------------------------------------

Video News :


-------------------------------------------------------





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार