पोस्ट्स

MB NEWS-परळी तालुका पेन्शनर्स असो.व स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वतीने शनिवारी ‘पेन्शनर्स डे’ चे आयोजन

इमेज
  परळी तालुका पेन्शनर्स असो.व स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वतीने शनिवारी ‘पेन्शनर्स डे’ चे  आयोजन   परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- परळी तालुका पेन्शनर्स असोसिएशन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गांधी मार्केट  परळीच्या वतीने शनिवार, दि.17 डिसेंबर 2022 रोजी ‘पेन्शनर्स डे’ चे आयोजन करण्यात आले. तरी सर्व सभासद, पेन्शनर्स बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परळी तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष रंगनाथ मुंडे यांनी केले आहे. भारतीय स्टेट बँक गांधी मार्केट शाखेचे प्रबंधक श्री गंगाधर विठ्ठलराव नरावाड साहेब हे बँके मार्फत पेन्शनर्स व जेष्ठांसाठीच्या योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पेन्शनर्स बांधवांना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न, मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी ठिक 10 वाजता परळी येथील आर्य समाज मंदिर सभागृह, रोडे चौक, उपजिल्हा रूग्णालयाजवळ परळी वै. येथे पेन्शनर्स डे चा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त वार्षिक सर्वसाधारण सभेचेही आयोजन केले आहे. तरी सर्व पेन्शनर्स सभासद आणि सभासद होऊ इच्छिणार्‍यांनी आणि जेष्ठ नागरिकांनी ही आवर्जुन मोठ्या संख्येने उपस

MB NEWS-प्राप्तिकर विभागाच्या नऊ अधिकाऱ्यांना नागपुरात सीबीआयची अटक, डमी उमेदवार बसवून परीक्षा

इमेज
  प्राप्तिकर विभागाच्या नऊ अधिकाऱ्यांना नागपुरात सीबीआयची अटक, डमी उमेदवार बसवून परीक्षा ------- नागपूर : सीबीआयच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नागपुरात कार्यरत प्राप्तिकर विभागाच्या नऊ अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी अटक केली. सीबीआयच्या या कारवाईमुळे प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.  रिंकी यादव स्टेनोग्राफर (ग्रेड-दोन), अनिल कुमार, राहुल कुमार, अभय कुमार, मुकेश कुमार, चंदन कुमार, मनोज कुमार, प्रदीप कुमार आणि मनीष कुमार, अशी अटकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१२ , २०१४ मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे प्राप्तिकर विभागासाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत १२ विद्यार्थ्यांनी डमी उमदेवार बसविल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाची कसून तपासणी सुरू केली.  २०१८ मध्ये सीबीआयने कट रचून फसवणूक केल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सीबीआयच्या पथकाने कार्यरत असलेल्या १२ जणांच्या स्वाक्षरी, अंगठ्याचे ठशाचे नमुने घेतले. न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडे ते तपासणीसाठी पाठविले. काही दिवसांपूर्वीच प्रयोगशाळेचा अहवाल स

MB NEWS-लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त शहरात लोकउपयुक्त कार्यक्रम

इमेज
  समाजसेवा हिच ईश्वरसेवा समजून सामाजिक कार्य करत राहणार - रामप्रभु मुंडे लोकनेते गोपीनाथराव मुंडे  यांच्या जयंती निमित्त शहरात लोकउपयुक्त कार्यक्रम गंगाखेड (प्रतिनिधी) लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गंगाखेड शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यापैकी सकाळी योग साधना शिबिर नवा मोंढा मार्केट यार्ड या ठिकाणी घेण्यात आले. Click: ■ आठवण लोकनेत्याची | भाषणातील "त्या" ओळी आणि वातावरण भावूक | पंकजा मुंडेंच्या डोळ्यात अश्रू.  गोदावरी घाट पूर्ण स्वच्छता अभियान राबवण्यात आले, वृक्षारोपण श्री स्टोन क्रेशर येथे करण्यात आले, निबंध लेखन स्पर्धा, रुग्णांना फळ वाटप व परिचारिका सन्मान, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर शाळा आणि डॉ. झाकीर हुसेन स्कूल उर्दू शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. Click: ■ WATCH: गोपीनाथ गडावर पंकजाताई हरिभजनात तल्लीन.  गंगाखेड शहरातील उत्कृष्ट महिला बचत गट या सर्वांचा सन्मान करण्यात आला, माजी सैनिक यांचा सत्कार, सर्प मित्रांसाठी सुरक्षा कीट वाटप, नवीन राशन कार्ड वाटप, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निर

MB NEWS-विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासाठी अकराशे कोटी

इमेज
  विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासाठी अकराशे कोटी आश्रमशाळांचा प्रश्न वार्‍यावरच   मुंबई,  : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत विनाअनुदानित शिक्षकांच्या वाढीव अनुदानासाठी अकराशे कोटी रुपये अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील दोन हजार शाळांमधील 40 टक्के वेतन अनुदान मिळालेल्या शाळांच्या जवळपास पाच हजार शिक्षकांना आता 60 टक्के अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शिक्षकांचे दरमहा पगार आता 25 हजार रुपयांवरून 40 हजारपर्यंत वाढतील. 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली होती; मात्र अनुदान मंजूर न केल्याने पुढील प्रक्रिया थांबली होती. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर या Click: ● *मंगळवार १३ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय*       शिक्षकांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर 2018 मध्ये हे अनुदान 40 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले. आता हा टप्पा 60 टक्केपर्यंत करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. अकराशे कोटी रुपयांचे अनुदान वितरित झाल्यांनतर शि

MB NEWS-टिक टॉक स्टार संतोष मुंडेसह पुतण्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

इमेज
  टिक टॉक स्टार संतोष मुंडेसह पुतण्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू धारूर, प्रतिनिधी...       धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील टिक टॉक स्टार संतोष मुंडे व त्यांचा पुतण्या बाबुराव मुंडे यांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या दुर्दैवी मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.         धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे १३ डिसेंबर वार मंगळवार रोजी सायंकाळी सात वाजता गावातील मुंडे ची अळी वस्तीवरील विद्युत पुरवठा करणारी रोहित्री जवळ स्पार्किंग होत असल्याने ती पाहण्यासाठी गेलेले तेथील युवक टिक टॉक स्टार संतोष मुंडे (३२ वर्षे) व त्याचा पुतण्या बाबुराव मुंडे (२४वर्षे) हे रोहित्र च्या जवळ जाऊन बिघाड झालेला पाहत असताना बाबुराव मुंडे याला शॉक लागल्याचे कळतात आपल्या पुतण्याला शॉक लागला हे पाहून संतोष मुंडे ही बचाव करण्यासाठी धावले पण यात दोघेही विजेच्या धक्क्याने जखमी झाले. तेलगाव येथील खाजगी रुग्णालयात नेले असता दोघांनाही मयत घोषित केले.       टिक टॉक च्या माध्यमातून जगासमोर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी चा रहिवासी संतोष मुंडे त्याच्या निरागस पण अभिनय संपन्न

MB NEWS-श्रीमद् भागवतकथा श्रवणात भाविक मंत्रमुग्ध

इमेज
अध्यात्मिक संगती ही आदर्श जीवनाची पायाभरणी - भागवतमर्मज्ञ बाळु महाराज उखळीकर  श्रीमद् भागवतकथा श्रवणात भाविक मंत्रमुग्ध  माजलगाव ।प्रतिनिधी.......          वारकरी संप्रदाय हा समन्वयाची भुमिका घेऊन भेदरहित समाजरचना अंगिकृत करणारे तत्त्वज्ञान देतो. "गीता -भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे" असे संतप्रमाण आहे. त्या अनुषंगाने विचार करता संतसंग जीवनाचे परिवर्तन घडवून आणणारा असतो. यासाठी अध्यात्मिक बैठक गरजेची असुन अध्यात्मिक संगती आदर्श जीवनाची पायाभरणी करणारी असल्याचे प्रतिपादन भागवत मर्मज्ञ बाळु महाराज उखळीकर यांनी केले.        श्री. विठ्ठल भगवान काॅम्प्लेक्स गृृहसंस्कार कार्यानिमित्त शेजुळ व गुळभिले परिवाराच्या वतीने दि. ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर या सप्ताहात दररोज  दुपारी २ ते ५ या वेळेत श्री. विठ्ठल भगवान काॅम्प्लेक्स बीड रोड माजलगाव येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.सुप्रसिद्ध भागवतकथा प्रवक्ते ह.भ.प. भागवत मर्मज्ञ बाळु महाराज जोशी उखळीकर यांच्या अमृत वाणीतून भागवत कथा निरुपण होत आहे. या कथेच्या पंचम  दिवसाच्या कथा प्रसंगी भागवतमर्मज्ञ बाळु महार

MB NEWS:लोकनेते गोपीनाथराव मुंडे जयंती :भेल संस्कार केंद्रात अनेकविध शालेय उपक्रम व कार्यक्रम

इमेज
लोकनेते गोपीनाथराव मुंडे जयंती :भेल संस्कार केंद्रात  अनेकविध शालेय उपक्रम व कार्यक्रम   लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे  यांच्या ७३व्या जयंतीनिमित्त भेल संस्कार केंद्रात "भव्य खुल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा" बक्षीस वितरण आणि "दिनदर्शिका २०२३"विमोचन सोहळा उत्साहात  संपन्न. परळी वै ( प्रतिनिधी):       "कोणाचे नेते काय देऊन गेले,       आमचे लोकनेते आम्हाला न्याय         देऊन गेले ,होय देतोय आम्ही         त्यांना देव्हार्यात जागा,कारण ते  आम्हाला खरी ओळख देऊन गेले...!" अशीच भावना सर्वांच्या मनात साहेबाबद्दल आजही आहेत " *"संघर्षाला सामोरे जाऊन जे उभे राहतात आणि आपल्यासोबत इतरांनाही मोठे करतात, तेच खरे लोकनेते असतात." असेच एक लोकनेते म्हणजे स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब* यांच्या जयंतीचे औचित्य साधून भा.शि.प्र.सं.अंबाजोगाई संचलित भेल संस्कार केंद्र ,मराठवाडा परिक्षेत्रातील एक अग्रगण्य संस्थेत भव्य खुल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. *" आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा*"     ही स्पर्धा दोन गटात  वेगवेगळय़ा विषयावर घेण्यात

MB NEWS-परळीतील प्रा राजकुमार यल्लावाड यांची विद्यापीठ अभ्यास मंडळावर निवड

इमेज
  परळीतील प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड यांची विद्यापीठ अभ्यास मंडळावर निवड परळी वैजनाथ, प्रतिनिधी  येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळावर निवड झाली आहे.  या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. MB NEWS- Live:- माजलगाव-भागवत कथा        प्रा डॉ. राजकुमार यल्लावाड हे मराठी साहित्य क्षेत्रात नेहमीच सक्रिय असतात.  मराठवाडा साहित्य परिषदेचे सचिव म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ते मराठी विषयाचे अध्यापन करतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळावर निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.    प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड यांची मराठी अभ्यास मंडळावर पुन्हा एकदा निवड     प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळावर पुन्हा एकदा विक्रमी मतांनी निवड झाली आहे. त्यांचे आतापर्यंत ६ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. शिवाय त्यांच

MB NEWS-नागपूर येथे १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

इमेज
  नागपूर येथे १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबई, दि. १३ : विधिमंडळाचे सन २०२२ चे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. १९ डिसेंबरपासून विधान भवन, नागपूर येथे सुरु होणार आहे. १९ ते ३० डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील विधानभवन येथे  विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. MB NEWS- Live:- माजलगाव-भागवत कथा

MB NEWS-मंगळवार १३ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

इमेज
मंगळवार १३ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय आज (13 डिसेंबर) पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान 2.0 (Jalyukta Shivar Abhiyaan 2.0) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय राज्य सरकार राज्यातील 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार आहे. तसंच राज्यातील शाळांना 1100 कोटींचं अनुदान देण्यास मान्यता आली आहे. एकूण 16 निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. एक नजर टाकूया मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांवर... • जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय. राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार.  (मृद व जलसंधारण विभाग) • जळगांव जिल्ह्यातील कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती देणार. २२२६ कोटी सुधारित खर्चास मान्यता. (जलसंपदा विभाग)  * आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार (आदिवासी विभाग) * खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड. राज्यातील ग्रामीण भागात सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणार. (रोजगार हमी योजना) Click: MB NEWS :●

MB NEWS-परळीत निवडणूक प्रशिक्षणात 1250 कर्मचारी सहभागी

इमेज
  परळीत निवडणूक प्रशिक्षणात 1250 कर्मचारी सहभागी परळी वैजनाथ: तालुक्यातील एकूण 80 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या  निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी सुरु आहे.या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी निवडणुक विभागाने कर्मचारी प्रशिक्षण घेतले.या प्रशिक्षणात निर्वाचन अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणात परळीत 1250 कर्मचारी सहभागी झाले. Click: MB NEWS :● LIVE ● *श्रीमद् भागवतकथा, माजलगाव : षष्ठम् दिन* >>>>>>>>>>>> *कथा प्रवक्ते: भागवताचार्य हभप बाळुमहाराज जोशी उखळीकर*                परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तहसील कार्यालय येथे आयोजित प्रशिक्षण प्रक्रियेसाठी  कर्मचाऱ्यांची  गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.परळी तालुक्यातील एकूण 80 ग्रामपंचायतीसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे

MB NEWS-परळी नगर परिषद दिव्यांगासाठीचा राखीव ५% निधी तात्काळ वाटप करावा-डॉ.संतोष मुंडे

इमेज
परळी नगर परिषद दिव्यांगासाठीचा राखीव ५% निधी तात्काळ वाटप करावा-डॉ.संतोष मुंडे  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी नगर परिषदेला दिव्यांगासाठीचा राखीव ५% निधी तात्काळ वाटप करावा अशी मागणी दिव्यांगाचे नेते तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केली आहे. याबाबत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचीही भेट घेणार असल्याचेही सांगितले आहे.         परळी नगर परिषदेला दिव्यांगासाठीचा मिळणाऱ्या राखीव 5% निधी दिव्यांगावर खर्च करने बंधनकारक आहे. कोरोनाच्या काळापासून हा निधी खर्च केलेला नाही तो निधी लवकर लवकर निधी वाटप करन्यात यावा. दिव्यांग व्यक्तींना मोठ्या आर्थिक लागत आहे. त्यामुळे हा 5 टक्के निधी दिव्यांग बांधवांच्या थेट खात्यात जमा करावा  अशी मागणी करण्यात आली आहे.  Click: MB NEWS :● LIVE ● *श्रीमद् भागवतकथा, माजलगाव : षष्ठम् दिन* >>>>>>>>>>>> *कथा प्रवक्ते: भागवताचार्य हभप बाळुमहाराज जोशी उखळीकर* नगर परिषदेला दिव्यांगासाठीचा राखीव ५% निधी तात्काळ वाटप करावा अशी मा

MB NEWS-पद्मविभूषण खा. शरद पवार यांच्या आयुरारोग्याची प्रार्थना

इमेज
  आ.धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथचरणी हजारो दिव्यांच्या ज्योती प्रज्वलित! पद्मविभूषण खा. शरद पवार यांच्या आयुरारोग्याची प्रार्थना   वाढदिवसा निमित्त परळीत विविध कार्यक्रम उत्साहात परळी वैजनाथ, प्रतिनिधी....    राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा पद्मविभूषण खा. शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त परळीत  दीपोत्सव साजरा करण्यात आला.आ.धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथचरणी हजारो दिव्यांच्या ज्योती प्रज्वलित झाल्या.पद्मविभूषण खा. शरद पवार यांच्या आयुरारोग्याची प्रार्थना करण्यात आली.त्याचबरोबर शालेय साहित्य,ब्लँकेट वाटपांसह धार्मिकस्थळी प्रार्थना आदी कार्यक्रम झाले.         भारताचे माजी कृषी मंत्री पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार  यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त  सोमवार दिनांक १२ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रभु वैद्यनाथास अभिषेक तसेेच वैद्यनाथ मंदिर परिसरातील तसेच रेल्वे स्टेशन,बस स्थानक येथील बेघरांना व गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले. उमरशाहवली दर्गा नंदागौळ रोड, हजरत दावल मलिक दर्गा मलिकपुरा येथे

MB NEWS-आंतर विद्युत केंद्र क्रिडा स्पर्धांचे परळी येथे उद्घाटन !

इमेज
  आंतर विद्युत केंद्र क्रिडा स्पर्धांचे परळी येथे उद्घाटन ! मुख्य अभियंता मोहन आव्हाड , अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन  परळी, प्रतिनिधी  दि.१२/१२/२०२२ रोजी सकाळी ठीक ९:३० वाजता खुले रंगमंच शक्तिकुंज वसाहत येथे औष्णिक विद्युत केंद्र बहिण क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडला.दिनाक १२पासून ते १४तारखे पर्यंत शक्तिकुंज वसाहत क्रीडांगणावर चालणाऱ्या स्पर्धेत कब्बडी, व्हॉलीबॉल व ऍथलेटिक्स चे सामने होणारं आहेत.  सदर  स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून मुख्य अभियंता मोहन आव्हाड ,प्रमुख पाहुणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर ,मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी  सांघिक कार्यालय मुंबई पुरुषोत्तम वार्जुरकर ,मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महानिर्मिती मुकेश मेश्राम,   औ. वि.केंद्रातील कल्याण अधिकारी दिलीप वंजारी,  याप्रसंगी मुख्य कार्यालयातून महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ पी अनबलगन (भा.प्र.से.) आणि संचालक  संजय मरुडकर यांनी आंतर विद्युत केंद्र क्रिडा स्पर्धां २०२१-२२ शुभ संदेशाचे वाचन केले,तर या वेळी अधीक्षक अभियंता एस एन बुकतारे, चंद्रकांत मोराळे, श्रीध

MB NEWS-धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक, जयंतीनिमित्त केले अभिवादन

इमेज
  तुमचा वाढदिवस आमच्यासाठी उत्सव असायचा, आज जयंती म्हणावं लागतंय याचं दुःख आहे - धनंजय मुंडे धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक, जयंतीनिमित्त केले अभिवादन परळी (दि. 12) - 'हॅलो, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय...' अप्पा या तुमच्या वाक्याचं वजन मीच काय अनेकांनी अनुभवलंय, तुमचा वाढदिवस म्हणजे उत्सव असायचा आमचा! आता जयंती म्हणावं लागतं याचं दुःख आहे, पण तुम्ही आमच्यात आहेत, तुम्ही दिलेल्या शिकवणीतून! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अप्पा... अशा शब्दात आ. धनंजय मुंडे यांनी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.  Click: 🔴 WATCH:- *गोपीनाथगड : गड उर्जेचा -गड प्रेरणेचा- गड आशेचा | लोकनेत्याचे कर्माधिष्ठित स्मृतीस्थळ |* #mbnews #subscribe #like #share #comments धनंजय मुंडे हे आज सकाळी परळी तालुक्यातील गोपीनाथ गड या स्व. मुंडे साहेबांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होऊन पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्व. मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.  Click: 🔴 WATCH:- *गोपीनाथगड : गड उर्जेचा -गड प्रेरणेचा- गड आशेचा | लोकनेत्याचे कर्माधिष्ठित स्मृतीस्थळ |* #mbn

MB NEWS-लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर राज्यभरातून गर्दी

इमेज
  लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर राज्यभरातून गर्दी सत्य, स्वाभिमान अन् वंचितांच्या सेवेचा वसा शेवटपर्यंत सोडणार नाही - ना. पंकजाताई मुंडे महापुरुष आदर्शच त्यांच्याबद्दल कुणीही चुकीचं बोलू नये गोपीनाथगड बनला धागा अन् मौनातून गुंफली एकजुटीची माळ ! परळी वैजनाथ । दिनांक १२।     लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे आपल्या सर्वांवर चांगले संस्कार आहेत. आपल्या एकजुटीच्या शक्तीतूनच कोणत्याही प्रसंगाला आपण खंबीरपणे सामोरे जातो. आपल्या कार्यक्रमांचे नेहमी विराट शक्तिप्रदर्शन, घोषणा, टाळ्या शिट्ट्या असे चित्र असते तथापि आपल्या एकजुटीची ताकद किती संयमी आहे याचा अनोखा प्रघात आजच्या आपल्या अर्ध्या तासाच्या मौनाने जगासमोर सिद्ध करून दाखवला आहे असं सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सत्य स्वाभिमान व वंचितांच्या सेवेचा घेतलेला वसा शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही अशी ग्वाही आज गोपीनाथ गडावरून दिली. महापुरुष हे आपल्यासाठी आदर्शच आहेत, त्यांच्याबद्दल वाईट, चुकीचं बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही असंही त्या म्हणाल्या.         लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साध

MB NEWS-कीर्तन संमेलनाच्या अध्यक्षपदी शामसुंदर महाराज सोन्नर !

इमेज
    कीर्तन संमेलनाच्या  अध्यक्षपदी शामसुंदर महाराज सोन्नर कोल्हापूर (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्याचे सुपूत्र महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांची कीर्तन संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे होणा-या कीर्तनसंमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध अर्थतज्ञ, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष अभय महाराज टिळक यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख कीर्तनकार सहभागी होणार आहेत. सारर्थी फाऊंडेशन गडहिंग्लज आणि समस्त आजरा वारकरी परिवार यांच्या संयोजनात बुधवार दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी गडहिंग्लज येथे होणा-या कीर्तनसंमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदाची जबाबदारी आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील शित्रे सांभाळत आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे वंशपरंपरागत चोपदार राजाभाऊ रंधवे उपस्थित राहणार आहेत.  या संमेलनात होणा-या विविध  परिसंवादात देवदत्त परुळेकर, संपत देसाई, ताई महाराज मंगळवेडेकर, धर्मकीर्ती महाराज परभणीकर, ज्ञानेश्वर महाराज बंडगर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच

MB NEWS- परळी बंदमध्ये सहभागी व्हा-देवराव लुगडे महाराज

इमेज
  सोमवार दि १२ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय औ परळी बंदला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा -देवराव लुगडे महाराज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह ज्या लोकांनी महामानवांच्या विषयी अपशब्द वापरले त्या सर्वांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी या निषेधार्थ उद्या परळी बंदची हाक सर्व पक्षांच्या वतीने देण्यात आली आहे त्या बंदला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा असून त्या बंदमध्ये संभाजी ब्रिगेड उस्फूर्त तिने सहभागी होईल असे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे. ________________________________________

MB NEWS-परळी बंदमध्ये सहभागी व्हा - काँग्रेस

इमेज
  परळी बंदमध्ये सहभागी व्हा - काँग्रेस  परळी ,प्रतिनिधी      महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह ज्या लोकांनी महामानवांच्या विषयी अपशब्द वापरले त्या सर्वांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी या निषेधार्थ उद्या परळी बंदची हाक सर्व पक्षांच्या वतीने देण्यात आली आहे.त्या सर्व पक्षीय बंदला परळी काँग्रेसचा जाहिर पाठिंबा शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी दिला आहे.    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मंत्री चंद्रकांत पाटील व इतर समाजद्रोही नेत्यांकडुन सातत्याने अपशब्द वापरले जात असुन या बेताल वक्तवे करणाऱ्याना कडक शासन होणे गरजेचे आहे असे सांगुन 12 डिसेंबर रोजी होत असलेल्या परळी बंदला काँग्रेस पक्ष ताकदीने पाठिंबा दिला असल्याचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी प्रसिद्धस दिलेल्या पञकात म्हटले आहे. ------------------------------------------------------- ---------------------------------------------------------

MB NEWS-राज्यातील अप्रिय घटनांबद्दल अर्ध्या तासाचं मौन बाळगणार ; गडावरून करणार मार्गदर्शन

इमेज
  लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची उद्या जयंती ; गोपीनाथ गड गांवागांवात पोहोचवा - पंकजाताई मुंडेंच आवाहन राज्यातील  अप्रिय घटनांबद्दल अर्ध्या तासाचं मौन बाळगणार ; गडावरून करणार मार्गदर्शन फेसबुक लाईव्ह, झुमच्या माध्यमातून कनेक्ट होण्याचं आवाहन परळी वैजनाथ ।दिनांक ११। लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची १२ डिसेंबरला जयंती आहे, यादिवशी गोपीनाथ गडावर येण्याऐवजी सर्वांनी आपापल्या परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून गोपीनाथ गड गांवागांवात पोहोचवावा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. राज्यात घडलेल्या अप्रिय घटनांबद्दल त्या उद्या अर्ध्या तासाचं मौन बाळगणार असून कार्यकर्त्यांनाही त्यांनी मौन बाळगण्याचं आवाहन केलं आहे.  Click : ■ लोकनेते गोपीनाथराव मुंडे जयंती | पंकजाताईंचा दुसरा व्हिडिओ जारी | अशी असेल गोपीनाथ गडावर जयंतीची रुपरेषा.* #mbnews #subscribe #like #share #comments    मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त उद्या १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. पासून गोपीनाथ गडावर हरिनाम भजन व समाधी दर्शनास प्रारंभ होणार आहे. सकाळी ११ वा. पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे गो

MB NEWS-मंत्रालय येथे राजेवाडीचे सुपुत्र हेडकॉन्स्टेबल दयानंद खाडे यांचा वाढदिवस साजरा

इमेज
  मंत्रालय येथे राजेवाडीचे सुपुत्र हेडकॉन्स्टेबल दयानंद खाडेंचे सहकाऱ्यांकडून अभिष्टचिंतन  मुंबई (प्रतिनिधी)...   औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलामध्ये (SRPF) हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असणारे अंबाजोगाई तालुक्यातील राजेवाडी गावचे सुपुत्र श्री. दयानंद खाडे यांचा वाढदिवस आज मंत्रालय येथे कार्यरत सहकारी पोलीस बांधवांच्या वतीने केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.      याबाबत अधिक माहिती अशी की, आपले कर्तव्य निभावत नेहमीच आपल्या मातृभूमीतील सामाजिक तथा शैक्षणिक कार्यात योगदान देणारे अंबाजोगाई तालुक्यातील मौजे राजेवाडी  गावचे भूमिपुत्र तथा औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात हेडकॉन्स्टेबल या पदावरती कार्यरत असणारे श्री. दयानंद खाडे यांचा दिनांक 10 डिसेंबर रोजी वाढदिवस अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने मंत्रालय मुंबई या ठिकाणी  कार्यरत असणाऱ्या पोलीस दलातील त्यांच्या सहकारी पोलिस बांधवांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करत केक कापून विविध मान्यवरांच्या तसेच परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस बांधवांचे ज

MB NEWS-उद्या सोमवार दि. १२ रोजी परळी बंदचे आवाहन

इमेज
  उद्या सोमवार दि. १२ रोजी परळी बंदचे आवाहन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... आज 11 डिसेंबर रविवार रोजी जिजामाता उद्यान येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये विविध पक्षाचे, संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील बैठकीमध्ये भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी जे अक्षम्य विधान केले या विधानाचा प्रथमच तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. त्याबरोबरच भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानबरोबरच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी  यांनी सुद्धा महाराजांच्या संबंधी अतिशय अवमानकारक शब्द वापरून महाराजांच्या आणि महाराजांवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावनांशी खेळ केलेला आहे.  तसेच चंद्रकांत दादा पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विषयी अपशब्द वापरले हे प्रकरण इथेच थांबले नाही तर मंगलप्रसाद लोढा, रावसाहेब दानवे, संतोष दानवे, प्रसाद लाड ही मालिका भाजपच्या पिलावळीने चालू ठेवली याचा देखील या बैठकीमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.  या संबंधाने साधकबाधक विचार करून बीड शहरातील सर्व राजकीय पक्षाचे समविचारी संघटनांच

MB NEWS-मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आवाहन_

इमेज
  पद्मविभूषण खा. शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त परळीत उद्या कार्यक्रम _मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आवाहन_  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....    राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा पद्मविभूषण खा. शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त परळीत  दीपोत्सव साजरा होणार आहे.त्याचबरोबर शालेय साहित्य,ब्लँकेट वाटपांसह धार्मिकस्थळी प्रार्थना आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस परळी च्या वतीने करण्यात आले आहे.        भारताचे माजी कृषी मंत्री पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार  यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त उद्या सोमवार दिनांक १२ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ६:०० वा.प्रभु वैद्यनाथास अभिषेक , सकाळी ६:३० वा वैद्यनाथ मंदिर परिसरातील तसेच रेल्वे स्टेशन,बस स्थानक येथील बेघरांना व गरजूंना ब्लँकेट वाटप.,सकाळी ७:०० वाजता उमरशाहवली दर्गा नंदागौळ रोड येथे चादर अर्पण., सकाळी ७:३० वाजता हजरत दावल मलिक दर्गा मलिकपुरा येथे चादर अर्पण, सकाळी ८:०० वाजता भोई गल्ली येथील

MB NEWS-गोपीनाथ गडावर नतमस्तक होत बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रचार शुभारंभ

इमेज
  गोपीनाथ गडावर नतमस्तक होत बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रचार शुभारंभ  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत परळी तालुक्यात  पॅनल तयार केले आहेत. मौजे हेळंब ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचा संपूर्ण पॅनल उभारण्यात आला असून आज ११ डिसेंबर रोजी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. गोपीनाथ गडावर जाऊन सर्व उमेदवारांनी लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे व विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन गावातून जोरदार प्रचार फेरी काढण्यात आली.  मतदारांमध्ये प्रचंड सकारात्मक वातावरण असून आम्ही या निवडणुकीत यशस्वी होऊ असा आम्हाला विश्वास असल्याचे उमेदवारांनी सांगितले. गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन सर्व उमेदवारांनी प्रचाराचा दि.११ रोजी शुभारंभ केला. यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजीराव शिंदे, विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते तसेच पॅनल प्रमुख अनंत आंधळे, राजेभाऊ आंधळे, नाथराव आंधळे यांच्यासह सरपंच पदाचे उमेदवार विष्णू लांडगे, वॉर्ड