MB NEWS-टिक टॉक स्टार संतोष मुंडेसह पुतण्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

 टिक टॉक स्टार संतोष मुंडेसह पुतण्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू



धारूर, प्रतिनिधी...

      धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील टिक टॉक स्टार संतोष मुंडे व त्यांचा पुतण्या बाबुराव मुंडे यांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या दुर्दैवी मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.


        धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे १३ डिसेंबर वार मंगळवार रोजी सायंकाळी सात वाजता गावातील मुंडे ची अळी वस्तीवरील विद्युत पुरवठा करणारी रोहित्री जवळ स्पार्किंग होत असल्याने ती पाहण्यासाठी गेलेले तेथील युवक टिक टॉक स्टार संतोष मुंडे (३२ वर्षे) व त्याचा पुतण्या बाबुराव मुंडे (२४वर्षे) हे रोहित्र च्या जवळ जाऊन बिघाड झालेला पाहत असताना बाबुराव मुंडे याला शॉक लागल्याचे कळतात आपल्या पुतण्याला शॉक लागला हे पाहून संतोष मुंडे ही बचाव करण्यासाठी धावले पण यात दोघेही विजेच्या धक्क्याने जखमी झाले. तेलगाव येथील खाजगी रुग्णालयात नेले असता दोघांनाही मयत घोषित केले.  


    टिक टॉक च्या माध्यमातून जगासमोर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी चा रहिवासी संतोष मुंडे त्याच्या निरागस पण अभिनय संपन्न स्टोरीज मुळे सोशल मीडियावर सर्वपरिचित झाला होता . संतोष मुंडे व त्याचा पुतण्या बाबुराव मुंडे हे दोघेजण सोबत असताना अचानक विजेचा शॉक लागला यामध्येच या दोघांचीही प्राणज्योत मालवली आहे. या दुर्दैवी घटनेने बीड जिल्ह्यात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !