इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-प्राप्तिकर विभागाच्या नऊ अधिकाऱ्यांना नागपुरात सीबीआयची अटक, डमी उमेदवार बसवून परीक्षा

 प्राप्तिकर विभागाच्या नऊ अधिकाऱ्यांना नागपुरात सीबीआयची अटक, डमी उमेदवार बसवून परीक्षा



-------

नागपूर : सीबीआयच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नागपुरात कार्यरत प्राप्तिकर विभागाच्या नऊ अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी अटक केली. सीबीआयच्या या कारवाईमुळे प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 



रिंकी यादव स्टेनोग्राफर (ग्रेड-दोन), अनिल कुमार, राहुल कुमार, अभय कुमार, मुकेश कुमार, चंदन कुमार, मनोज कुमार, प्रदीप कुमार आणि मनीष कुमार, अशी अटकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१२ , २०१४ मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे प्राप्तिकर विभागासाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत १२ विद्यार्थ्यांनी डमी उमदेवार बसविल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाची कसून तपासणी सुरू केली. 




२०१८ मध्ये सीबीआयने कट रचून फसवणूक केल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सीबीआयच्या पथकाने कार्यरत असलेल्या १२ जणांच्या स्वाक्षरी, अंगठ्याचे ठशाचे नमुने घेतले. न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडे ते तपासणीसाठी पाठविले. काही दिवसांपूर्वीच प्रयोगशाळेचा अहवाल सीबीआयला मिळाला. १२ पैकी रिंकी यादव, अनिल कुमार, राहुल कुमार, अभय कुमार, मुकेश कुमार, चंदन कुमार, मनोज कुमार, प्रदीप कुमार आणि मनीष कुमार हे परीक्षेला प्रत्यक्ष हजर झाले नाहीत. त्यांच्या जागी डमी उमेदवाराने परीक्षा दिल्याचे निष्पन्न झाले.




 सीबीआयचे उपमहानिरीक्षक सलीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप चोगले यांच्या नेतृत्वातील विविध पथकांनी मंगळवारी अटकसत्र राबवून नऊ जणांना अटक केली. सीबीआयच्या पथकाने त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची १६ डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!