MB NEWS-विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासाठी अकराशे कोटी

 विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासाठी अकराशे कोटी



आश्रमशाळांचा प्रश्न वार्‍यावरच  


मुंबई,  : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत विनाअनुदानित शिक्षकांच्या वाढीव अनुदानासाठी अकराशे कोटी रुपये अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील दोन हजार शाळांमधील 40 टक्के वेतन अनुदान मिळालेल्या शाळांच्या जवळपास पाच हजार शिक्षकांना आता 60 टक्के अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शिक्षकांचे दरमहा पगार आता 25 हजार रुपयांवरून 40 हजारपर्यंत वाढतील.


2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली होती; मात्र अनुदान मंजूर न केल्याने पुढील प्रक्रिया थांबली होती. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर या






      शिक्षकांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर 2018 मध्ये हे अनुदान 40 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले. आता हा टप्पा 60 टक्केपर्यंत करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. अकराशे कोटी रुपयांचे अनुदान वितरित झाल्यांनतर शिक्षकांचे पगार 10 हजारांनी वाढणार आहेत.




दुसर्‍या बाजूला अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन त्याच पदावर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे पटसंख्येअभावी बंद होत असलेल्या शाळांमधील शिक्षकांच्या मान्यतेचा प्रश्न प्रलंंबित होता. याबाबत वैयक्तिक मान्यता असलेल्या शिक्षकांना अंशतः अनुदान असलेल्या समान टप्प्यावर समायोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 2022-23 संच मान्यतेमध्ये अतिरिक्त ठरलेल्या वैयक्तिक मान्यताप्राप्त शिक्षकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !