इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-परळी तालुका पेन्शनर्स असो.व स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वतीने शनिवारी ‘पेन्शनर्स डे’ चे आयोजन

 परळी तालुका पेन्शनर्स असो.व स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वतीने शनिवारी ‘पेन्शनर्स डे’ चे  आयोजन 



परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- परळी तालुका पेन्शनर्स असोसिएशन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गांधी मार्केट  परळीच्या वतीने शनिवार, दि.17 डिसेंबर 2022 रोजी ‘पेन्शनर्स डे’ चे आयोजन करण्यात आले. तरी सर्व सभासद, पेन्शनर्स बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परळी तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष रंगनाथ मुंडे यांनी केले आहे.


भारतीय स्टेट बँक गांधी मार्केट शाखेचे प्रबंधक श्री गंगाधर विठ्ठलराव नरावाड साहेब हे बँके मार्फत पेन्शनर्स व जेष्ठांसाठीच्या योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पेन्शनर्स बांधवांना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न, मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी ठिक 10 वाजता परळी येथील आर्य समाज मंदिर सभागृह, रोडे चौक, उपजिल्हा रूग्णालयाजवळ परळी वै. येथे पेन्शनर्स डे चा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त वार्षिक सर्वसाधारण सभेचेही आयोजन केले आहे. तरी सर्व पेन्शनर्स सभासद आणि सभासद होऊ इच्छिणार्‍यांनी आणि जेष्ठ नागरिकांनी ही आवर्जुन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परळी तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष रंगनाथ मुंडे व त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!