MB NEWS-उद्या सोमवार दि. १२ रोजी परळी बंदचे आवाहन

 उद्या सोमवार दि. १२ रोजी परळी बंदचे आवाहन 




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

आज 11 डिसेंबर रविवार रोजी जिजामाता उद्यान येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये विविध पक्षाचे, संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील बैठकीमध्ये भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी जे अक्षम्य विधान केले या विधानाचा प्रथमच तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. त्याबरोबरच भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानबरोबरच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी  यांनी सुद्धा महाराजांच्या संबंधी अतिशय अवमानकारक शब्द वापरून महाराजांच्या आणि महाराजांवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावनांशी खेळ केलेला आहे.


 तसेच चंद्रकांत दादा पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विषयी अपशब्द वापरले हे प्रकरण इथेच थांबले नाही तर मंगलप्रसाद लोढा, रावसाहेब दानवे, संतोष दानवे, प्रसाद लाड ही मालिका भाजपच्या पिलावळीने चालू ठेवली याचा देखील या बैठकीमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. 


या संबंधाने साधकबाधक विचार करून बीड शहरातील सर्व राजकीय पक्षाचे समविचारी संघटनांचे कार्यकर्ते एकत्र जमले आणि त्यांनी एकमुखाने दि. १२ डिसेंबर २०२२ रोजी परळी वै बंद करण्याचे आवाहन केलेले आहे. तरी शाळा, कॉलेज, व्यापारी  बांधवांनी बंदला सहकार्य करावे अशा प्रकारचे आवाहन या बैठकीमध्ये करण्यात आलेले आहे. 



या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, शिवसेना,एम आय एम, मराठा सेवा संघ,  रिपाई, बसपा, मराठा क्रांती मोर्चा, मुस्लिम सेवा संघ, वेल्फेअर पार्टी, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना आणि विविध शिक्षक संघटना, सह सर्व पक्षाचे लोक या बंदमध्ये सामील होणार आहेत. दि. १२ डिसेंबर रोजी बंदच्या दिवशी सकाळी १०:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार बंदला सुरुवात होईल त्यानंतर बस स्टॅन्ड समोर अण्णाभाऊ साठे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात येईल तहसीलदार यांना निवेदन देण्यात येईल.



 ज्या निवेदनामध्ये भगतसिंग कोश्यारी यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात येईल. त्या मोर्च्यात सर्व शिवप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. तरी सर्व शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारेतील सर्व बांधवांनी आणि भगिनींनी या मोर्चाची नोंद घेऊन मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि परळी बंद यशस्वी करावा अशा प्रकारचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?