MB NEWS-राज्यातील अप्रिय घटनांबद्दल अर्ध्या तासाचं मौन बाळगणार ; गडावरून करणार मार्गदर्शन

 लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची उद्या जयंती ; गोपीनाथ गड गांवागांवात पोहोचवा - पंकजाताई मुंडेंच आवाहन



राज्यातील  अप्रिय घटनांबद्दल अर्ध्या तासाचं मौन बाळगणार ; गडावरून करणार मार्गदर्शन



फेसबुक लाईव्ह, झुमच्या माध्यमातून कनेक्ट होण्याचं आवाहन


परळी वैजनाथ ।दिनांक ११।

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची १२ डिसेंबरला जयंती आहे, यादिवशी गोपीनाथ गडावर येण्याऐवजी सर्वांनी आपापल्या परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून गोपीनाथ गड गांवागांवात पोहोचवावा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. राज्यात घडलेल्या अप्रिय घटनांबद्दल त्या उद्या अर्ध्या तासाचं मौन बाळगणार असून कार्यकर्त्यांनाही त्यांनी मौन बाळगण्याचं आवाहन केलं आहे. 


Click:■ लोकनेते गोपीनाथराव मुंडे जयंती | पंकजाताईंचा दुसरा व्हिडिओ जारी | अशी असेल गोपीनाथ गडावर जयंतीची रुपरेषा.* #mbnews #subscribe #like #share #comments






   मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त उद्या १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. पासून गोपीनाथ गडावर हरिनाम भजन व समाधी दर्शनास प्रारंभ होणार आहे. सकाळी ११ वा. पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे गोपीनाथ गडावर समाधीचे दर्शन घेणार आहेत. दर्शनानंतर सकाळी ११.३० ते दुपारी १२ वा दरम्यान राज्यात घडलेल्या अप्रिय घटनांना प्रातिनिधिक स्वरूपात तिलांजली देण्यासाठी  त्या अर्धा तास मौन बाळगणार आहेत. तदनंतर त्या  समाधी स्थळावरून ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. सोशल मिडियाच्या म्हणजेच फेसबुक लाईव्ह, झुम लिंकच्या माध्यमातून पंकजाताई राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मुंडे साहेबांना अभिप्रेत असणारे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून गरजूंची सेवा करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?