MB NEWS:लोकनेते गोपीनाथराव मुंडे जयंती :भेल संस्कार केंद्रात अनेकविध शालेय उपक्रम व कार्यक्रम

लोकनेते गोपीनाथराव मुंडे जयंती :भेल संस्कार केंद्रात  अनेकविध शालेय उपक्रम व कार्यक्रम




 लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे  यांच्या ७३व्या जयंतीनिमित्त भेल संस्कार केंद्रात "भव्य खुल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा" बक्षीस वितरण आणि "दिनदर्शिका २०२३"विमोचन सोहळा उत्साहात  संपन्न.



परळी वै ( प्रतिनिधी):

      "कोणाचे नेते काय देऊन गेले,

      आमचे लोकनेते आम्हाला न्याय 

       देऊन गेले ,होय देतोय आम्ही 

       त्यांना देव्हार्यात जागा,कारण ते

 आम्हाला खरी ओळख देऊन गेले...!"

अशीच भावना सर्वांच्या मनात साहेबाबद्दल आजही आहेत " *"संघर्षाला सामोरे जाऊन जे उभे राहतात आणि आपल्यासोबत इतरांनाही मोठे करतात, तेच खरे लोकनेते असतात." असेच एक लोकनेते म्हणजे स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब* यांच्या जयंतीचे औचित्य साधून भा.शि.प्र.सं.अंबाजोगाई संचलित भेल संस्कार केंद्र ,मराठवाडा परिक्षेत्रातील एक अग्रगण्य संस्थेत भव्य खुल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


*"आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा*"


    ही स्पर्धा दोन गटात  वेगवेगळय़ा विषयावर घेण्यात आली .(८वी ते १०वी आणि ५वी ते ७वी ) अशा दोन गटात विभागणी करण्यात आली होती.यानुसार वेगवेगळे विषय- ( मुलांच्या करियरमध्ये पालकांची भूमिका, आत्मनिर्भर भारत, लाॅकडाऊन काळातील शिक्षण, स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी इ.) होते. तसेच भरघोस बक्षिसेही ठेवण्यात आली होती.माध्यमिक विभाग- २१००/-,१५००/-, ११००/- तर प्राथमिक विभाग-१५००/-,११००/-,५०१/- सोबत मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात  आले.या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून मा.श्री.विष्णु चव्हाण सर,मा.श्री.जोशी सर व मा.सौ.राजश्री कल्याणकर मॅडम इ.नी आपली भूमिका अगदी चोखपणे बजावली. 




या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विकासराव डुबे यांनी भूषविले.या स्पर्धेत परळी तालुक्यातील विविध शाळेतील अनेक  स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. अनेक स्पर्धकांनी आपल्या ओघवत्या शैलीत सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या स्पर्धेचा निकाल जाहीर करतांना परिक्षकांना खूप मेहनत घ्यावी लागली. परिक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरीबद्दल  त्यांचाही मान्यवरांकडून यथोचित मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- प्राथमिक गट

प्रथम- कु.मोरे अक्षरा अंगद  (६वी)

          ( विद्यावर्धिनी हायस्कूल )

द्वितीय- कु.सावंत आकांक्षा महिपाल

            ( भेल संस्कार केंद्र)

तृतीय- कु. मुंडे वैष्णवी विष्णू  (६वी)

           ( विद्यावर्धिणी हायस्कूल)

उत्ते.-   कु.कांबळे इशिका अमोल 

          ( सनराईज स्कूल)


             माध्यमिक विभाग 

प्रथम- कु.दौंड वैष्णवी भागवत (९वी)

         ( विद्यावर्धिणी स्कूल)

द्वितीय- कु. जाधव स्नेहल सतिश ९वी

         (फाऊंडेशन स्कूल)

तृतीय- कु. बदने अक्षरा महेश (८वी)

         (फाऊंडेशन स्कूल) 

उत्ते-   कु.धोंडगे श्रीनीधी        (९वी)

        (न्यु हायस्कूल  )


*दिनदर्शिका २०२३ चे विमोचन*

 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्याच्या  सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांचा कलाविष्कार प्रसिद्ध करून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शालेय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.त्यामधूनच परिक्षकामार्फत निवड झालेल्या चित्रांची एक दिनदर्शिका तयार करण्यात आली. हे संपूर्ण कार्य मा.डॉ.सतिशजी रायते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील चित्रकला शिक्षक श्री.श्रीकांत मुलगीर  सर आणि  सौ.आशा खोत मॅडम यांनी चोखपणे पार पाडले. यात त्यांना परिक्षक म्हणून मा.श्री.पुरूषोत्तम जाधव सर आणि मा.श्री.मारोती अनकाडे सर यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. या दिनदर्शिका २०२३ चे विमोचनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व लाभले ते म्हणजे *मा.प्रभाकर साळेगावकर* होय.ते एक साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध कवि,बालसाहित्यिक, राज्य शासनाकडून दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते व इतर अनेक पुरस्कार प्राप्त एक दिलखुलास व्यक्तिमत्व होय. 




त्यांच्याहस्ते या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.तसेच विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांकडून रोख रक्कम, मानचिन्ह, व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील विजेते- कु.मनस्वी महादेव मुंडे, कु.संबोधी यशवंत कांबळे,चि.युवराज उध्दव पारेकर, कु.आकांक्षा महिपाल सावंत, कु.यशश्री शरद राडकर, कु.ज्ञानेश्वरी जालिंदर राठोड, कु.सानवी पंकज अवचार,कु.शितल रविंद्र सांगळे, कु.नेत्रा प्रकाश पांचाळ कु.संस्कृती कृष्णा तेलंग,कु.श्वेता शिव नारायण वाघमारे,कु.अदिती धनराज मुंडे इ.चा यथोचित गौरव करण्यात आला. त्याबरोबरच परिक्षक व शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री.श्रीकांत मुलगीर  यांचा येथे मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला."आपले संविधान- रमेश पतंगे" लिखीत एक हे पुस्तक मा.श्री.विष्णुपंत कुलकर्णी सरांनी शाळेतील ग्रंथालयास भेट म्हणून दिली.


*श्री.श्रीकांत मुलगीर सर यांनी रेखाटलेल्या साहेबांच्या विविध छटेचे मान्यवरांकडून अनावरण:*

        या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजेच शाळेतील चित्रकला शिक्षक श्री.मुलगीर सर यांनी रेखाटलेल्या कै.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या राजकीय प्रवास यांच्या विविध छटा होय.त्याचे मान्यवरांकडून फीत कापून  अनावरण केले.त्याबरोबरच दिनदर्शिका २०२३ साठी बारा निवडक चित्रांचे विमोचन मान्यवरांकडून करण्यात आले.विजेत्यांचे त्यांच्या पालकांसोबत यथोचित सत्कार करण्यात मान्यवरांकडून करण्यात आला.



      याप्रसंगी पुढे बोलतांना प्रमुख अतिथी म्हणतात की मुलांनो तुम्ही तुमच्या आई - वडीलांचे फॅन बना. पुढे आपल्या काव्यात्मक शैलीत वास्तवावर आपले मत मांडले.

     " बळ उडाया देरे सूर्य हाती यावा

        उजेड सारा नेईन नभी

          अंधारल्या गाव

         बळ उडाया देणे सूर्य हाती यावा रंग सारे एक होती अशी पताका देरे हाती."यानंतर त्यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबाबद्दल अनेक आठवणी सांगत त्यांचा स्वभाव दर्शन केले. ते म्हणतात की " सत्तेने सरस्वतीच्या सेवकाकडे यावे याचे मी पालन केले आहे ". प्रसिद्ध लेखक, गीतकार जगदीश खेबुडकर यांचा कोल्हापूरला जाऊन सत्कार केला. पुढे आणखी एक बडबड गीत मुलांबरोबर गाऊन वातावरण एकदम प्रफुल्लित केले.



        "ईवले ईवले आम्ही अन् गुरूजी किती मोठे,तरीसुद्धा ते आमच्याशी बोलत नाहीत खोटे,मोठे गुरूजी सांगतात मोठी नवलाई, अन् रोज रोज शाळेत खूप मजा येई...." आपल्या मनोगताचा शेवट त्यांनी त्यांची सुप्रसिद्ध " आंधळा " ही कविता सादर करून केला.

    


  याप्रसंगी विचारमंचावर श्री.वसंतराव देशमुख (अध्यक्ष, शा.समिती) , श्री.विकासराव डुबे ( अध्यक्ष, शा. समन्वय समिती) श्री.विष्णुपंत कुलकर्णी (सदस्य) श्री.डॉ.सतिश रायते(सदस्य) , मा.श्री. दत्तापा ईटके (गुरुजी) सौ.शोभा भंडारी(सदस्य) श्री.एन.एस.राव (मुख्याध्यापक,सी.बी.एस.ई), श्री.पाटील परिक्षित ( मुख्याध्यापक ,स्टेट) श्री.एस.बोतकुलवार (उपमुख्यध्यापक) ,सौ.संध्या अदोडे ( कार्यक्रम  प्रमुख)इ.मान्यवरांची उपस्थिती होती.विविध मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम,  पारितोषिक, मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.




तसेच श्री.विकासराव डुबे यांनी अध्यक्षीय समारोप करतांना, "विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आजच्या या स्पर्धात्मक युगात टिकूण राहण्यास आपले व्यक्तिमत्व हे चांगले घडवावे लागेल आणि याची सुरुवात जर आपण विद्यार्थी दशेतच केली तर ती उत्तम पध्दतीने होते यासाठी वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होऊन आपले व्यक्तिमत्व घडवा आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत रहा." यानंतर त्यांनी "विजेत्यांना शुभेच्छा,परिक्षकांचे आभार व आयोजकाचे धन्यवाद मानले."




 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रोहिणी वाकडे मॅडम आणि श्री.नामदेव मुंडे सर यांनी आपल्या  खुमासदार शैलीत तर आभार प्रदर्शन श्री.मुलगीर सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर  कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम प्रमुख सौ.संध्या अदोडे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेत श्री.राहूल सुर्यवंशी यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


               

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार