पोस्ट्स

अभिष्टचिंतन लेख

इमेज
आ. धनंजय मुंडे यांचा एकनिष्ठ लढवय्या कार्यकर्ता : सय्यद सिराज        राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष सय्यद सिराज म्हणजे आ. धनंजय मुंडे यांचा एकनिष्ठ लढवय्या कार्यकर्ता आहे. गेल्या 17 वर्षापासून तो आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि जेष्ठ नेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे. त्याच्या एकनिष्ठेचे आणि प्रामाणिकपणाचे फळ म्हणून त्याला युवक काँग्रेसच्या शहराध्यक्ष हे मानाचे पद देण्यात आले. सय्यद सिराज याने कधीही स्वार्थ पाहून काम केले नाही. अगदी निस्वार्थीपणे आ. धनंजय मुंडे यांच्यासाठी जेवढे जमेल तेवढे काम करतो. या पक्ष कार्यातुन आपला काही फायदा होईल अशी अपेक्षा कधी ठेवलीच नाही. आपण केलेल्या कामातुन नागरिकांना आपल्या नेत्याबद्दल आदर वाटावा आणि नेत्याच्या नजरेत आपली कायम चांगली प्रतिमा रहावी एवढीच त्याची माफक अपेक्षा ! कोणताही राजकीय वारसा नसताना सय्यद सिराज यांनी परळीच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक कामासाठी माध्यम असावे म्हणून त्यांनी सुरूवातीला शमीम बेगम सेवाभावी संस्था स्थापन करून अनेक

तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या परळी तालुकाध्यक्षपदी श्रीराम लांडगे तर शहराध्यक्षपदी अमोल सुर्यवंशी

इमेज
  तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या परळी तालुकाध्यक्षपदी श्रीराम लांडगे तर शहराध्यक्षपदी अमोल सुर्यवंशी  परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...        मराठा सेवा संघाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या आढावा बैठकीत मराठा सेवा संघाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या विविध कक्षांच्या तालुका पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या असून मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या परळी तालुकाध्यक्षपदी पत्रकार श्रीराम लांडगे तर परळी शहराध्यक्षपदी अमोल सुर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.     याबाबत माहिती अशी की, शहरातील व्हीआयपी गेस्ट हाऊस या ठिकाणी मराठा सेवा संघाची नुकतीच एक आढावा बैठक संपन्न झाली. मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जागृती मल्टीस्टेट चे अध्यक्ष प्रा . गंगाधर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या आढावा बैठकीत मराठा सेवा संघाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या विविध  कक्षांच्या परळी तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील जाहीर करण्यात आल्या. यावेळी मराठा सेव

MB NEWS:म्हणून व्हॉईस ऑफ मीडियाने केला प्रा.बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार

इमेज
म्हणून व्हॉईस ऑफ मीडियाने केला प्रा.बाबासाहेब देशमुख यांचा  सत्कार परळी (प्रतिनिधी)दि.27 - श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या सचिवपदी प्रा. बाबासाहेब वामनराव देशमुख यांची नुकतीच निवड करण्यात आली.याबद्दल व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.प्रा.देशमुख यांनी 17 जून रोजी सचिवपदाची सूत्रे हाती घेतली.त्यांच्याकडे दुसऱ्यांदा ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. प्रा.बाबासाहेब देशमुख यांच्या निवडीबद्दल व्हॉईस ऑफ मिडिया या पत्रकारांच्या संघटनेच्या वतीने निवासस्थानी नवनियुक्त सचिवांचा शाल पुष्पगुच्छ देवून हृद्य सत्कार करण्यात आला.यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष स्वानंद पाटील,उपाध्यक्ष श्रीराम लांडगे, प्रसिद्धी प्रमुख बालाजी ढगे,ज्येष्ठ पत्रकार तथा सदस्य धनंजय आढाव,रवींद्र जोशी, महादेव शिंदे,संभाजी मुंडे,संजीब रॉय, प्रा.प्रवीण फुटके यांची उपस्थिती होती. व्हॉईस ऑफ मिडियाकडून देशमुख यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
इमेज
  केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथील सैन्य दलातील जवान उमेश मिसाळ शहीद २८ जून रोजी कोल्हेवाडीत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार  केज :- केज तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना सुरतगड येथे देशसेवा बजावत असताना शहीद झाले आहेत.          केज तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ते २५ मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियन मध्ये सुरतगढ येथे सेवा बजावत होते. त्यांचे दि. २६ जून रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते दोनच वर्षां पूर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. केवळ सहा महिन्या पूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. सुभेदार सुधाकर कुटाळ व त्यांचे सहकारी शहीद उमेश चे पार्थिव घेऊन आज दि. २७ जून रोजी रात्री ११:०० नंतर दिल्ली येथून विमानाने पुणे येथे येणार आहेत. त्या नंतर ते २८ जून रोजी सकाळी ८:०० वा. पर्यंत त्यांच्या मूळगावी केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे पोहोचेल. त्या नंतर शहीद जवान उमेश मिसाळ यांचा अंत्यविधी हा संपूर्ण शासकीय इतमामात पार पडणार आहे. 
इमेज
  धडाकेबाज आयएएस अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती "छत्रपती संभाजीनगर: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी केलेला अर्ज शासनाने आज मंजूर झाला आहे. धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या केंद्रेकर यांनी अचानक व्हीआरएस घेतल्याने नागरिक तसेच प्रशासनात आश्चर्य व्यक्त होत आहे.  विभागिय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडे गेल्या महिन्यात व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यानुसार त्यांचा अर्ज आज मंजूर करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात शेतकरी कुटुंब पाहणीअंती त्यांनी दोन हंगामात १० हजार एकरी मदत शेतकऱ्यांना देण्याचं मत व्यक्त केले होते, यावरून सरकार व सनदी अधिकाऱ्यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाल्याचे बोलले गेले. दरम्यान त्यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यांचे दोन ते अडीच वर्ष सेवेचे बाकी होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये ते आयुक्त म्हणून रुजू झाले होते. शहर पाणीपुरवठा योजना पूर्ण त्यांच्या नेतृ्वाखाली पूर्ण व्हावी यासाठी कोर्टाने देखील ३० जून २०२३ पर्यंत त्यांची बदली रोखली होती. आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेले सुनील केंद्रेकर सध्य
इमेज
  सामाजिक भान असणारा खेळाडू कार्यकर्ता :  विकासराव बिडगर             पैशाने श्रीमंत नसेल तरीही मनाने माणुस श्रीमंत असेल तर सामाजिक कार्य घडते. अर्थात दातृत्वात नेतृत्व पण असावेच लागते. खरं एखादा माणूस प्रसिद्धीच्या झोतात आला तर त्याला अहंकार निर्माण होतो. मग तो इतरांपेक्षा स्वतःला वेगळे समजतात. मात्र प्रसिद्धी, पैसा मिळुनही जमिनीवर असणारे खुप कमी आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे विकासराव हिरामन बिडगर. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून नावलौकिक मिळविलेल्या व्यक्ती देशसेवा, समाजसेवेसाठी स्वतःला झोकून देतात आणि स्वतःला धन्य समजतात. अशापैकी एक आहेत विकासराव हिरामण बिडगर.            परळी वैजनाथ तालुक्यातील दाऊतपुर ही विकासराव बिडगर यांची जन्मभूमी. अगदी शाळेत असल्यापासूनच विकासराव यांना कबड्डीची आवड होती. कबड्डी हा एक मैदानी आणि रांगडा खेळ आहे. या खेळात ताकदीपेक्षा अंगातील चपळता, लवचिकता आणि बुद्धीमत्ता याची कसोटी लागते. या सर्व गोष्टी विकासराव बिडगर यांच्याकडे होत्या. या बळावरच ते बीड जिल्हा संघात आणि पुढे कबड्डीत महाराष्ट्राच्या संघातून खेळले. एक उत्कृष्ट चढाईपटू म्हणून त्यांची

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात छ.शाहू महाराज यांची जयंती साजरी

इमेज
  शाहु महाराजांच्या कार्यामुळे अनेक पिढ्या संपन्न झाल्या-धनंजय आढाव यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात छ.शाहू महाराज यांची जयंती साजरी परळी वैजनाथ (प्रतिनिधी)          वंचित, उपेक्षित व शोषित यांना खऱ्या अर्थाने सन्माने जगायला शिकवणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षण व इतर सुविधा उपलब्ध करुन दारिद्र्याच्या खाईत खिचपत पडलेल्या समाजाला प्रगतीची वाट दाखविली.यामुळे आज अनेक पिढ्या संपन्न झाल्या असल्याचे मत पत्रकार धनंजय आढाव यांनी व्यक्त केले.शाहु महाराजांची जयंती नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.   दिनांक 26 जुन हा दिवस लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती म्हणून संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे व दैनिक दिव्य मराठीचे प्रतिनिधी धनंजय आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.ए.डी.शेख,प्रा.
इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी परळी वैजनाथ दि.२६ (प्रतिनिधी)             लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.            लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्रा.डॉ लक्ष्मण मुंडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा.डॉ विनोद जगतकर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, प्राचार्या देशपांडे, प्रा. देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

आषाढी वारीनिमित्त हभप शामसुंदर सोन्नर यांची विशेष लेखमाला: क्रमांक -२

इमेज
विठ्ठल जिवीचा जिव्हाळा ________________________ संपदा सोहळा नावडे मनाला l लागला टकळा पंढरीचा l अशी अवस्था वारक-यांची झाली आहे.  कोणत्याही अपेक्षेशिवाय,  लाभाच्या आशेशिवाय लाखोवारकरी दर वर्षी विठूरायाच्या भेटीसाठी येत असतात. हा विठ्ठल या वारकऱयांचा आहे तरी कोण, त्याचे वारकऱ्यांशी नाते आहे तरी नेमके कोणते, एवढा जिव्हाळा त्यांना या पांडुरंगाबद्दल का वाटतो. त्याचे एकमेव कारण आहे, आषाढी वारीनिमित्त जाणून घेतले पाहिजे. पंढरीचा पांडुरंग एक आलौकिक दैवत आहे. इतर दैवतांचा विचार केला तर त्यांच्या हातात कोणते ना कोणते शस्त्र असते.  त्याने कोणत्या तरी दैत्याचा संहार केलेला असतो. अशा देवाबद्दल एक धाक असतो. वारकरी संतांनी देवाविषयी असलेला धाक, भीती पार पुसून टाकली. त्याला आई, बाप,  चुलता,  सखा  इतकेच  नव्हे तर पती म्हणूनही संबोधले. हे सर्व एका अलौकिक जिव्हाळ्यातून घडले. देव कुणी तरी अगाध आहे. सर्व शक्तीमान आहे. त्याचा कोप झाला तर आपला तो विनाश करील. त्याची मर्जी सांभाळली पाहिजे. त्यासाठी यज्ञ, जप, तप केले पाहिजेत. त्यासाठी गृह त्याग करून वनात गेले पाहिजे. असा देवाविषयी प्रचंड धाक लोकमानसात होता. त्या
इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये  राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी परळी प्रतिनिधी- जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये आरक्षणाचे जनक, रयतेचे कैवारी, बहुजन समाजाचे उद्धारक ,लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक ,शैक्षणिक ,आर्थिक ,राजकीय क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केलेली आहे. त्यांचे कार्य व विचार आजही समाजाला प्रेरणादायी ठरतो.राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.जे व्ही जगतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ बी व्ही केंद्रे, डॉ.माधव रोडे, डॉ व्हि जे चव्हाण, डॉ रमेश राठोड, डॉ अर्चना चव्हाण, डॉ व्ही.बी गायकवाड,  डॉ गजभारे,  डॉ विश्वनाथ फड,  डॉ व्ही व्ही मुंडे ,डॉ बी एस सातपुते, डॉ एन एस जाधव, प्रा शिंदे, प्रा एस बी रणखांबे, प्रा किरवले यांच्यासह कार्यालयीन प्रमुख श्री अशोक रोडे व शिक्षकेत्त्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आनंदवारी: आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर यात्रेकरीता बीड विभागातून १८० बसेस

इमेज
  आनंदवारी: आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर यात्रेकरीता बीड विभागातून १८० बसेस परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... आषाढी एकादशी निमित्त यात्रेकरीता पंढरपुर येथे जाण्या-येण्यासाठी बीड विभागातून १८० बसेसचे सोय करण्यात आली आहे. भावीक भक्तांसाठी रा. प. बीड विभाग यांचे मार्फत  बीड विभागाचे  आगारातून  यात्रेचा कालावधी दि. २४/०६/२०२३ ते दि. ०४/०७/२०२३ असा असुन मुख्य दिवस एकादशी दि. २९/०६/२०२३ (गुरुवार) तर पोर्णिमा दि. ०३/०७/२०२३ (वार सोमवार) या कालावधीत बसेसची सोय करण्यात आली आहे. बीड २५, परळी २५, धारुर १५,माजलगांव १६, गेवराई२०,पाटोदा२०, आष्टी २०,अंबाजोगाई २५  अशा  एकुण १८० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  तसेच प्रवाशांसाठी पंढरपुर साठी आगाऊ आरक्षणासाठी बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.  भावीकांच्या मागणीनुसार आवश्कते प्रमाणे बसेस उपलब्ध करण्यात येतील. सदर बाबत प्रवाशांनी संबंधितआगार प्रमुख / स्थानक प्रमुख यांचे शी संपर्क साधावा. प्रवाशांनी रा.प बसनेच प्रवास करावाखाजगीवाहनाने प्रवास करू नये असे आवाहन करण्यात येत आहे. ४५ प्रवाशीचा समूह गावातून पंढरपूर करिता उपलब्ध असल्यास आपले गावातून थेट प्रव

तृतीयपंथी बाजारपेठेत आपसात भिडले : वाद गेला पोलिसांत

इमेज
  तृतीयपंथी बाजारपेठेत आपसात भिडले : वाद गेला पोलिसांत परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      परळीच्या बाजारपेठेत फिरणाऱ्या तृतीयपंथीचा वाद मारामारीपर्यंत गेला आणि भरबाजाजारपेठेत तुंबळ हाणामारीची घटना आज  दि.26/06/2023 रोजी सकाळी 11.30 वा. सुमारास घडली.याबाबत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.        पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहीतीनुसार, आज  दि.26/06/2023 रोजी सकाळी 11.30 वा. सुमारास  राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक परिसरात तृतीयपंथी इसम एकमेकांशी भिडले. जोराचा वाद व हाणामारी झाली.या भांडणात एक जण जखमी झाला आहे.याप्रकरणी फिर्यादी दिव्या माय बक्स (तृतियपंथी) वय 28 रा. रविवार पेठ अंबाजोगाई यांच्या फिर्यादीवरून आरोपी 1)गायत्री 2) योगेश, 3) समिरा, 4) सिमरान व इतर चार यांच्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गु.रं.न- 122/2023 कलम 320,323, 504, 500, 142, 143,149, भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनि सपकाळ हे करत आहेत. 
इमेज
  धनंजय मुंडेंच्या जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद अनेकांची कामे जागच्या जागीच मार्गी! परळी वैद्यनाथ (दि. 26) - आ. धनंजय मुंडे हे आज परळी वैद्यनाथ शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात जनता दरबार उपक्रमांतर्गत उपस्थित होते. या जनता दरबारास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. परळी वैद्यनाथ मतदारसंघासह जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आपल्या समस्या, प्रश्न, अडचणी आ. धनंजय मुंडे यांच्या समोर मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांना जागच्या जागी तात्काळ फोन लावून, पत्र देऊन यांसह अन्य मार्गांनी जास्तीत जास्त कामे जागच्या जागीच मार्गी लावण्यात आली.  आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.  यावेळी धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील प्रमुख ठिकाणांवरील वाहतुकीच्या समस्या, त्यावर पोलिसांनी करावयाची उपाययोजना यांसह आदी बाबतही चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या.  यावेळी ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, पंचायत समिती माजी सभापती पिंटू मुंडे यांसह पदाधिकारी आदी उपस्थित होते.
इमेज
आम्ही शाळकरी:बावन वर्षांनंतर ५२ वर्गमित्रांची भेट; स्नेहसंमेलन उत्साहात परळी/प्रतिनिधी परळी जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये १९७२ ते १९७४ या वर्षांमध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा *"आम्ही शाळकरी"* या शीर्षकाखाली आयोजित केलेला स्नेहमेलन सोहळा रविवारी (दि.२५ जून) उत्साहात संपन्न झाला. येथील आर्य वैश्य कार्यालयात घेण्यात आलेल्या सोहळ्याला भावनिक कल्लोळाची किनार लाभली होती. सुमारे 52 वर्षानंतर ५२ भेट आणि परस्परांना आलिंगन देण्याचा मैत्रभेटीचा अपूर्व योग साधला होता.   डॉ. श्रीपाद बुरकुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे आदी माजी विद्यार्थ्यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. वैजनाथ सुत्रावे, गोविंद कौलवार, वाल्मीक भालेराव, अरुण जैस्वाल, दिवाकर धोंड, व्यंकट पारशेवार आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाची सुरुवात सकाळी वैद्यनाथ प्रभु दर्शनाने करण्यात आली. त्यानंतर शालेय स्तरावरील आठवणींना जागवताना आर्य वैश्य कार्यालयापासून आपल्या शाळेपर्यंत प्रभात फेरी काढली. शाळेमध्ये राष्ट्रगीत गान करून प्रतिज्ञा म्हटली. शाळेतील विद
इमेज
आ.धनंजय मुंडे यांनी केला वैद्यनाथ देवल कमिटीचे नवनिर्वाचित सचिव प्रा.बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार  प्रभू श्री वैद्यनाथ देवल कमिटीचे नवनिर्वाचित सचिव, सेवानिवृत्त प्राध्यापक श्री. बाबासाहेब देशमुख सर यांचे त्यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ मंदिर समिती कार्यालय येथे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.  श्री.देशमुख यांनी याआधीही वैद्यनाथ देवस्थानच्या कमिटीचे सचिव म्हणून काम पाहिलेले आहे. माजी आ.स्व.वामनराव देशमुख यांचे ते पुत्र असून, आज पुन्हा त्यांची सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथ मंदिरात दर्शन केल्यानंतर कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र सोनी, डॉ.संतोष मुंडे, रत्नाकर मुंडे यांसह आदी उपस्थित होते.
इमेज
  महाराष्ट्राच्या कृषी खात्याची सीबीआय, ईडीच्या मार्फत चौकशी करा-  वसंत मुंडे   मुंबई (प्रतिनिधी)  कृषी खात्याअंतर्गत सर्वच  बदल्या पदोन्नती मध्ये बोगस बियाणे  खते कीटकनाशके औषधे ,जलयुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा  आरोप ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला .      महाराष्ट्र राज्यातील कृषी खात्या अंतर्गत बोगस  खते बी बियाणे औषधी संदर्भातील सर्व पुरावे जोडून  पंतप्रधान ,कृषी व खते औषधे मंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली असून बोगस सर्व  कंपन्यांचे लायसन रद्द करण्यात यावे व शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे योग्य दराने खत बी बियाणे औषधी पुरवण्याची मागणी  निवेदनाद्वारे केली आहे. कृषी खात्याची विविध लायसन देण्यासंदर्भात नियमावली असली तरी मंत्रालयातील कृषिमंत्री व प्रधान सचिव यांच्या  कार्यालयातील अधिकाऱ्या सोबत तडजोडीने व्यवहाराचा शब्द देऊन कृषी खात्यातील गुण नियंत्रण व निविष्ठा विभागातले सोनेरी टोळीने  बोगस बियाणे खते औषधी लायसन संदर्भात धुमाकूळ घातल्याची चौकशी सीबीआय व ईडी मार्फत करण्याची मागणी  काँग्रेसचे नेते  वसंत मुंडे यांनी भारत सरक

पंकजाताई मुंडेंमुळे परळी बनली लोकोपयोगी योजनांची जननी

इमेज
  केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेत सर्व सामान्य घटकांचा विचार - खा. डाॅ. प्रितम मुंडे पंकजाताई मुंडेंमुळे परळी बनली लोकोपयोगी योजनांची जननी भाजपच्या विविध आघाड्यांचा परळीत उत्साहात पार पडला मेळावा परळी वैजनाथ ।दिनांक २५। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने समाजातील विविध घटकांचा विचार करूनच योजना राबविल्या आहेत, या योजना आणि कामांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपणा सर्वांना करायचे आहे अशा शब्दांत खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आज भाजपच्या संयुक्त मोर्चा संमेलनात पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं.   मोदी @ 9 महा जनसंपर्क अभियानांतर्गत एन एच इंजिनिअरिंग काॅलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या विविध मोर्चा आणि प्रकोष्ठांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा.डाॅ. प्रितमताई मुंडे बोलत होत्या. भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहांगीर, प्रवक्ते राम कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस देविदास नागरगोजे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अजय सवई यावेळी उपस्थित होते.     पुढे बोलतांना खा. प्रितमताई म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाने समाजातील

कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात भरणार जनता दरबार

इमेज
  आ.धनंजय मुंडेंचा सोमवारी परळीत जनता दरबार नागरिक-कार्यकर्त्यांना भेटून समस्यांचे निवारण करणार, कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात भरणार जनता दरबार परळी वैद्यनाथ (दि. 25) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे हे परळी वैद्यनाथ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून नागरिक व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध असणार असून, या जनता दरबारात ते नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन नेहमीप्रमाणे त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील.  आ. धनंजय मुंडे यांचे 'लोक भेटतील तिथे जनता दरबार', या पद्धतीने कामकाज चालते. परळी वैद्यनाथ मतदारसंघातील नागरिकांसाठी ते कितीही व्यस्त असले तरीही प्रत्येक आठवड्यात राखीव वेळ ठेवतात. त्यांच्या जिथल्या तिथे काम मार्गी लावण्याच्या खास शैलीमुळे नेहमीच त्यांच्या जनता दरबारात नागरिक व कार्यकर्त्यांची हाऊस फुल गर्दी दिसून येते.  दरम्यान नागरिक व कार्यकर्त्यांना भेटून त्यांची कामे, समस्या व अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने धनंजय मुंडे हे सोमवारी दि. 26 जून रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत कृषी उत्पन्न बाजार समिती
इमेज
अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक; ‘या’ तारखेपर्यंत भरावा लागणार अर्ज -------- पुणे -गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रियेला शनिवारपासून सुरुवात झाली. या प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केले. त्यानुसार अभियांत्रिकी प्रवेशासाठी नोंदणी व अर्ज भरण्यासाठी दि. 4 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्य सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. यापूर्वी राज्य सीईटी सेलने अभियांत्रिकीचे प्रवेश दि. 15 जून रोजी जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे पालकांतून तीव्र नाराजी होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी दि.24 जून रोजी वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे स्पष्ट केले. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 800 रुपये नोंदणी शुल्क असून, आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी 600 रुपये शुल्क आहे. प्रवेशाचे वेळापत्रक अर्ज नोंदणीसाठी मुदत : 24 जून ते 3 जुलै अर्ज करणे व दाखल करण्यासाठी मुदत : 4 जुलैपर्यंत प्रवेश फेरीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार प्रवेशासाठी संकेतस्थळ :
इमेज
  विठ्ठलभक्तांना खुशखबर: मुख्यमंत्री शासकीय महापूजा करतानाही मुखदर्शन सुरु राहणार पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो भक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सुरु असतानाही वारकऱ्यांना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे. अनेक वर्षांच्या परंपरेला छेद देत विठ्ठलभक्तांसाठी घेतलेल्या या निर्णयाच सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा सुरु होण्याच्या चार तास आधीच दर्शनाची रांग बंद करण्यात येत होती. त्यामुळे आलेल्या लाखो वारकऱ्यांची मोठी गैरसोय होत असे. रांगेतील कालावधी चार तासांनी वाढल्यामुळे अनेकांचा खोळंबा व्हायचा आणि रांग वाढत जायची. परंतु ही गैरसोय टाळण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पहाटे अडीच वाजताच्या सुमारास महापूजेला येतात. जवळपास पहाटे पाच वाजेपर्यंत ही शासकीय पूजा आणि सत्कार कार्यक्रम मंदिरात पार पडतो. आता मुख्यमंत्री सपत्नीक शासकीय महापूजा करत असतानाही विठुरायाचे मुखदर्शन सुरुच ठेव
इमेज
 रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन हेल्मेट वापरण्यासंबधी अंमलबजावणीचे आरटीओचे आवाहन   बीड, ,(जि. मा. का.) :- बीड जिल्हयात सन 2022-23 मध्ये घडलेल्या अपघाताचे तुलनात्मक विश्लेशन केले असता या वर्षामध्ये घडलेल्या एकूण रस्ते अपघातांमध्ये दुचाकी व पादचारी यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले असून या अपघातापैकी 70 ते 80 टक्के अपघात हे दुचाकी चालक व पादचारी यांचेच आहे. ही बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन अतिशय चितांजनक आहे. वाहन चालवतांना हेल्मेट वापर करणे हे रस्ता सरुक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे व बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये जखमी होणारे अथवा मृत्यु पावणारे वाहन स्वार हे हेल्मेट शिवाय प्रवास करणारे असतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे हेल्मेट वापरण्यासंबधी प्रबोधानात्मक अंमलबजावणी करण्यासाठी बीड जिल्हयात व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे.             मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 194 ड मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरासंबधी तरतुदीचा भंग करणा-या अथवा त्यास संमती देण्या-या व्यक्तीस दंडाची तरतुद पुढीलप्रमाणे आहे.   कलम  129- संरक्षणात्मक हेल्मेट परिधान करणे- "4 वर

सचिवपदी ऍड. गिरीश चौधरी तर कोषाध्यक्षपदी शिवकुमार व्यवहारे

इमेज
  श्री गुरुलिंग स्वामी संस्थान बेलवाडी च्या अध्यक्षपदी दत्ताप्पा इटके गुरुजी यांची फेरनिवड सचिवपदी  ऍड. गिरीश चौधरी तर कोषाध्यक्षपदी शिवकुमार व्यवहारे परळी वैजनाथ/ प्रतिनिधी येथील श्री गुरुलिंग स्वामी संस्थान बेलवाडी च्या अध्यक्षपदी दत्ताप्पा इटके गुरुजी यांची आज रविवार दिनांक 25 जून रोजी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.  आज 25 जून रोजी श्री गुरुलिंग स्वामी संस्थान बेलवाडी येथे विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकी करिता एक व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते पुढील तीन वर्षासाठी अध्यक्षपदी दत्ताप्पा इटके गुरुजी, सचिव पदी एडवोकेट गिरीशअप्पा चौधरी तर कोषाध्यक्षपदी शिवकुमार गोविंदआप्पा व्यवहारे यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीस श्री गुरुलिंग स्वामी संस्थान बेलवाडी चे विश्वस्त सर्वश्री शंकरआप्पा उदगीरकर , प्रा.रामलिंगआप्पा काटकर सोमनाथआप्पा हालगे विजयकुमार मेनकुदळे शिवशंकरआप्पा निर्मळे, अक्षय मेनकुदळे, एडवोकेट मंदार नरवणे बैठकीस उपस्थित होते. दरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
इमेज
  समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जिल्ह्यातील उसतोड कामगारांच्या समस्या घेतल्या जाणून                                 बीड,(जि. मा. का.) :- समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बीड जिल्ह्यातील उसतोड कामगार यांच्या अडीअडचणी संदर्भात शासकिय अधिकारी व उसतोड कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांचयाशी चर्चा केली. यावेळी उसतोड कामगारांच्या विविध समस्या जाणून घेतल्या व त्याचे निराकरण करण्याच्या दृष्टीने संबंधितांना सूचना केल्या.       शासकीय विश्रामगृह बीड येथे 22 जुन 2023 रोजी या भेटीप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजकुमार शिंदे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीडच्या  उपायुक्त  मकरंद,  सहाय्यक आयुक्त समाज  कल्याणचे एस. एन. चिकुर्ते, जिल्हयातील विविध उसतोड कामगार संघटनेचे पदाधिकारी जिवन राठोड, दादासाहेब मुंडे, बबन माने, तत्वशिल कांबळे, ओमप्रकाश गिरी, मनिषा तोकले व इतर उपस्थित होते.          या बैठकीमध्

आपेट, मोरे, नागरगोजे, चाटे आदी कुटुंबांचे केले सांत्वन

इमेज
  धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघात विविध कुटुंबांच्या सांत्वनपर भेटी आपेट, मोरे, नागरगोजे, चाटे आदी कुटुंबांचे केले सांत्वन परळी वैद्यनाथ (दि.24) - परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातील कौटुंबिक दुःख कोसळलेल्या आपेट, मोरे, नागरगोजे, चाटे आदी कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून सांत्वन केले.  गिरवली बा. येथील सचिन आपेट यांच्या बंधूंचे नुकतेच निधन झाले होते, बर्दापूर येथील बंडू नाना मोरे यांच्या बंधूंचे नुकतेच निधन झाले होते, नागदरा येथील गौतमबापु नागरगोजे यांचे नुकतेच निधन झाले होते, कुसळवाडी येथील अशोक चाटे यांच्या मातीश्रींचे नुकतेच निधन झाले होते, या सर्व कुटुंबांची आ.धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर आबा चव्हाण, शिवाजीराव सिरसाट, रा.कॉ.चे परळी मतदारसंघ प्रमुख गोविंदराव देशमुख, अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, विलास मोरे, बळवंत बावणे, सुधाकर शिनगारे, बालाप्रसाद बजाज, बबलू मोरे, गोविंद फड, रामकांत घुले, ज्ञानोबा जाधव, सत्यजित सिरसाट या
इमेज
  लिंगायत संघर्ष समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी आत्मलिंग शेटे यांची निवड  परळी वै.(प्रतिनिधी):- परळी येथील विरशैव समाजाचे युवा नेते तथा परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे यांची लिंगायत संघर्ष समितीचे महाराष्ट्राचे समन्वयक लोकनेते मा.काकासाहेब कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली व लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनीलशेठ रुकारी यांच्या आदेशावरुन प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र (आबा) मुंडे यांनी लेखी नियुक्ती पत्र देऊन लिंगायत संघर्ष समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे. आत्मलिंग शेटे हे पुर्वीपासूनच लिंगायत संघर्ष समितीचे जिल्हा समन्वयक होते. त्यांची सामाजिक कार्याची आवड व कार्य असल्यामुळे त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली असल्याचे मा.काकासाहेब कोयटे यांनी दुरध्वनी वरुन बोलतांना सांगितले व आत्मलिंग शेटे यांचे अभिनंदन केले. आत्मलिंग शेटे यांची विरशैव लिंगायत समाजामध्ये गेली 20 वर्षापासून ते कार्यरत आहेत. लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने परळी येथे दि.15/7/2014 ला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी भव्य मोर्चा काढला होता. या मध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता