यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात छ.शाहू महाराज यांची जयंती साजरी

 शाहु महाराजांच्या कार्यामुळे अनेक पिढ्या संपन्न झाल्या-धनंजय आढाव




यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात छ.शाहू महाराज यांची जयंती साजरी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

 

       वंचित, उपेक्षित व शोषित यांना खऱ्या अर्थाने सन्माने जगायला शिकवणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षण व इतर सुविधा उपलब्ध करुन दारिद्र्याच्या खाईत खिचपत पडलेल्या समाजाला प्रगतीची वाट दाखविली.यामुळे आज अनेक पिढ्या संपन्न झाल्या असल्याचे मत पत्रकार धनंजय आढाव यांनी व्यक्त केले.शाहु महाराजांची जयंती नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

  दिनांक 26 जुन हा दिवस लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती म्हणून संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे व दैनिक दिव्य मराठीचे प्रतिनिधी धनंजय आढाव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रा.ए.डी.शेख,प्रा.यु.एन.फड, एस.बी. आष्टेकर ,व्ही.एन.शिंदे,  एम.पी.सातपुते,यु.बी.जगताप यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !