इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

अभिष्टचिंतन लेख

आ. धनंजय मुंडे यांचा एकनिष्ठ लढवय्या कार्यकर्ता : सय्यद सिराज



 

     राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष सय्यद सिराज म्हणजे आ. धनंजय मुंडे यांचा एकनिष्ठ लढवय्या कार्यकर्ता आहे. गेल्या 17 वर्षापासून तो आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि जेष्ठ नेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे. त्याच्या एकनिष्ठेचे आणि प्रामाणिकपणाचे फळ म्हणून त्याला युवक काँग्रेसच्या शहराध्यक्ष हे मानाचे पद देण्यात आले. सय्यद सिराज याने कधीही स्वार्थ पाहून काम केले नाही. अगदी निस्वार्थीपणे आ. धनंजय मुंडे यांच्यासाठी जेवढे जमेल तेवढे काम करतो. या पक्ष कार्यातुन आपला काही फायदा होईल अशी अपेक्षा कधी ठेवलीच नाही. आपण केलेल्या कामातुन नागरिकांना आपल्या नेत्याबद्दल आदर वाटावा आणि नेत्याच्या नजरेत आपली कायम चांगली प्रतिमा रहावी एवढीच त्याची माफक अपेक्षा !


कोणताही राजकीय वारसा नसताना सय्यद सिराज यांनी परळीच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक कामासाठी माध्यम असावे म्हणून त्यांनी सुरूवातीला शमीम बेगम सेवाभावी संस्था स्थापन करून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. शरीरशौष्ठव क्षेत्राची विशेष आवड असल्याने या क्षेत्रातही त्यांचे संपूर्ण मराठवाड्यात काम आहे. यामुळेच मराठवाडा बॉडी बिल्डिंगचे अध्यक्ष आ. धनंजय मुंडे यांनी मराठवाडा बॉडी बिल्डिंगच्या उपाध्यक्षपदी सय्यद सिराज यांची निवड करून त्यांना काम करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. पैलवान असुनही "डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर" घेऊन वागण्याच्या स्वभावामुळे एकदा संपर्कात आलेला माणुस त्यांच्यापासून दूरावत नाही. 



         

       राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष झाल्यानंतर सय्यद सिराज यांच्या कामाला आणखी गती आली. आ. धनंजय मुंडे यांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शहराच्या विविध भागात पक्षाचे जाळे निर्माण केले. सय्यद सिराज यांनी रायुकाँचे शहराध्यक्ष म्हणून अतिशय धडाकेबाज काम केले आणि आणखी करीत आहेत. या पदाच्या माध्यमातून सय्यद सिराज यांनी त्यांच्या प्रभागातील आणि शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले. वाल्मिक अण्णा कराड यांच्या नेतृत्वाखाली आणि परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अॅड. गोविंद फड, माजी नगरसेवक प्रा. विनोद जगतकर यांच्या अध्यक्षतेखाली सय्यद सिराज यांचे जोरदार काम सुरू आहे. 

      नगर परिषदेतील काम असो की दवाखाना सय्यद सिराज हे काळ - वेळ न पाहता हाकेला ओ द्यायला तयारच असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांना ते आदर्श माणतात आणि फुले - शाहू - आंबेडकरी विचाराने काम करणारे सय्यद सिराज हे आ. धनंजय मुंडे यांचे शिलेदार आहेत. सर्व जाती - धर्मातील नागरीकांच्या कामासाठी ते सदैव तत्पर असतात. एवढेच नव्हे तर नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी सय्यद सिराज यांनी आपल्या प्रभागात संपर्क कार्यालय काढले आहे. येथे दिवसभर नागरीकांची वेगवेगळ्या कामासाठी गर्दी असते. सर्वसामान्य नागरीकांना सय्यद सिराज हा हक्काचा आणि कामाचा माणुस वाटतो यातच त्यांच्या कामाची पावती आहे.

      नागरीकांच्या आरोग्यचीही सय्यद सिराज काळजी घेतात. कोणत्याही दवाखान्यात कुणालाही कसलीही अडचण असली तर अर्ध्या रात्रीही ते मदतीसाठी तयार असतात. नागरीकांसाठी त्यांनी वेळोवेळी आरोग्य शिबीर घेऊन सर्व उपचार मोफत आणि घरीच उपलब्ध करून दिले. आता तर त्यांनी आ. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आरोग्यवर्धीनी हाॅस्पीटलच मंजुर करून घेतले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये त्यांना विशेष मान सन्मान आहे.


*परळीभूषण पुरस्काराने गौरव*

       सय्यद सिराज यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांचा "परळीभूषण" या नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या भागातील विधवा, निराधार आणि उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. गोरगरीबांची कामे ते स्वखर्चाने करतात. आ. धनंजय मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी सय्यद सिराज हे अहोरात्र परिश्रम घेताना दिसतात. त्यांनी अनेकांना संजय गांधी निराधार, श्रावणबाळ आदी शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे तर अनेकांचे जनधन योजनेचे खाते उघडून दिले तर अनेकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळण्याची व्यवस्था केली आहे. गोरगरीबांच्या लग्नालाही ते सढळ हाताने मदत करतात. अनेकांना बांधकाम मजुरांची मान्यता देऊन सहकार्य केले आहे. अगदी सामन्यातील सामान्य माणसाच्या उपयोगाला येण्यातच धन्यता माणुन काम करीत असल्यामुळे शहरातील युवकांमध्ये ते लोकप्रिय आहेत. 

      अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षित, निस्वार्थी आणि स्वाभिमानी असे युवक नेतृत्व असलेल्या सय्यद सिराज यांचा आज वाढदिवस ... अशा या उगवत्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!