गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने घुले कुटुंबास पाच लाखाची मदत जाहीर

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांनी मयत विलास घुलेंच्या परिवाराचे स्वीकारले पालकत्व ; दुःखात आणि न्यायाच्या लढाईतही पाठिशी बीड दि. २३ -- टाकळी- कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या विलास घुले यांच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. मयत घुले यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत आज त्यांनी जाहीर केली आहे.    विलास घुले याच्या हत्येच्या प्रकरणात झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत ना. पंकजा मुंडे यांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पण कोवळ्या वयात काहीही संबंध नसताना त्याचा हकनाक मृत्यू झाल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांचेवर अकाली संकट आले आहे. विलास यांचे बंधू रमेश यांच्याशी ना. पंकजाताईंनी संपर्क साधून आपण विलासच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत मी  परिवाराच्या पाठिशी  ठामपणे उभी असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातू...

 केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथील सैन्य दलातील जवान उमेश मिसाळ शहीद



२८ जून रोजी कोल्हेवाडीत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार 


केज :- केज तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना सुरतगड येथे देशसेवा बजावत असताना शहीद झाले आहेत. 

        केज तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ते २५ मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियन मध्ये सुरतगढ येथे सेवा बजावत होते. त्यांचे दि. २६ जून रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते दोनच वर्षां पूर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. केवळ सहा महिन्या पूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. सुभेदार सुधाकर कुटाळ व त्यांचे सहकारी शहीद उमेश चे पार्थिव घेऊन आज दि. २७ जून रोजी रात्री ११:०० नंतर दिल्ली येथून विमानाने पुणे येथे येणार आहेत. त्या नंतर ते २८ जून रोजी सकाळी ८:०० वा. पर्यंत त्यांच्या मूळगावी केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे पोहोचेल. त्या नंतर शहीद जवान उमेश मिसाळ यांचा अंत्यविधी हा संपूर्ण शासकीय इतमामात पार पडणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या