इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 सामाजिक भान असणारा खेळाडू कार्यकर्ता :  विकासराव बिडगर


            पैशाने श्रीमंत नसेल तरीही मनाने माणुस श्रीमंत असेल तर सामाजिक कार्य घडते. अर्थात दातृत्वात नेतृत्व पण असावेच लागते. खरं एखादा माणूस प्रसिद्धीच्या झोतात आला तर त्याला अहंकार निर्माण होतो. मग तो इतरांपेक्षा स्वतःला वेगळे समजतात. मात्र प्रसिद्धी, पैसा मिळुनही जमिनीवर असणारे खुप कमी आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे विकासराव हिरामन बिडगर. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून नावलौकिक मिळविलेल्या व्यक्ती देशसेवा, समाजसेवेसाठी स्वतःला झोकून देतात आणि स्वतःला धन्य समजतात. अशापैकी एक आहेत विकासराव हिरामण बिडगर.



           परळी वैजनाथ तालुक्यातील दाऊतपुर ही विकासराव बिडगर यांची जन्मभूमी. अगदी शाळेत असल्यापासूनच विकासराव यांना कबड्डीची आवड होती. कबड्डी हा एक मैदानी आणि रांगडा खेळ आहे. या खेळात ताकदीपेक्षा अंगातील चपळता, लवचिकता आणि बुद्धीमत्ता याची कसोटी लागते. या सर्व गोष्टी विकासराव बिडगर यांच्याकडे होत्या. या बळावरच ते बीड जिल्हा संघात आणि पुढे कबड्डीत महाराष्ट्राच्या संघातून खेळले. एक उत्कृष्ट चढाईपटू म्हणून त्यांची ख्याती होती. 

          मागील काही वर्षापासून ते परळी वीज निर्मिती केंद्रातील ग्राहक भंडाराचे चेअरमन म्हणून काम पहात आहेत. परळीचे आ. धनंजय मुंडे यांचे ते अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली तसेच बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, परळी नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सामाजिक कार्यात मार्गक्रमण चालू आहे. सामाजिक कार्यात निस्वार्थपणे काम करीत राहणे. कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता गरजूंना मदत करणे, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.

        दाऊतपूर मधील आर्थिकदृष्टय़ा कमकुवत आई वडिलांना त्यांच्या मुलीच्या लग्नात मदत व्हावी म्हणून हातभार लावतात. अशा अनेक कुटुंबांना त्यांनी आर्थिक मदत करून सामाजिक दायित्व पार पाडले आहे. सामाजिक कार्याबरोबर शैक्षणिक व धार्मिक कामातही ते नेहमीच पुढे असतात. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी आदी कार्यक्रमात केवळ उपस्थितीच नाही तर स्वत काम करतात.

      राजकारण हे समाजाच्या विकासासाठी, गावाचे प्रश्न सोडविण्यासाठी झाले पाहिजे असे त्यांना वाटते. म्हणूनच आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते झटत असतात. 1995  पासून ते समाजसेवेसाठी राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. मनमिळाऊ स्वभाव, निखळ मैत्री जपण्याचा त्यांचा गुण असल्याने त्यांचे राजकारणात, व्यापारी क्षेत्रात, सहकार क्षेत्रात तसेच अधिकारी व कर्मचारी वर्गात खूप मोठा जनसंग्रह आहे. धनगर समाजाचे युवा नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे.  त्यांची तीच खरी शिदोरी आहे. लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा, नेहमी हसतमुख राहणारा आणि मैत्री जपणारा अशी वेगळी ओळख असणाऱ्या विकासराव बीडगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

✍️

- महादेव गित्ते

पत्रकार, परळी वैजनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!