इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:म्हणून व्हॉईस ऑफ मीडियाने केला प्रा.बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार

म्हणून व्हॉईस ऑफ मीडियाने केला प्रा.बाबासाहेब देशमुख यांचा  सत्कार





परळी (प्रतिनिधी)दि.27 - श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या सचिवपदी प्रा. बाबासाहेब वामनराव देशमुख यांची नुकतीच निवड करण्यात आली.याबद्दल व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.प्रा.देशमुख यांनी 17 जून रोजी सचिवपदाची सूत्रे हाती घेतली.त्यांच्याकडे दुसऱ्यांदा ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


प्रा.बाबासाहेब देशमुख यांच्या निवडीबद्दल व्हॉईस ऑफ मिडिया या पत्रकारांच्या संघटनेच्या वतीने निवासस्थानी नवनियुक्त सचिवांचा शाल पुष्पगुच्छ देवून हृद्य सत्कार करण्यात आला.यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष स्वानंद पाटील,उपाध्यक्ष श्रीराम लांडगे, प्रसिद्धी प्रमुख बालाजी ढगे,ज्येष्ठ पत्रकार तथा सदस्य धनंजय आढाव,रवींद्र जोशी, महादेव शिंदे,संभाजी मुंडे,संजीब रॉय, प्रा.प्रवीण फुटके यांची उपस्थिती होती. व्हॉईस ऑफ मिडियाकडून देशमुख यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!