आपेट, मोरे, नागरगोजे, चाटे आदी कुटुंबांचे केले सांत्वन

 धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघात विविध कुटुंबांच्या सांत्वनपर भेटी




आपेट, मोरे, नागरगोजे, चाटे आदी कुटुंबांचे केले सांत्वन


परळी वैद्यनाथ (दि.24) - परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातील कौटुंबिक दुःख कोसळलेल्या आपेट, मोरे, नागरगोजे, चाटे आदी कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून सांत्वन केले. 


गिरवली बा. येथील सचिन आपेट यांच्या बंधूंचे नुकतेच निधन झाले होते, बर्दापूर येथील बंडू नाना मोरे यांच्या बंधूंचे नुकतेच निधन झाले होते, नागदरा येथील गौतमबापु नागरगोजे यांचे नुकतेच निधन झाले होते, कुसळवाडी येथील अशोक चाटे यांच्या मातीश्रींचे नुकतेच निधन झाले होते, या सर्व कुटुंबांची आ.धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. 


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर आबा चव्हाण, शिवाजीराव सिरसाट, रा.कॉ.चे परळी मतदारसंघ प्रमुख गोविंदराव देशमुख, अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, विलास मोरे, बळवंत बावणे, सुधाकर शिनगारे, बालाप्रसाद बजाज, बबलू मोरे, गोविंद फड, रामकांत घुले, ज्ञानोबा जाधव, सत्यजित सिरसाट यांसह आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !