इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या परळी तालुकाध्यक्षपदी श्रीराम लांडगे तर शहराध्यक्षपदी अमोल सुर्यवंशी

 तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या परळी तालुकाध्यक्षपदी श्रीराम लांडगे तर शहराध्यक्षपदी अमोल सुर्यवंशी 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...

  

    मराठा सेवा संघाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या आढावा बैठकीत मराठा सेवा संघाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या विविध कक्षांच्या तालुका पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या असून मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या परळी तालुकाध्यक्षपदी पत्रकार श्रीराम लांडगे तर परळी शहराध्यक्षपदी अमोल सुर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


    याबाबत माहिती अशी की, शहरातील व्हीआयपी गेस्ट हाऊस या ठिकाणी मराठा सेवा संघाची नुकतीच एक आढावा बैठक संपन्न झाली. मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जागृती मल्टीस्टेट चे अध्यक्ष प्रा . गंगाधर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या आढावा बैठकीत मराठा सेवा संघाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या विविध  कक्षांच्या परळी तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील जाहीर करण्यात आल्या. यावेळी मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद कक्षाच्या परळी तालुकाध्यक्षपदी पत्रकार श्रीराम लांडगे तर परळी शहराध्यक्षपदी अमोल सुर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीबद्दल तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद कक्षाचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष श्रीराम लांडगे व शहराध्यक्ष अमोल सुर्यवंशी यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


   याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय नाना देशमुख, जिल्हासचिव सचिन शेंडगे, संजय सुरवसे, संभाजी ब्रिगेडचे सेवकराम जाधव, देवराव लुगडे महाराज, कृषी परिषदेचे ईश्वर जिजा सोनवणे, मराठा सेवा संघाचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष अंकुश जाधव, शहराध्यक्ष संदीप काळे, उद्योग कक्षाचे विठ्ठल साबळे, हनुमंत इंगळे, राजेश पवार, ॲड प्रदीप गिराम, जिजाऊ ब्रिगेडच्या पूजाताई काळे यांच्यासह मराठा सेवा संघाच्या विविध कक्षांचे पदाधिकारी तथा मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!