परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

 माजलगाव पाटबंधारे विभागाचा कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात;28 हजाराची लाच घेतांना पकडले

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
    माजलगाव पाटबंधारे विभाग परळी (वर्ग 1) कार्यकारी अभियंता  राजेश आनंदराव  सलगरकर या लोकसेवकास तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्यासाठी  माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यालयात  गाळ व माती काढण्याची परवानगी  मिळण्यासाठी 28 हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड युनीटने ही कारवाई केली आहे.
             याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यातील 35 वर्षिय तक्रारदार  व साक्षीदार आणि गावातील त्यांचे  5 सहकारी शेतकरी यांनी चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्यासाठी  माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यालयात  गाळ व माती काढण्याची परवानगी  मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. हे अर्ज कार्यालयीन प्रक्रियेनुसार लोकसेवक राजेश सलगरकर  यांचेकडे परवानगी करीता प्रलंबित होते. लोकसेवक सलगरकर यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना गाळ व माती  काढण्यासाठी परवानगी देण्याकरिता प्रत्येकी पाच  हजार रुपये प्रमाणे सात शेतकऱ्यांना 35 हजार रुपयाची मागणी केली होती. तडजोडीअंती प्रत्येकी 4000 प्रमाणे 28 हजार रुपयांची मागणी करून ते स्विकारण्याचे  मान्य केले. त्यावरुन आज दि. 22/05/2024 रोजी लोकसेवक सलगरकर यांचे माजलगाव पाटबंधारे विभागाच्या परळी वैजनाथ येथील कार्यालयात एसीबीने सापळा रचला. लोकसेवक सलगरकर यांनी पंचा समक्ष लाच रक्कम 28000 रुपये स्वीकारताच लाचरकमेसह त्यास रंगेहाथ पकडण्यात  आले.त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन परळी वैजनाथ  शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे .
       ही कारवाई ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षकमुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली  सापळा अधिकारी -  पोलीस निरीक्षक  ला. प्र.वि .बीड. युनूस शेख, पर्यवेक्षण अधिकारी:- शंकर शिंदे पो उप अधीक्षक ला प्र वि बीड,पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवड ,सुरेश सांगळे, श्रीराम गिरम ,अविनाश गवळी , भरत गारदे,अमोल खरसाडे,अंबादास पुरी,स्नेहल कुमार कोरडे ,
गणेश मेहेत्रे  यांच्या पथकाने केली आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?