MB NEWS-राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज जगमित्र कार्यालयात सादर करावेत - बाजीराव धर्माधिकारी

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज जगमित्र कार्यालयात सादर करावेत - बाजीराव धर्माधिकारी



*13 जुलै मध्यरात्रीपर्यंत इच्छुक अर्ज सादर करण्याचे आवाहन, अर्ज नमुना जगमित्र कार्यालयात उपलब्ध*


परळी (प्रतिनिधी) - परळी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री, आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तयारीला सुरुवात केली असून, धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस परतीच्या वतीने मागविण्यात आले आहेत. 


सदर अर्ज हे जगमित्र कार्यालयात उपलब्ध असून, हे अर्ज संपूर्ण माहिती भरून दोन प्रतींमध्ये दि. 13 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत जगमित्र कार्यालयात सादर करण्यात यावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


संबंधित वॉर्ड मधील आरक्षण, महिला व पुरुष आरक्षण, यांसह अन्य जमेच्या बाजू याबाबत सखोल माहिती दर्शविणारा अर्ज नमुना इच्छूक उमेदवारांसाठी आ. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला असून, हा अर्ज केवळ परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इच्छूक असलेल्या व्यक्तींसाठी असून इच्छुक उमेदवारांनी सदर अर्ज निर्धारित वेळेत सादर करणे बंधनकारक असणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला