उपजिल्हा रुग्णालयात इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी

 भारताच्या एकमेव महिला पंतप्रधान आयर्न लेडी म्हणजे इंदिरा गांधी- संभाजी मुंडे


  उपजिल्हा रुग्णालयात इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी 


परळी प्रतिनिधी -

     भारताच्या एकमेव महिला पंतप्रधान व आयर्न लेडी म्हणून ख्याती असलेल्या इंदिरा गांधी या देशासाठी एक आदर्शच असल्याचे प्रतिपादन टीव्ही 9 चे रिपोर्टर संभाजी मुंडे यांनी केले. परळी उपजिल्हा रुग्णालयात इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते.

       भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 101 वी जयंती उपजिल्हा रुग्णालय येथे उत्साहात साजरी करण्यात आली.19 नोव्हेंबर 1917 रोजी इंदिरा गांधी यांचा जन्म झाला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या त्या कन्या. ‘गुंगी गुडिया’ म्हणून सुरुवातीला विरोधकांनी हिणवलेल्या इंदिरा गांधी यांना त्याच विरोधकांनी पुढे ‘दुर्गा’ म्हणून संबोधले.


माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती परळी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टीव्ही 9 चे प्रतिनिधी संभाजी मुंडे ,पत्रकार विकास वाघमारे यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

       याप्रसंगी  वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरुण गुट्टे सर,  डॉ.झरेकर सर ,सहायकअधिक्षक रामधन कराड सर ,नर्सिंग स्टाफ गायकवाड,सिस्टर कराड ,सिस्टर चाटे ,भक्तराम फड ,राजु मुंडे ,तपसे यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील सर्व इन्चार्ज,स्टाफ नर्स,शिपाई व ईतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला