पोस्ट्स

MB NEWS-भरदिवसा-भरबाजारातून दहा लाखाचे दागिने केले लंपास ;चोरांचे सोन्यासह स्कुटी घेऊन पलायन

इमेज
  भरदिवसा-भरबाजारातून दहा लाखाचे दागिने केले लंपास ;चोरांचे सोन्यासह स्कुटी घेऊन पलायन    अंबाजोगाई ,एमबी न्युज वृत्तसेवा.........        एका सराफा व्यावसायिकांनी स्कुटीच्या डिक्कीत ठेवलेले दहा लाखाचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना भरदिवसा-भरबाजारात घडली आहे. अंबाजोगाई येथील सराफा  व्यापार्याचे डिक्कीत ठेवलेल्या सोन्याच्या बॅगीसह भर चौकातून स्कुटी घेऊन मेवाड हॉटेलच्या पाठीमागच्या बोळीत स्कुटी नेऊन सोडली व डिग्गीतील दहा लाखाची दागिण्याची बॅग लंपास केली.          शहरातील गुरूवार पेठ भागामध्ये राठौर ज्वेलर्सचे दुकान मालक राहुल राठौर हे सोमवारी सकाळी दहा वाजता घरातुन येवून आपले दुकानाचे शटरला लावलेले कुलूप उघडू लागले मात्र शटरच्या कुलपा मध्ये कोणीतरी  फेविक्विक व खडे टाकलेचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कुलूप उघण्यासाठी शिवाजी चौकातील कूलपाची चावी  बनवणाऱ्या कारागिराकडे धाव घेतली.आपली प्लेजर स्कुटी एमएच. ४४-एफ-४३१ क्रमांकाच्या डिग्गी मध्ये दोनशे ग्रॅम वजनाचे सोन्याची दागिने त्याची किंमत ९ लाख, ९२ हजार २९३ डिग्गीत ठेवलेले चोरट्यांनी लंपास केले. चौकात वर्दळीच्या ठिकाणी स्कुटी उभी कर

MB NEWS- *शाळकरी मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करा* *पंकजाताई मुंडे यांची मागणी*

इमेज
 *शाळकरी मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल  करा* *पंकजाताई मुंडे यांची मागणी* बीड ।दिनांक ०८। नदीपात्रात अवैधरित्या केलेल्या वाळू उपशामुळे खड्ड्यात पडून गेवराई तालुक्यातील चार शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या संतापजनक घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधित वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करून तातडीने कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. या घटनेस सातत्याने दुर्लक्ष करणारे प्रशासनही तितकेच दोषी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.     गेल्या कांही महिन्यांपासून  जिल्हयात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. नदीपात्रात अवैधरित्या   खड्डे खोदून वाळूचा सर्रास उपसा चालू आहे.  सत्ताधारी किंवा प्रशासन त्यांचेवर कसलीच कारवाई करत नसल्याने त्यांचे धारिष्टय वाढले आहे. वाळू माफियांनी खोदलेल्या नदीपात्रातील खड्डय़ात पडून गेवराई तालुक्यातील शहाजानपूर येथील चार शाळकरी मुलांचा नुकताच दुर्दैवी मृत्यु झाला, ही घटना अतिशय संतापजनक आहे, प्रशासन आणि वाळू माफिया अजून किती जणांचे बळी घेणार आहे ? असा सवाल करत पंकजाताई मुंडे

MB NEWS-राशिभविष्य (दि. ८ फेब्रुवारी २०२२)

इमेज
  राशिभविष्य (दि. ८ फेब्रुवारी २०२२) मेष: स्वप्नपूर्तीचा दिवस, अनपेक्षितपणे लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल.लोकसेवा कराल. प्रसन्नता प्राप्त होईल. मनासारख्या घटना घडतील. वृषभ : कर्जदार तगादा लावतील. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. दवाखान्यासाठी खर्च होईल. मिथुन : धनलाभाचे योग. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आतिथ्यात दिवस जाईल. विवाहविषयक आनंददायी वार्ता कानावर येईल. कर्क : मनासारख्या घटना घडतील, लोकांना सहकार्य कराल. प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. सिंह : गैरसमजातून वादविवाद होतील. संवादाने प्रश्न सोडवा. अस्वस्थता राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. अशक्तपणा जाणवेल. कन्या : प्रतिक्रिया देताना सावध राहा. मध्यस्थी करू नका, आत्मचिंतनाची गरज आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस, आर्थिकद़ृष्ट्या नुकसानकारक दिवस. तूळ : मंगलकार्यात सहभाग घ्याल. भागीदारीत लाभ होईल. छोटे प्रवास घडतील. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. वृश्चिक : जवळचे लोक सहकार्य करतील. नोकरी करणार्‍यांना लाभदायक दिवस ठरेल. पदोन्नतीचे योग. शत्रुपी

MB NEWS-*यु.पी.च्या रेवडी विक्रेत्यांची गाण्यातून साद.......अशी अभिनव कला की हातोहात होते विक्रमी विक्री !*(आवश्य पहा-वाचा VIDEO -NEWS)

इमेज
  *यु.पी.च्या रेवडी विक्रेत्यांची गाण्यातून साद.......अशी अभिनव कला की हातोहात होते विक्रमी विक्री ! परळी वैजनाथ,एमबी न्युज वृत्तसेवा......         एखादा फेरीवाला कितीसं कमावत असणार असा विचार आपण करतो पण आपल्या मेहनतीने व व्यावसायिक अभिनव शैलीचा अंगिकार करुन यश मिळवले जाऊ शकते याचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील रेवडीची  रस्त्यावर फेरी करून विक्री करणाऱ्या दोन युवकांनी दाखवून दिला आहे.विशेष म्हणजे गाण्याच्या काही ओळी एका वेगळ्या लहेजात गात  ते ग्राहकांना आकर्षित करतात.त्यांच्या त्या गुणगुणण्याचे अनेकजण फॅन झाले आहेत.         उत्तर प्रदेशातील रेवडीची परळीत सध्या मोठी डिमांड आहे. दोन युवक आपल्या रेवडीची विक्री  रस्त्यावर फेरी करून करतात. खांद्यावर दोन डब्यांची कावड,त्यावर दोन ठेल्यात आकर्षक मांडणी केलेली रेवडी ची रास व रस्त्यावर साद घालत ते रेवडीची विक्री करतात.परळीत गेल्या दीड महिन्यांपासून हे विक्रेते रेवडी विक्री करत आहेत. अल्पावधीतच रेवडी ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.रेवडीपेक्षाही गाण्याच्या काही ओळी एका वेगळ्या लहेजात गात  ते ग्राहकांना आकर्षित करतात.त्यांच्या त्या गुणगुणण्याचे अनेकज

MB NEWS-जगाला युद्धाची नव्हे, तर बुद्धाची गरज - केशव गायकवाड

इमेज
  जगाला युद्धाची नव्हे, तर बुद्धाची गरज - केशव गायकवाड फुले नगर येथील सांची बुद्ध विहारात बुद्धाच्या मूर्तीची स्थापना परळी (प्रतिनिधी) - जगाला युद्धाची नव्हे, तर बुद्धाच्या शांती मार्गाच्या धम्माची गरज असल्याचे प्रतिपादन नगरसेवक केशव गायकवाड यांनी दि ०७ फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त परळी शहरातील फुले नगर येथील सांची बुद्ध विहारात बुद्धाच्या मूर्तीची स्थापना भन्ते संगमित्र (गौतमबुद्ध विहार परभणी) यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव कांबळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते जरिचंद्र मस्के, ज्ञानोबा गायकवाड, महादेव गवारे, भगवान साकसामुद्रे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक ऍड. दिलीप उजगरे यांनी केले. तर सूत्रसंचालन अनंत तूपसामुद्रे यांनी केले. या विहाराचे नूतनीकरण, रंगरंगोटी आदी या भागाचे नगरसेवक केशव गायकवाड यांनी केले तर तथागत भगवान बुद्धाची मूर्ती समाजातील नामांकित व्यक्ती उत्तम कांबळे यांनी दिली. या वेळी भन्ते संगमित्र यांनी त्रिशरण पंचशीलाचे सामूहिक ग्रहण केले. या वेळी मोठ्या संख्येने

MB NEWS-डॉ.दिपांजली देशमुख यांनी केला प्रसूतिपूर्व मानसिक आरोग्य विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण

इमेज
  डॉ.दिपांजली देशमुख यांनी  केला प्रसूतिपूर्व मानसिक आरोग्य विषयाचा अभ्यासक्रम  पूर्ण  ........................................... परळी (प्रतिनिधी)- येथील बाबासाहेब देशमुख गुरुजी यांची नात तर विधीतज्ञा जीवनराव देशमुख यांची भाची डॉ . दिपांजली देशमुख यांनी "प्रसूतिपूर्व मानसिक आरोग्य " या विषयाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहे.सदरील अभ्यासक्रम इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ आणि न्यूरोसायन्सेस संस्थेमार्फत चालवला जातो. एक सर्वसमावेशक अभ्यासक्रम होता ज्यामध्ये प्रसूतिपूर्व काळात आईच्या मानसिक समस्यांचे व्यवस्थापन, विविध हस्तक्षेप, फार्माकोथेरपीचा तर्कशुद्ध वापर, आसक्तीचे महत्त्व, जिव्हाळ्याचा भागीदार , हिंसाचार आणि वडिलांचे मानसिक आरोग्य आणि इतर अनेक विषयांचा समावेश होता. रुग्णांच्या हितासाठी हे ज्ञान वापरण्यास उत्सुक आहे.हा यशस्वी अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी त्यांचे कुटुंबाकडून आणि शिक्षकांकडून अभिनंदन केले जात आहे. तसेच, सर्व अभ्यासक्रम समन्वयक आणि सर्व शिक्षकांचे त्यांनी आभार मानले.सध्या डॉ . दिपांजली देशमुख औरंगाबाद येथील प्रेरणा इस्

MB NEWS-श्री शनैश्वर मंदिर (जुने) अंबेवेस येथे दि.13 फेब्रुवारी रोजी शनैश्वर मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण*

इमेज
 * श्री शनैश्वर मंदिर (जुने) अंबेवेस येथे दि.13 फेब्रुवारी रोजी शनैश्वर मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण* *परळी/प्रतिनिधी* अंबेवेस परिसरातील जुन्या श्री शनैश्वर मंदिराचा कलशारोहण व श्री शनैश्वर मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवार दि.13 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. शहरातील जुने गाव भाग असलेल्या अंबेवेस येथील श्री शनैश्वर मंदिरात श्री शनैश्वर मुर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहणाचा कार्यक्रम 13 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे. श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर उटीचे मठाधिपती प.पू.श्री सुरेश महाराज ब्रम्हचारी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण करण्यात येणार आहे. भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन शनैश्वर भक्त मंडळ परळीच्या वतीने करण्यात येत आहे.

MB NEWS-रतनबाई जैस्वाल यांचे वृध्दापकाळाने निधन

इमेज
  रतनबाई जैस्वाल यांचे वृध्दापकाळाने निधन परळी वै.ता.७ प्रतिनिधी       तालुक्यातील नागापुर येथील रतनबाई श्रीरामलाल जैस्वाल यांचे सोमवारी (ता.७) पहाटे चार वाजता वृध्दापकाळाने निधन झाले आहे. श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व जैस्वाल रेडीओ ईलेक्ट्रॉनिक्सचे मालक पवनकुमार जैस्वाल यांच्या त्या मातोश्री होत्या.      नागापुर येथील जुन्या पिढीतील रतनबाई श्रीरामलाल जैस्वाल (वय ९०) यांचे नागापुर येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर नागापुर येथे सोमवारी (ता.७) दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. राख सावडण्याचा विधी बुधवारी (ता.९) सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात चार मुले प्रदिपकुमार जैस्वाल, पवनकुमार जैस्वाल, शिवकुमार जैस्वाल, संतोषकुमार जैस्वाल, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.

MB NEWS-अन् लेक रमली माहेरात....!

इमेज
अन् लेक रमली माहेरात....!   *_पंकजा मुंडे यांची नाथरा येथे उपस्थिती; पारंपरिक हरिनाम सप्ताहात काल्याचे कीर्तन श्रवण, भेटीगाठी, सांत्वन_*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        नाथरा येथे होणाऱ्या पारंपारिक अखंड हरिनाम सप्ताहात माजी मंत्री भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे  यांनी आज उपस्थिती लावली.नाथरा येथे नागरीकांच्या गाठीभेटी, स्वजनांशी हितगुज, पारंपरिक हरिनाम सप्ताहात काल्याचे कीर्तन श्रवण, भेटीगाठी, सांत्वनपर भेटी या माध्यमातून एकप्रकारे लेक माहेरात अन् माहेरच्या नातलगात रमल्याचे चित्र बघायला मिळाले.       राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांना फारसी उसंत मिळत नाही.आपले गाव, गावकरी, गावातील सण -उत्सव यात प्रत्येक वेळी सहभागी होताच येईल अशी शाश्वती नसते. व्यस्त दिनक्रमात नेत्यांना मनात असूनही मनासारखे करता येत नाही. परंतु प्रत्येकाला जशी आपल्या गावाबद्दलची ओढ आणि आत्मियता असते तीच संवेदना राजकीय नेत्यांचीही निश्चितच असणार.त्याच भावना माजी मंत्री भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नाथरा येथे गेल्यावर असतात असे नेहमीच दिसून येते.      पंकजा मुंडे दरवर्षी गावच्या सप्ताहात आवर्जून उप

MB NEWS-अखंड हरिनाम सप्ताह, ग्रामीण परंपरा आणि धनंजय मुंडे..........

इमेज
  अखंड हरिनाम सप्ताह, ग्रामीण परंपरा आणि धनंजय मुंडे यांचे नाते मंत्री धनंजय मुंडे गाव पारावरील पंगतीत जेवतात तेव्हा.. परळी वै. (प्रतिनिधी) : - महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने मुहूर्तमेढ रोवलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा खेडोपाडीच नव्हे तर शहरात देखील जोपासली जाते. येथे सर्व लहान-थोर एकत्र येऊन हरिनाम गातात व एकत्रित काल्याचा प्रसाद ग्रहण करतात.  राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे देखील आज एका अखंड हरिनाम सप्ताहाच्या समाप्ती सोहळ्यात गाव पारावार बसून गावकऱ्यांसोबत पंगतीत बसुन जेवताना दिसून आले. झाले असे की, धनंजय मुंडे यांच्या मूळ जन्मगाव नाथ्रा ता. परळी येथे पारंपरिक अखंड हरिनाम सप्ताहाचा आज काल्याचा कीर्तनाने शेवट झाला. यावेळी बालयोगी ह. भ. प. हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या अमृतवाणीतून भाविकांनी काल्याचा आंनद घेतला.  यावेळी आपल्या परंपरा जोपासणारे म्हणून ओळख असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी गावातील सप्ताहात हजेरी लावत हरिहर महाराजांचे दर्शन घेतले. एवढेच नव्हे तर गावकऱ्यांसोबत गाव पारावार (गावातील मंदिर) पंगतीला बसून धनंजय मुंडे य

MB NEWS- पंडित गिरी यांनी केलेले आ.भा.दशनाम समाज उन्नती मंडळपरभणी जिल्हा अध्यक्ष अॅड. जे.बी.गिरी अभिष्टचिंतन.

इमेज
 🌑 *वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा*🌑   पंडित गिरी यांनी केलेले आ.भा.दशनाम समाज उन्नती मंडळपरभणी जिल्हा अध्यक्ष अॅड. जे.बी.गिरी अभिष्टचिंतन . अखिल भारतीय दशनाम  समाज उन्नती मंडळ संघटनेसाठी 'सर्वस्व' पणाला लावून लढणारा 'सच्चा साथी' म्हणून संबंध महाराष्ट्रात  परभणी जिल्हा अध्यक्ष अॅड. जे.बी.गिरी यांची ओळख आहे. त्यांच्या कामाचा आवाका खुप विस्तीर्ण आहे व कार्याची व्याप्ती खुप मोठी आहे.वकीली,राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक, अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रातील लोकांशी असलेला स्नेहभाव जपताना प्रसंगी व्यावसायिक दृष्टिकोन बाजुला सारुन ते स्नेहभाव दृढ करतात ही त्यांची कामाची शैली आहे.त्यामुळेच जिल्ह्याचे संघटन मजबूत झाले आहे. संघटनेच्या माध्यमातून   समाजघटक व  प्रत्येक समाजबांधव यांचा जिव्हाळ्याने  विचार करून कार्यक्रम, उपक्रमांचे नियोजन करणे, प्रमुख कार्यकर्ते , समाजबांधव या प्रत्येकाचे समाधान करून सर्व सामान्य माणसाचे हीत जपणे हे शिवधनुष्य पेलणारा  खराखुरा शिलेदार म्हणून अॅड. जे.बी.गिरी यांचे कार्य सुरू आहे.          उत्तरोत्तर त्यांच्या खंबीर नेतृत्वाची झळाळी संपुर्ण महाराष्ट्रात

MB NEWS-राशिभविष्य (दि. ७ फेब्रुवारी २०२२)

इमेज
  राशिभविष्य (दि. ७ फेब्रुवारी २०२२) मेष-आशा-आकांक्षा पूर्ण होतील. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. आत्मविश्वास वाढवणार्‍या घटना घडतील. मनोरंजनात दिवस जाईल. वृषभ-परावलंबी स्वभावामुळे कामांत अडचणी येतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. कोणतेही आश्वासन. शब्द देऊ नका. आळस सोडून कामाला लागावे. मिथुन-नवीन गोष्टी अंगीकाराल. कामांना गती मिळेल. विवाहविषयक सुवार्ता ऐकायला मिळेल. आर्थिक नियोजनामुळे बचत होईल. लाभदायक दिवस. कर्क-कौटुंबिक समस्या संवादाने सुटतील. मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. सिंह-भावनाप्रधान व्हाल. व्यवहारात सावधानता बाळगा. खोट्या आमिषांना बळी पडू नका. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. प्रशासकीय कामांत अडचणी येतील. कन्या-दुसर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्या. निर्णय घेताना घाई नको. जवळच्या लोकांकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. आत्मचिंतन करावे. तूळ-जोडीदाराबरोबर पर्यटनाचा आनंद घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. समज-गैरसमज दूर होतील. प्रश्न मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. वृश्चिक- मान-सन्मान होतील. सामाजिक आणि

MB NEWS- *🏵️शब्द भावांजली (Video): गानसम्राज्ञी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली 🏵️*

इमेज
🏵️शब्द भावांजली: गानसम्राज्ञी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली 🏵️ लता मंगेशकर (हेमा मंगेशकर म्हणून जन्म; २८ सप्टेंबर १९२९ -  मृत्यू६ फेब्रुवारी २०२२) या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा  आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या. लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत.  २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित

MB NEWS- *लता दीदींच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील अमृततुल्य स्वर हरपला!* *प्रा.विजय मुंडे यांच्याकडून शोकभावना व्यक्त करून भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण!*

इमेज
 *लता दीदींच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील अमृततुल्य स्वर हरपला!* *प्रा.विजय मुंडे यांच्याकडून शोकभावना व्यक्त करून भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण!* परळी वैजनाथ/प्रतिनिधी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गीतांनी रसिक प्रेक्षकांना गेली आठ दशके भुरळ घालून रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. पिढ्यानपिढ्या लतादीदींच्या संगीत क्षेत्रातील योगदानामुळे त्या सदैव स्मरणात राहतील त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील अमृततुल्य स्वर हरवला असल्याचे  मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे यांनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.     महान पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख झाले.आपल्या भावगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्तीपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती. त्यांनी 18 भाषेत गीते गायली होती. त्यांच्या स्वरात एक वेगळीच जादू होती ए मेरे वतन के लोगो या देशभक्तीपर गीतांने तरुणाईच्या आणि देशवासियांच्या मनात देशभक्ती जागवली. मराठी भाषेतील संत ज्ञानेश्वरांचे अभंग त्यांनी गायले ते आजही प्रत्येक घरात ऐकायला मिळतात

MB NEWS- *लता दीदींनी अजरामर केलेले संगीत कोट्यावधी रसिकांच्या सदैव स्मरणात राहील - धनंजय मुंडे*

इमेज
 *लता दीदींनी अजरामर केलेले संगीत कोट्यावधी रसिकांच्या सदैव स्मरणात राहील - धनंजय मुंडे* *स्व. लता मंगेशकर यांच्या गाण्यांची आठवण जागी करत धनंजय मुंडेंनी वाहिली श्रद्धांजली* मुंबई (दि. 06) - : 'जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल कॉ गाना पडेगा...' असे म्हणत हजारो गीतांना आपला सुमधुर आवाज देणाऱ्या, देशाचा आवाज म्हणून ओळख असणाऱ्या भारतरत्न स्व. लता दीदी मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. दीदींनी अजरामर केलेला संगीताचा अनमोल ठेवा माझ्यासह कोट्यावधी रसिकांच्या सदैव स्मरणात राहील, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी गान कोकिळा स्व. लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.  गेली अनेक दशके संगीत क्षेत्रात लता दीदींनी आपल्या सुरांचा ठसा उमटवला. गान सम्राज्ञी, गान कोकिळा अशा अनेक उपाधी शिवाय विविध पुरस्कारांसह भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने लता दीदींनी गौरविण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून लता दिदींवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते, दरम्यान आज (रविवारी) सकाळी 8 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  दैवी स्वर प्राप

MB NEWS-लता दिदींच्या निधनामुळे अजित पवारांच्या हस्ते बीड येथील विविध विकास कामांचे उद्याचे नियोजित कार्यक्रम व शासकीय बैठका रद्द 🔸 पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती

इमेज
  लता दिदींच्या निधनामुळे अजित पवारांच्या हस्ते बीड येथील विविध विकास कामांचे उद्याचे नियोजित कार्यक्रम व शासकीय बैठका रद्द 🔸 पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     लता दिदींच्या निधनामुळे अजित पवारांच्या हस्ते बीड येथील सोमवारी होणारे विविध विकासकामांचे नियोजित भूमिपूजन व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.        लता दिदींच्या निधनामुळे घोषित राष्ट्रीय दुखवट्याच्या अनुषंगाने उद्या (सोमवारी) उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते नियोजित केलेले बीड येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रम व अन्य शासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर दिली आहे.बीड विधानसभा क्षेत्रात १०० कोटी ६० लाख रूपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  सोमवारी नियोजित होते. या विकास कामांमध्ये जिल्हा रूग्णालय, बीड इथल्या वाढीव २०० खाटांच्या इमारतीचं बांधकाम, तालुका क्रीडा संकुलाच्या जागेवर बॅडमिंटन हॉल-ज

MB NEWS-*लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा* *सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर*

इमेज
*लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा* *सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर* मुंबई दि. ६:  भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी  रोजी राज्यात  दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. 00000

MB NEWS- 🏵️ *शुक्रवारी कल्याणकारी हनुमान मंदिर येथे लक्ष्मणशक्ती कार्यक्रम*

इमेज
 🏵️ *शुक्रवारी कल्याणकारी हनुमान मंदिर येथे लक्ष्मणशक्ती कार्यक्रम* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     येथील माणिकनगर भागातीलहनुमान मंदिर येथे लक्ष्मणशक्ती कार्यक्रम शुक्रवारी (दि.११) आयोजित करण्यात आला आहे.याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.     कल्याणकारी हनुमान मंदिर येथे दि.११ रोजी सकाळी ५.३० ते सायं.४ या वेळेत रामायणातील लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम होणार आहे.हभप परमेश्वर महाराज फड यांच्या हस्ते पोथीस प्रारंभ होईल.यावेळी हभप विनायक महाराज गुट्टे गुरुजी,हभप शेषराव महाराज चाटे,हभप गंगाधर महाराज फड, हभप गुरुलिंग अप्पा पिंपळे तसेच नित्यसेवा करणारे हभप शामराव मस्के, हभप छबुताई कुलथे,हभप प्रभाकर महाराज डोळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.     सांगता व महाआरती नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन कल्याणकारी हनुमान मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष सुरेश टाक, उपाध्यक्ष महेश शिंदे, सचिव बाजीराव भैय्या धर्माधिकारी, सहसचिव रमेश काळे, कोषाध्यक्ष शंकरराव गवते,सहकोषाध्यक्ष रविलाल पटेल, व्यंकटराव दहिफळे,राजेभाऊ चव्हा

MB NEWS-लता दीदी नेहमी सुरात कोरल्या राहतील,मनात देखील!! -पंकजा मुंडेंची भावूक आदरांजली

इमेज
 . लता दीदी नेहमी सुरात कोरल्या राहतील,मनात देखील!! -पंकजा मुंडेंची भावूक आदरांजली परळी वैजनाथ, प्रतिनिधी...    लता दीदी नेहमी सुरात कोरल्या राहतील,मनात देखील!! अशी भावूक आदरांजली भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अर्पण केली आहे. आपल्या शोकभावना व्यक्त करताना पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, प्रत्येक स्वर ऐकणार्‍या, गाणार्‍या,गुणगुणणा-यांनाच नव्हे तर अगदी आसमंतातील स्वरांच्या अणू-रेणूंना ही प्रभावित करणारा तो मंजुळ पवित्र आवाज,सोज्वळ भाव,जरीकाठी साड़ी,अंगभर पदर,लोभस हसरा चेहरा काळाआड गेला तरी नजरेआड जात नाही"आदरांजली" लता दीदी नेहमी सुरात कोरल्या राहतील,मनात देखील!! 🔸 पंकजा मुंडे यांनी केलेले ट्विट....

MB NEWS-राशिभविष्य (दि. ६ फेब्रुवारी २०२२)

इमेज
  राशिभविष्य (दि. ६ फेब्रुवारी २०२२) मेष – दिवसाचा उत्तरार्ध लाभदायक असेल. अचानक खर्च निर्माण होतील. दवाखान्यासाठी खर्च होईल. दुसर्‍यावर विसंबून राहू नका. कामाला लागा. वृषभ – आदर-सत्कार होतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. उसने दिलेले पैसे परत येतील. नवीन कामांना सुरुवात कराल. मिथुन – संकल्पुुु सिद्ध होतील. जबाबदारी वाढेल. दिवसाच्या मध्यानंतर मनाविरुद्ध घटना घडतील. आत्मविश्वास कमी होईल. कर्क – सरकारी कामांना महत्त्व द्या. नियमांचे उल्लंघन करू नका. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल. मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील. सिंह – आर्थिक प्रगती होईल. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अपयश येईल. मनःस्ताप होण्याची शक्यताआहे. अनावश्यक खर्च होतील. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. कन्या – आपापसातील संवाद वाढेल. भागीदारीमध्ये लाभ होईल. व्यवसायानिमित्ताने प्रवास होण्याचे योग संभवतात. मान-सन्मान होतील. तूळ – दिवसाची सुरुवात त्रासदायक असेल. काटेकोरपणे आरोग्याच्या नियमांचे पालन केल्यामुळे आरोग्य सुधारेल. कार्यक्षमता वाढेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. वृश्चिक – आज आपला उत्साह कमी होईल. आत्मविश्वास महत्

MB NEWS-प्रा.अतुल दुबे यांचा वाढदिवस: *सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या सेवेसाठी यापुढेही कार्यरत राहणार-प्रा.अतुल दुबे*

इमेज
  *प्रा.अतुल दुबे यांचा वाढदिवस: *सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या सेवेसाठी यापुढेही कार्यरत राहणार-प्रा.अतुल दुबे* *विविध मंदिरात महाआरती, फळे वाटप, वृक्षारोपन* *परळी/प्रतिनिधी* परळी शहर आणि परिसरातील शिवसैनिकांपासून माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानेच आपल्यावर मनापासून प्रेम केले असून या प्रेमाची शिदोरी घेत आपण कार्यरत आहोत. यापुढेही सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्यरत राहुत असा विश्वास युवा सेनेचे जिल्हा समन्वयक तथा जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.अतुल दुबे यांनी व्यक्त केला.दरम्यान आज कार्यकर्त्यांनी प्रा.दुबे यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी विविध मंदिरात महाआरती केली. तसेच फळे वाटप, वृक्षारोपन आदी सामाजिक उपक्रमही राबविले. युवा सेनेचे जिल्हा समन्वयक, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  तथा सामान्य नागरिकांत अतुल सर या नावाने प्रसिद्ध असलेले प्रा.अतुल दुबे यांचा वाढदिवस आज परळी शहर व परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात कोरोना नियमावलींची अंमलबजावणी करीत साजरा करण्यात आला. सकाळी श्री वैद्यनाथ मंदिर, श्री कल्याणकारी हनुमान मंदिर

MB NEWS-*संत दत्तशरणानंदजी महाराजांचे होणार गौतम खटोड यांच्या निवासस्थानी आगमन* *बीडकरांनी संत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन*

इमेज
  *संत दत्तशरणानंदजी महाराजांचे होणार गौतम खटोड यांच्या निवासस्थानी आगमन* *बीडकरांनी संत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन* बीड (प्रतिनिधी) परम श्रद्धेय गोऋषि स्वामी संत दत्त शरणानंदन्दजी महाराज आज दि. 6 फेब्रुवारी 2022 रोजी औरंगाबादला बीड मार्गे जाणार आहेत. या दौऱ्यात ते दोन तास  बीडकरांसाठी वेळ देणार आहेत. येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांच्या एमआयडीसीतील आकाशवाणी नजीकच्या निवासस्थानी ते सकाळी 12 ते दुपारी 3 यावेळेत थांबणार  आहेत. बीडकरांनी संत दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांनी केले आहे. दत्तशरणानंदजी महाराज यांनी गोसेवेच्या माध्यमातून हजारो गायींचे रक्षणासाठी पुढाकार घेतला.राजस्थान पतमेढा येथे 8 ठिकाणी मिळून 1 लाख 20 हजार गोमाता व नंदीचा सांभाळ केला जातो. एकाच ठिकाणी एक सारखे १७ हजारापेक्षा पेक्षा जास्त नंदी या गोशाळेत आहेत. सर्वात मोठे गोरक्षण म्हणून या गोशाळेची गणणा आहे. तेथील गोसेवक श्री स्वामी दत्तशरणानंदजी बीड शहरात येत आहेत. बीडकरांनी संत दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्व. झुंबरलाल खटोड साम

MB NEWS-*रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलमुळे शालेय जीवनातच पाया पक्का होण्यास मदत होईल- बाजीराव भैय्या धर्माधिकारी* _कोटा (राजस्थान) येथील नामांकित आणि अग्रगण्य रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलचा परळीत शुभारंभ_

इमेज
  *रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलमुळे शालेय जीवनातच पाया पक्का होण्यास मदत होईल- बाजीराव भैय्या धर्माधिकारी* _कोटा (राजस्थान) येथील नामांकित आणि अग्रगण्य रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलचा परळीत शुभारंभ_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          श्रीहरिकोटा (राजस्थान) येथील देशभरातील नामांकित आणि अग्रगण्य "रेजोनंस करीअर अकॅडमी "यांनी परळी मधील फाऊंडेशन इंग्लिश स्कूल येथे "इंटिग्रेटेड स्कूल" सुरु केले आहे. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना  रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलमुळे शालेय जीवनातच पाया पक्का होण्यास मदत होईल असे प्रतिपादन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले.         फाऊंडेशन इंग्लिश स्कूल येथे झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विजयप्रकाश तोतला, रेजोनंस चे उपाध्यक्ष अजय नागर ,नागेश त्रिपाठी ,अकॅडमीक चीफ झा ,रितू तोतला ,प्रभारी मुख्याध्यावपक गजानन  यांच्यासह गुरुजन,पालक व विद्यार्थी शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MB NEWS-महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था समुपदेशक म्हणून चेतन सौंदळे यांची नियुक्ती

इमेज
  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था समुपदेशक म्हणून चेतन सौंदळे यांची नियुक्ती परळी वैजनाथ, प्रतिनिधी.. जिल्हानिहाय मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे यांनी जारी केली असून औरंगाबाद बोर्डामार्फत परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी 16 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 12 तर बीड जिल्ह्यातील 4 समुपदेशकांचा समावेश आहे.बीड जिल्ह्यातील समुपदेशकामध्ये परळी तालुक्यातील नंदनज येथील श्री केदारी महाराज विद्या मंदिर या शाळेतील व सर्व परळीकरांना ज्ञात असलेले व्यक्तिमत्व श्री.चेतन अरविंद सौंदळे यांची मार्गदर्शक व समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 10 व 12 वि बोर्ड परिक्षेबाबत विद्यार्थ्यांना कोणते ही व कशा ही प्रकारे दडपण येत असेल त्यांनी निःसंकोचपणे  9422930599  या माझ्या मोबाईल क्रमांकावर फोन करावा श्री.चेतन अरविंद सौंदळे मार्गदर्शक व समुपदेशक,बीड म.रा.शै.श.व प्र संस्था,पुण

MB NEWS-अतुलनीय:प्रा. अतुल दुबे वाढदिवसाच्या शुभेच्छा......

इमेज
अतुलनीय:प्रा. अतुल दुबे वाढदिवसाच्या शुभेच्छा...... . नेतृत्वाचा वारसा अनेकांना चालत येतो. या नेतृत्वात संवेदनशील पणा असेलच असे नसते. परंतु ज्याला नेतृत्वाचा वारसाही नाही आणि सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांवर ज्याला कळवळा येतो असे नेतृत्व हे अपवादानेच उदयाला येते. सर्व सामान्यांतुन उदयास आलेल्या नेतृत्वामध्ये एक प्रकारचे संवेदनशीलता भरलेली असतेच त्याचबरोबरीने आक्रमताही तेवढ्याच तीव्रतेने असते हे दिसुन येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे परळी शहरातील एक युवा नेतृत्व अतुल दुबे या धडपडत्या युवकाच्या रूपाने पहावयास मिळते. वेगवेगळ्या माध्यमातून व एक ध्येय समोर ठेवून सर्वसामान्यां प्रती असलेल्या जिव्हाळा अनेक आंदोलने व अनेक प्रश्‍नांची सोडवणुक करताना त्याच्यातील संवदेनशीलतेचा प्रत्यय नेहमीच पहावयास मिळाला. अतुल दुबे यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमीत्त त्यांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा.                -प्रा.रविंद्र जोशी @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ *🟥 विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख प्राचार्य अतुल दुबे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!* ---------------------------------------- _MB NEWS ला नक्की